पेटलेल्या ह्दयाचे गाणे

Submitted by Santosh zond on 4 August, 2020 - 19:49

पेटलेल्या ह्रदयाचे गाणे !

डोळ्यात अश्रूंची धार घेऊन
कुणी तरी धावत आलं
जीव होता घरट्यात माझा
सांगून हकीकत चालतं झाल!!

पिलं सगळी ओरडत असणार
ऐकुन डोळ्यात पाणी आलं
उंच उडणाऱ्या स्वप्नांवर माझ्या
कुर्‍हाड कुणी चालवुन गेल!!

निसर्गाची हाडे आमची
संघर्ष करून थकून गेली
घर असणार्‍या तुमच्यासाठी
अजून जागा मोकळी झाली!!

माणुसकीचा अंत झाला
रडून पाने गळून पडली
पिलांना ईवलुशा चोचीत धरून
चिऊताई दुर उडून गेली!!

पेटलेल्या ह्दयाचे गाणे तिचे
आपल्याला कधी कळलेच नाही
घाव घालणाऱ्या निर्दयी प्राण्यावर
हात आपले वळलेच नाही!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users