Submitted by तो मी नव्हेच on 31 July, 2020 - 10:26
धाऊनिया दिवस रात। देई सर्वांस पोषण।
धरणी अक्षय रांजण। ती गुरु माझा।।
नित्य तोषवी चराचर। न कशाचे त्या अप्रुप।
सकलांत जल एकरूप। ते गुरु माझा।।
घेई पोटी सकलांस । बांधी कुणा न बंधन।
मुक्त आकाशी सर्वजण । ते गुरु माझा।।
अग्नि प्रदिप्त पोटाशी। देई सकलांस जीवन।
रवि अनादि प्रकाशमान। तो गुरु माझा।।
राखी न स्वतःशी काही। वाही निष्काम निरंतर।
वारा न दे कुणा अंतर। तो गुरु माझा।।
दावी मार्ग अनादि सकला। ती महाभूते निराकार।
रूपे घेतसी सगुण साकार। ती गुरु माझा।।
- रोहन
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
निसर्ग खर्च गुरू आहे. मस्त
निसर्ग खर्च गुरू आहे. मस्त शब्द रचना....
खूप सुंदर शब्दांची रचना...
खूप सुंदर शब्दांची रचना...
धन्यवाद चष्मिस जी, रूपाली जी
धन्यवाद चष्मिस जी, रूपाली जी
छान .
छान .
धन्यवाद तिकोणे सर
धन्यवाद तिकोणे सर
सुंदर!
सुंदर!
धन्यवाद गुरुदीप
धन्यवाद गुरुदीप