निरोप

Submitted by पाचपाटील on 25 July, 2020 - 14:50

'हॅलोss'
'''हॅलोs.. कसं काय आज..!!!'''
'लग्न करतेय'
'''हो.. ते समजलं मला"'
'मग काय करणार मी अरेss..? तुझं पण काही खर्‍याचं नाही.. किती दिवस चालणार हे असं..??'
"'खरंय'''
'बोल ना काहीतरी'
'''तू सांग.. काय करतो तो? कसा आहे?'''
'आहे... चांगला आहे... व्यवस्थित आहे सगळं'
'''अच्छा'''
'तू पण करून घे आता'
'''नाही.. मला नाही वाटत तसं.... पण बघेन म्हणजे.. करेन सुरुवात.. तुला तर माहितीच आहे सगळं..'''
'हम्म'
'''बरं.. ऐक ना... एक बोलू काय?"'
'हम्म'
'''ते सगळीकडचे इनबॉक्सेस तेवढे क्लीअर करशील का?... कारण एवढा लिबरल पुरूष 'नवरा' म्हणून मिळायची
सिस्टीम आलेली नसेल अजून आपल्याकडे कदाचित'''
'हो.. करते'
"'आणि हा नंबर पण ब्लॉकच ठेवशील का? "'
'नाही. नको.. असू दे.. बोलायला होईल असंच कधीतरी जेव्हा अनइझी वाटेल तेव्हा'
"बरं "
'आणि एक सांगायचं राहून गेलं होतं अरे.. म्हणजे तशी गरजच नाही वाटली कधी एवढ्या दिवसांत.. पण आता बोलते... आय एम रिअली थैंकफुल टू यू... तू नेहमीच अॅफेक्शनेटली ऐकून घेतलेलं आहेस मला...
अँड आय डोन्ट थिंक आय विल फांईंड समवन हू इज सो मच अॅफेक्शनेट अँड केअरिंग टूवर्ड्स मी... Thank you for that... Thank you for everything... ठेवते मी आता.. याहून जास्त बोलत राहिले तर पुन्हा तेच सगळं सुरू होईल.. अँड इट विल बी quite difficult.. तेव्हा नकोच ते..!'
'''खरंय... थांबूया आपण आता... आणि शुभेच्छा आहेतच सर्वकाळ... चांगलं होईल तुझं... बाय..!'''
'बाय..!'

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकदम मस्त
भावल!
शतशब्द कथा हा पार्ट मायबोली वर आणनाऱ्याच लय कौतुक Happy
पोरी लवकर सावरतात पोरांपेक्षा...
सावराव च लागतं त्यांना...