जादू तुझी

Submitted by किमयागार on 29 July, 2020 - 23:12

मी तुझी चाहूल व्हावे अन् तुझ्या मागून गावे.
मोरपंखी पाखरांनी गीत अपुले दूर न्यावे.

वाहिला आहे तुला मी जन्म माझा फार आधी.
याचजन्मी तू मला व्यापून माझे सूर व्हावे.

बघ इथे खोळंबला आहे कधीचा मेघ ओला.
तू अशी लाजून बघता आज त्याने रिक्त व्हावे.

झाडवेली स्तब्ध होत्या मोगरा ही मौन होता,
तू अशी हासून बघता रोज त्यांनी दरवळावे.

काय ही जादू तुझी की मी मला विसरून जावे?
अन् तुझ्या प्रेमात पुरते मी मधासम विरघळावे.

---------© मयुरेश परांजपे (किमयागार)---------
७२७६५४६१९७

Group content visibility: 
Use group defaults

किमयागार नाव तुम्ही दर गझलेच्या वेळी सार्थ ठरवता...
ग्रेस म्हणतो प्रत्येक कवी हा कविता लिहिताना त्याच्या कवितेत झिजत जात असतो... आज शब्दश: झीज दिसली सर!!

वाहिला आहे तुला मी जन्म माझा फार आधी.
याचजन्मी तू मला व्यापून माझे सूर व्हावे.... सुंदर शब्द रचना.....
अशा कविता वाचून वाईट वाटत स्वतःला लिहिता येत नाही याचं....

धन्यवाद chasmish. वाईट वाटुन घेऊ नका... तुम्हालाही नक्कीच जमेल.. आम्हाला वाचायला आवडेल...
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद