अनिष्ट अनुष्टभ

Submitted by BLACKCAT on 12 August, 2020 - 10:33

मिसळपाव वर अनुष्ट्भ छंदात काव्य लिहायचे आहे , अनुष्टुभ हा छंद आहे , भीमरुपी च्या चालीत म्हणावे

http://www.misalpav.com/node/47296

हे स्फुरले

लोकशाही साठ वर्षे नांदली होती जिथे
चिखल सगळा माजला हा भाजपा येता इथे

नोटबंदी जीडिपीला कडकडा डसली कशी
नोकरी टाकून जनता भजी तळती दशो दिशी

लक्ष ते पंध्रा कोठे उडुनी चालले पहा
विजय मल्ल्या शहा मोदी देतसे धन्यवाद हा

नको शाळा नको औषध नको ते पूल रेलवे
रंग बदला , नाव बदला चालले व्यर्थ सोहळे

कधी माता, कधी बंधू छायाचित्रे प्रकाशती
पण पुजेच्या समारंभी सुपारी का लागती ?

देशांतर कधी करतो , कधी वेशांतरी उभा
आलेख पोचला खाली तरी घेई सभा सभा

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हं

मी गीतरामायण मधील चापबाण घ्या करी च्या चालीवर वाचले Happy

पण पुजेच्या समारंभी सुपारी का लागती ?

>>>> बाकी उपरोध समजला... हे डोक्यावरून गेले

पण पुजेच्या समारंभी सुपारी का लागती ?

ज्यांना बायको नसते ते लोक बायको म्हणून पूजेत सुपारी ठेवतात,

आईबरोबर फोटो काढतो , भावाबरोबर काढतो , पण देशासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक धार्मिक कार्यात बायकोऐवजी सुपारी ठेवून भागवून घेतो,

रामानेही अश्वमेधाच्या वेळी सीतेचा सोन्याचा पुतळा ठेवला होता, सामान्य मनुश्यास बायको मेली असेल किंवा जवळ नसेल तर सुपारी ठेवावी लागते.

उपाय है ... ऐसें अवसर पर ब्राह्मण कुशा की , क्षत्रिय सोने की , वैश्य चांदी की और शूद्र तांबे की मूर्ती बिठा सकता है ...

https://youtu.be/2ZEcSzzKNoM
20:45 पासून पुढे पहावे.
कुशा म्हणजे दर्भ/ गवत

बायको जीवंत असून हा सन्मान !

आणि ह्याचे चेलेचपाटे गावभर ओरडत फिरतात मोदीने मुस्लिम औरतो को न्याय दिलाया