अगदी सोपे चॉकलेट

Submitted by sneha1 on 24 July, 2020 - 15:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१.५ कप अक्रोड
१ कप खजूर
१/३ कप कोको पावडर, माझ्याकडे असलेली Hershey's unsweetened वापरली मी
१ टीस्पून व्हॅनिला इसेन्स
कणभर मीठ, मी घातले नाही

क्रमवार पाककृती: 

- आधी अक्रोड (आणि मीठ वापरत असाल तर) मिक्सर मधे बारीक करून घ्या.
-मग खजूर, कोको पावडर आणि व्हॅनिला इसेन्स हे सगळे त्यात घालून पुन्हा मिक्सर फिरवा. छान गोळा तयार होईल.
-त्याचे हव्या त्या आकाराचे चॉकलेट बनवा. माझ्याकडे मोल्ड आहे, मी त्याच्यामधे बनवले.
-आणि मग हवे तितके खा!
खाली फोटो दिला आहे. लेकीचा वाढदिवस होता तेव्हा बनवले होते.

वाढणी/प्रमाण: 
खाल तितके
माहितीचा स्रोत: 
http://eatyournuts.com/2015/12/chocolate-walnut-date-balls-raw-vegan-paleo/#:~:text=%20%20%201%20Grind%20walnuts%20and%20salt,the%20spoonful%20straight%20from%20the%20food...%20More%20
आहार: 
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद अंजली आणि चंपा.
चंपा, खजुरामुळे नाही लागत कडू. तुम्हाला वाटले तर बोर्नव्हिटा किंवा हॉट चोकलेट वगैरे घा लून बघा, जास्त गोड होईल कदाचित.

तुम्हाला वाटले तर बोर्नव्हिटा किंवा हॉट चोकलेट वगैरे घा लून बघा, जास्त गोड होईल >>> हॉट चॉकलेट पण नुसतेच टाकायचे का ?
अक्रोड पडले आहेत, पण कोको पावडर नाहीये

धन्यवाद सगळ्यांना.
मस्त मगन, मी फक्त कोको पावडर वापरूनच केले आहेत. माझ्या मते चॉकलेटच्या चवीची कोणतीही पावडर चालायला पाहिजे.
करून बघा थोडे आणि सांगा कसे झाले ते Happy
अतिशय सोपे आहेत आणि पटकन होतात.