डावरे -बावरे

Submitted by ए_श्रद्धा on 12 August, 2020 - 10:35

हा लेखनाचा प्रयत्न, उद्या इंटरनॅशनल लेफ्ट हॅन्डर्स डे आहे त्या निमित्त.
१३ ऑगस्टलाच का याबद्दल मला तरी काही माहिती सापडली नाही. (https://www.lefthandersday.com) पण बऱ्याचदा १३ ऑगस्ट ला फेसबूक, Wats App वर कोणी तरी आठवण काढत आणि स्वतः च त्यात काहीही कर्तृत्व नसताना पण उगाच थोडंस स्पेशल वालं फीलिंग येत.

वामांगी लोकांच्या काही वेगळ्या मजा/अडचणी असतात.

शाळेत असताना -
 शाळेतल्या बाकांवर उजवीकडे बसले की लिहिताना शेजारच्याचे आणि आपले हात धक्काबुक्की करतात. Happy
 डावीकडे बसले की ओळींमधून फिरणाऱ्या बाईंना कोपरखळ्या बसतात.
 शाईपेन ने लिहिताना आधीचे लिहिलेले शब्द पुसले जातात.
 प्रसाद घेताना, देवाला फुलं वहातांना पटकन डावा हात पुढे आला की एखादे आजी -आजोबा डोळे वटारून बघतात.
 शाळेच्या स्कर्ट चे बक्कल उजव्या हाताने डावीकडे लावावे लागते आणि खिसा नेमका उजवीकडे असतो आणि जो एकच असतो. Sad

कॉलेजमध्ये गेल्यावर -
 डावखोऱ्या लोकांच्या मागे बसणाऱ्यांना त्यांचा सगळा पेपर दिसतो आणि कॉपी चालू आहे का म्हणून बोलणी पण खावी लागतात, जर तुम्ही थोडेफार हुशार असाल तर मात्र तुमचा भाव वाढतो Wink
 क्लासेस मधले सिंगल सीट बेंचेस आणि उजवीकडे असेलेले डेस्क तर खूप वैताग आणतात.
 माउस, कॅमेरा,Latch अशा वस्तू मजा बघतात.
 हॉटेल मध्ये प्लेट्स,ग्लास ,चमचे उलटीकडे ठेवले जाऊन सांडलवण होते.

संसाराला लागल्यावर -
 लहानपणी डोळे वटारून बघणाऱ्या आजी आजोबांची जागा चुलत,मावस सासवा, सत्यनारायण, मंगळागौर प्रकारांना येणारे गुरुजी घेतात.
 गॅस,मिक्सर,लाच यांची बटण घाबरवून सोडतात.
 साडीच्या निऱ्या उलट्या घेतल्या जातात.
 कितीही आतून वाटलं तरी त्यांची मुलं राईट हॅन्डर्स होतात. Lol
इत्यादी, इत्यादी

मंडळी तुमचे अनुभव, किस्से माहिती वाचायला नक्की आवडेल

ताजा अनुभव -
स्पायरल बाइंडिंग असलेल्या वहीमध्ये उजव्या पानावर लिहिताना त्रास होतो, जो उजव्या हाताने लिहिणार्यांना डाव्या पानावर होत असेल Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिंद्य, Happy
तुमच्या सारख्या बहुश्रुत, अभ्यासू मायबोलीकरांमुळे असे नवनवीन शब्द कळतात. फार आनंद वाटतो.

खूप छान आणि वेगळा विषय! डावखुर्‍यांनो आपले वेगळेपण जपा!
शाळेत असताना होते १-२ मित्र मैत्रिणी आणि १ शिक्षक डावखुरे! काहीतरी वेगळं आहे त्यांच्यात म्हणून कुतुहल वाटायचं!
त्या टीचरचं वही तिरकी धरून शेरे लिहिणं आठवतं.
मलाही कधी कधी डावा हात कणीक मळायला वगैरे बरा वाटतो. जोर जास्त पडतो असं वाटतं.

… देवाची कृपा कोणी ही डावर झालेलं नाहीये...

पण डावर असले तर त्यात वाईट काय ? जगात साधारण ९% लोकं आपल्यासारखीच डावरी आहेत असे वाचले आणि उरलासुरला कॉम्प्लेक्स गेला Happy Maybe The Creator wanted to add some variety to this mundane world. So, let’s Celebrate !

माझी मुलगी पण हेच म्हणते , " त्यात काय एवढं ? डावरा असेल तर ओके आहे.... कोणी उंच कोणी कमी उंच कोणी गोरा कोणी सावळा तसच आहे हे ... पण ह्या उजव्यांच्या जगात डा वऱ्याना नजरेसमोर धरून नाही बनवल्या जात गोष्टी, सिस्टिम्स.. खुप adjust करावं लागत त्यांना म्हणून वाटतं. असो.

Btw छल्ला अनिंद्य " सिनिस्ट्रॅलिटी " साठी धन्यवाद . हा शब्द माहीत नव्हता, इथे स्पेशल मेंशन केलं म्हणून उत्सुकता वाढली आणि गुगल केलं, खुप महिती मिळाली, मजा आली वाचताना .

हा शब्द थेट AI ला विचारला.
त्याचे मराठीकरण बघा.

"Sinistrality" refers to:

1. The quality or state of being left-handed.
2. A preference for using the left hand for tasks and activities.
3. A neurological or biological tendency to favor the left side of the body.

Example sentences:

- "Research on sinistrality has shed light on the genetics of handedness."
- "Sinistrality is more common in some families than others."
- "The study explored the relationship between sinistrality and cognitive abilities."

Synonyms for "sinistrality" include words like:

- Left-handedness
- Southpawedness
- Gaucheness
- Leftdom
- Left-preference

In general, "sinistrality" refers to the phenomenon of being left-handed or favoring the left side of the body, often with implications for cognition, behavior, and neuroscience.

Note that "sinistrality" can be used in various contexts, such as:

- Neuroscience and psychology
- Biology and genetics
- Education and learning
- Sports and athletics
- Cultural and social studies

In Marathi, "sinistrality" can be translated to:

- वायमुखता (Vāymukhatā) - left-handedness
- वाययुक्तता (Vāyyuktatā) - left-preference
- वायपक्षता (Vāypakṣatā) - left-dominance
- वायस्थिति (Vāyasthiti) - left-position
- वायप्रवृत्ति (Vāyaprvṛtti) - left-tendency

Note that Marathi is a rich and diverse language, and the translation of "sinistrality" may vary depending on the context and dialect.

… उजव्यांच्या जगात डा वऱ्याना नजरेसमोर धरून नाही बनवल्या जात गोष्टी, सिस्टिम्स.. खुप adjust करावं लागत…

खरयं. स्वानुभव.

छान लेख, प्रतिसाद वाचून ज्ञानात भर पडली. Sinistrality शब्द आजच समजला. धन्यवाद.
अनिंद्य Amsterdam मधल्या दुकाना च नाव काय आहे, माझा एक जुळा डावखुरा आहे,तो थोडा मोठा झाला की सांगेन किंवा घेऊन जाईन . त्याला अजून समजत नाही की तो डावरा आहे , आम्हीही जाणवू देत नाही, त्याला हा हात वापर तो वापर सांगत नाही ( त्याने एका जागी बसून पेन्सिल हाती धरली हेच खूप असतं त्यामुळे लेफ्ट हात वापरू नको असा मी चुकूनही सांगत नाही, जे लिहितो/ गिरवतो : फराटे काढतो तेही टाकून पळून जाईल) , पण छोट्या डायनिंग टेबलवर त्याच्या डाव्या बाजूस आम्ही बसत नाही, त्याचा भाऊ चुकून बसला की हमखास ढकला ढकली!

… अनिंद्य Amsterdam मधल्या दुकाना च नाव काय आहे…

आता तर आठवत नाही, तसेही तिकडे नावे विचित्र असतात. गूगलून बघा.

माझी दोन्ही मुलं डावरी आहेत. फारसा काही problem येत नाही.

हे एक डावऱ्या लोकांकरीता दुकान आहे:

https://www.leftyslefthanded.com/default.asp

Sinistrality शब्द नविनच कळला. धन्यवाद.

Pages