अति शहाण्यांची जत्रा भाग २ - finding नि.मो

Submitted by अनिकेत कुंदे on 16 August, 2020 - 03:39

     ******* अति शहाण्यांची जत्रा - Finding नि.मो।   *********

      या घटनेनंतर त्यांची घरी बाहेर भयानक जुंपायची, आबा काका जाताना दिसला का, आले साहेब, या या अहो वसुंधरा बाई तुमचा मुलगा आला आहे, त्यांना ओवाळायला दिवे आणा, नजर उतरवून टाका.

   काका आला की मुद्दाम आबांपुढे जाऊन बसायचा. ते चिडले की हा मजा घ्यायचा. आणि जेव्हा यामध्ये आजीची एन्ट्री झाली की आबा कोण तू अन कोण मी!!! सगळी कडे शुकशुकाट.... अर्थातच आजी काका ची बाजु घ्यायची.

   आबा आणि काका चे भांडण गावासाठी फुकटची मेजवानी असायची. विशेषतः एकदा आबा पारावर होते दुपारच्या सुमारास आणि काका दिसला की ते बाकीच्यांना हळु आवाजात ही ऐकु जाईल काकाला ऐकवणे होते म्हणुन जोरात बोलले.

  आबा -: आले आमचे चिरंजीव, एक पोर राम आणि हे अस काय काय माहिती।।।। आख्या गावात इज्जत काढायला निघालंय ...

  अण्णा ( पारावरचे आबांचे मित्र) -: जाऊंदे रे आबा, हाताचे समदं बोटं  सारखं नसत्यात. ह्याला काय घेऊन बसलाय।।

आबांनी फक्त होकारार्थी मान डोलावली होती,

  काका तिथं ऐकतच होता त्याचा प्रचंड तळतळाट झाला होता. त्यात अण्णा ने पुरते मीठ घातले होते.

   काका चा राग अनावर झाला होता, आबा घरी आले २, ३ च्या सुमारास, आणि झोप काढुन पुन्हा पाराकडे जायला निघाले.

   आबा-: विव्या पाणी आण रे।।।।

   मला आवाज दिला मी घेउन जायला लागलो तर काका ने थांबवलं आणि मला काढुन दिले मी घेऊन जातो म्हणे....

   हळूच काकाने देशी ची बाटली काढली, तो आबाला पुरता अद्दल घडवायच्या मागे लागला होता... अर्ध पाणी खाली ओतुन त्यात देशी भरली.....

     काका-: ह घ्या, वतु का मी न्हायतर !!!

    आबा -: आमचे भाग्य खुलले आणा आणा राजे तुम्ही कशाला तकलीफ घेता.... ओतण्याची ( शुद्ध मराठी बोलुन काकाला चीड यावी म्हणुन प्रयत्न करत होते, नंतर लगेच स्वर बदलत) आण इकडे आलाय मोठा वतु का म्हणे!!!

    गावाकडच्या म्हाताऱ्या माणसांना सवय असते, तांब्या असा हे तोंडापासून वर पकडायचा आणि गट गट गट !!! आबांनी सगळे पाणी  पिऊन  टाकले होते.

    आबाला काहीतरी गफलत वाटलेच होती, जरासे कडू लागले होते पण घराबाहेर पडले....

    आमच्या घरात मध्ये आणि गावाच्या वेशी पाशी असलेल्या पिंपळाच्या पार मध्ये ५०० एक मीटर च अंतर होते. आबा तस पूर्ण गावाला फेरफटका मारूनच जायचे.

    बबन( आमच्याचं गावातील एक शेतकरी आबांच्या चांगल्याच ओळखीतला.... बबन्याचं म्हणायचे सगळे त्याला .... तो आमच्या घरी आला ५ च्या सुमारास ।।आबांकडे काम होत काही त्याचं ....

    बबन्या -: ओ रामभाऊ, आबा हाय का ओ???

     वडील  माझे ( रामराव) -: न्हाय रे काय झालं, आजून तर नाही आले आबा बस येतंच असतील पारावरून!!!

    बबन्या -: न्हाय ना रामभाऊ, पारावरूनच यायलो काही आबा दिसलं न्हाई तिथं..... हे आपल्या मोटारीचं पुंह्यांदा घेऊन बसलंय ते तात्या आमचं, आलं अन शिव्या द्यायला लागलं. ते आबा निस्तारत्या बरबर हे, तात्या ऐकत आबाचं!!!

    रामराव-: हा बस!! येतंच आसतील आबा चायपाण्याला गेले असतील कोणाच्या घरी !!!

     आजी घरातून बाहेर आली -: काय बबन्या काय म्हणतो।।।

   बबन्या -:  काय न्हाय आजे, (वसुंधरा बाईंना,  वृद्ध सोडले तर आख्य  गाव आजी च म्हणायचं)  ते आपलं नेहमीचं तो तात्या भांडायला चालु  झाला....

   आजी-: चहा घेतो का... जानकी चहा आण तीन कप ..... ( भारदस्त आवाजात ऑर्डर सोडायची आजी फक्त)

   चहा पाणी झाले, ६ वाजून गेले आबाचा काही पत्ता नाही ...

   मग बबन्या -: आजी, भाऊ आबा आले की घरी आलं की पाठवुन द्या त्यासनी ।।। त्या परीचं तात्या कुठं गप बसल.....
  
  बर चालतंय म्हणुन आजीने होकारार्थी मान हलवली......

घरातल्या सर्वांचं जेवणं झाली आबांचा काही पत्ता नव्हता, दहा वाजुन गेली होती...

   काकाचे दिवे लागायला सुरुवात झाली होती त्याने देशी टाकली होती ना तांब्यात,,, काही झालं नसेल ना आबाला असे निरनिराळ्या विचारांनी घेरले होते त्याला......

    रामराव-:आये मी बघुन येतो तात्याच्या घरी डायरेक्ट तिथे गेले असतील आबा न्हायतर बबन्या कडे, नसेल तर नाना आणि त्यांच्या घरी पण बघतो...

    थांब दादा मी बी येतो तुझ्या संग ।।।। काकाला भीती वाटायला सुरुवात झाली होती आता,,,
      चाल म्हणुन ते दोघेही निघाले, आणि १२ च्या सुमारास आख्य गावं पालथं घालून परतले पण आबाचा काही पत्ता लागला नव्हता..

    रामराव काकांकडे बघत -:  आपण स्टेशनात ( पोलीस) जाऊन येऊ कदम साहेब असतील मदत करतील काहीतरी !!!

     आजी-: न्हाय नको, वाट बघु थांब थोड्या वेळ....

    काका पण मान हालवत -: ततत फफफ ( अडखळायला ) लागला, हा दादा थांब की वाट बघु जाऊ मग !!!
   
    आबा मिळत नाही म्हणुन वडील आणि काका यांनी आख्या गावात चौकशी केली होती, म्हणुन गाव चिंतेत होतं, आमच्या घरी आबांना शोधायला गाव जमलं २ च्या दरम्यान ।।।
   
    मग मिशन ला सुरुवात झाली होती ।।। ***( finding नि. मो  )**** तस तर तेव्हा अस काही नावं नव्हते दिले मी लिहिताना वापरले, केवळ इतकंच ।।।।

    गावकऱ्यांनी पुन्हा एकदा आख्य गाव पालथं घातलं पण काही पत्ता नाही आबांचा ।।।।वेशी पर्यंत गाव पिंजून काढलं होतं।।

    गाव जागते पाहुन कदम साहेब घरी येऊन सांगुन गेले जर सकाळ पर्यंत नाही आले तर मला कळवा ६ ७ च्या दरम्यान ।।।।

   ३ झाले मग ४ वाजले होते पण काही पत्ता नाही आबांचा !!!

    ४.३० च्या दरम्यान कोणी तरी पेंगत पेंगत येताना दिसले, विजेची फारशी व्यवस्था नव्हती, म्हणुन फक्त सावली दिसली कुत्रे जीव काढुन भुंकू लागले होते...

     एक जण तर काठी घेऊन धावून गेला होता, मारणार तितक्यात चेहरा दिसल्याने थांबला।।। आणि मागे वळुन ओरडुन सांगू लागला -: आबा हाय आपलं।।।

    सर्वांच्या जीवात जीव आला, आबा ला ओसरीत असलेल्या बाकावर बसवले आबा परत झोपी गेले...

      आजी पुरती खवळली होती( तर हे पिऊन पडले होते)  पण इतक्या वर्षांनंतर पुन्हा कसकाय का प्रश्न तिच्या मुखी साफ दिसत होता.....

       सगळे गावकरी गेले होते, घरच्यांसोबत गावाची झोप उडाली होती...  आणि आबा मात्र शांत झोपले होते....

    काका ने काही न सांगताच तिथुन धुम ठोकली ती सरळ त्याच्या खोलीत।।।

  सकाळ झाली, कदम साहेब घरी आले,  मी आणि आबाचं जागे होतो, माझी आणि त्यांचीच झोप झाली होती... मग

   कदम साहेब-: विवेक आबा आले का रे?

मी-: हो आले ना, ,,कुठं गेले होते नाही माहीत, थांबा मी त्यांना पाठवतो,

आबा -: ( जरा डोकं जड पडलेलं होतं) नमस्कार कदम साहेब,,, काय म्हणता, लय सकाळी आलात, काय माहीत समद्याना उठायला उशीर झालाय चहा टाकायला लावला असता।।।

  कदम साहेब-:  काही नाही आबा, काल तुम्ही घरी नाही आलात म्हणून चिंतेत होती सर्व जण झोपु द्या त्यांना ।।।। आख्य गाव झोपलं असेल अजुन ,,, तस तुम्ही काल कुठे गेले होते आबा?

आबा -: काही आठवना गेलंय,,, साहेब ।।।

  कदम साहेब-:बर असुद्या जाऊद्या निघतो मी,,, काम आहे जरा ।।।। काळजी घ्या तुम्ही पण आराम करा।।।।

  आबा आवरून सावरून पुन्हा ९, १० च्या दरम्यान पारावर जायला निघाले ( चहा विठुच्या टपरीवर घेऊ या उद्देशाने ) घराच्या आणि पाराच्या मध्ये एक मंदिर आहे रस्त्या लगत  म्हणजे तीन बाजूने शेत आणि तो रस्ता , आता मात्र आबांना काहीसं आठवायला लागलं होत कारण ते त्याचं मंदिराच्या मागच्या बाजूला तराट होऊन पडले होते.

     तिथुनच घरी परतले, बाहेर असलेली काठी घेतली काकाच्या खोलीत जाऊन नको त्या ठिकाणी जोरात वळ वठतील अशी मारली ।।।।

     अशी ही स्टोरी एकंदरीत,    Finding नि.मो उर्फ नीलकंठ मोरे........

{ अशी ही कथा पुर्णतः काल्पनिक आहे, याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही, आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.....}

Group content visibility: 
Public - accessible to all site users