मुंबई गणेशोत्सव २०२० पूर्वतयारी व श्रींचे आगमन

Submitted by अश्विनीमामी on 23 July, 2020 - 22:38

आज श्रावणी शुक्रवार. भाद्र्पद लागल्यावर श्री गणेशाच्या आगमनाची चाहूल व पूर्वतयारीचे वेध लागले आहेत. कोविड परिस्थितीनुसार थोडे बदल करून हा सर्वांचा आवडता सण साजरा करायचा आहे.

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना सोपे जावे म्हणून सरकारने बसेस आयोजित केल्या आहेत. ऑन लाइन पोर्टल वर आपापल्या गटाची नोंद करून त्या नुसार दिल्या गेलेल्या बस ने जायचे यायचे आहे. दोन्ही तारखा व क्वारंटाइन चे दिवस पक्के केले जातील व ते संभाळून गावाकडे गर्दी न करता
उत्सव साजरा करायचा आहे.

मुंबईत ह्या उत्सव साजरा करणे बाबत बृहन्मुंबई महानगर पालिकेने काही नियम/ निर्बंध जारी केले आहेत. हे आजच्या वर्तमान पत्रात पण छापून आले आहेत. घरगुती गणेशोत्सव साजरा कर णार्‍या भाविकांना खालील जाहीर आवाहन केले गेले आहे.

सन २०२० मध्ये मार्च महिन्या पासून कोविड १९ साथरोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. ह्या आपत्ती पासून स्वतःचे व कुटुंबियांचे
संरक्षण करूनच गणे शोत्सव साजरा कर णे आवश्यक आहे.

१) घरगुती गणेश मूर्तीचे आगमन मिरवणुकीच्या स्वरुपाचे नसावे, आगमना साठी जास्तीत जास्त पाच व्यक्तींचा समुह असावा . आगमन प्र्संगी मास्क शील्ड, सॅनिटायझर सामाजिक अंतर इ स्व संरक्षणाची साधने काटेकोर रित्या वापरण्यात यावीत.

२) घरगुती गणेशोत्सवासाठी मुर्ती शक्यतो शाडूची असावी व या मूर्तीची उंची दोन फुटांपेक्षा जास्त असू नये किंवा शक्य असल्यास या वर्शी पारंपारीक शाडूच्या गणेश मुर्ती ऐवजी घरात असलेल्या धातू/ संगम रवर आदि मूर्तींचे पूजन करावे. जेणे करून आगमन/ विसर्जन ह्या साठी गर्दीत जाणे टाळता येइल.

३) दर्शनास येणार्‍या व्यक्तींना मास्क परिधान करण्यास आग्रह करावा. व त्यांच्या साठी सॅनिटायझरची व्यवस्था करावी.

४) गणेश मुर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास या मूर्तीचे विसर्ज न माघी गणेशोत्सव किंवा २०२१ च्या भाद्रपद महिन्यात पुढील वर्शीच्या विसर्जनाच्या वेळी देखील करणे शक्य आहे. त्यासाठी मुर्तीचे पावित्र्य राखण्यासाठी पवित्र वस्त्रात गुंडाळून मुर्ती घरीच जतन करून ठेवता येइल.
५) गणेश मुर्ती चे विसर्जन घरच्या घरी करणे शक्य नसल्यस नजिकच्या कृत्रीम विसर्जन स्थळी मुर्तीचे विसर्जन करण्यास यावे.

६) विसर्जनाच्या वेळी कमीत कमी व्यक्ती असाव्यात व जास्तीत जास्त पाच व्यक्ती असाव्यात.

७) नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विसर्जनासाठी जाण्याचे शक्यतो टाळावे.

८) घरगुती गणेश मुर्तीचे विसर्जन करताना संपूर्ण चाळी तील/ इमारतीतील सर्व घरगुती गणेश मुर्तींची विसर्जनाची मिरवणूक एकत्रित रीत्या काढण्यात येउ नये

९) विसर्जनाच्या पारंपारिक पद्धतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे विसर्जन प्रसंगी

मास्क / शील्ड इ. स्व संरक्षणाची साधने काटेकोर रित्या वापरण्यात यावी.
१०) शक्यतो लहान मुले / वरिष्ठ नागरिका नी सुरक्षिततेच्या दृ ष्टीने विसर्जन स्थळी जावू नये.

११) बी एम सी / पोलिस प्रशासन यांनी घालुन दिलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करण्यात यावे.

१२) घर/ इमारत गणेशोत्सव काला वधीत प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केल्यास प्रतिबंधित क्षेत्र नियमांचे पालन करण्यात यावे.

१३) उत्सव प्रसंगी अशी कोणतीही कृती करू नये जेणे करून करोना विषाणू चा फैलाव होईल. अन्यथा अशा व्यक्ती साथरोग कायदा
१८९७ आपत्ती निवारण कायदा २००५ व भा द वि १८६० कायद्यान्वये कारवाईस पात्र राहतील.

सह आयुक्त ( परि - दोन) तथा गणेशोत्सव समन्वयक. पी आर ओ/ ४२३/ जाहिरात/२०२०-२१

कोकणात जायसाठी असलेल्या ऑनलाइन सेवेची व बुकिंगची लिंक ओपन झाली की इथे अपडेट करते.

सद्य परिस्थितीत विघ्न हर्त्या गजाननाच्या आगमनाने आपले सर्वांचे मनोधैर्य वाढावे व कोरोना व इतर अवघड परिस्थिती तून पुढे जाण्याचे बळ मिळावे ही सदिच्छा. मोरया मोरया....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नियम स्पष्ट आणि बरोबर आहेत
आता किती पाळले जातात ते बघायचं.
आम्हाला सीड गणेश/वृक्ष गणेश ऑनलाइन ऑर्डर करायचा होता.
पण किमती नॉर्मल पेक्षा खूप म्हणजे खूपच जास्त आहेत.
ऐनवेळी नेहमीचे आमचे विक्रेते यावर्षी मृत्तिका किंवा शाडू गणेश ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष दुकानात ठेवतील तोच बघू.

आमचे हे पाचवे वर्ष, म्हणून धुमधडाक्यात करायचे बेत होते, पण कोरोनामुळे सगळ्यावर विरजण पडले.
मुख्यमंत्र्यांनी हे नियम सांगायच्या आधीच आम्ही खबरदारी म्हणून गणेशोत्सव साधेपणाने करायचा ठरवला होता. इतकेच नाहीतर मूर्ती सुद्धा दोन फुटा ऐवजी एक फुटी सांगितली. दरवर्षी सत्यनारायण असतो तो ही पुढे ढकलला तसेच बाकीची व्यवस्था ही आधीच करणार आहोत, फुले सुद्धा जर कुणी घरपोच करणार असेल तरच नाहीतर कृत्रिम फुलांनी सजवायचे ठरलंय. गरज नसता भाजी मंडईत इतकी गर्दी असते, तर उत्सवात किती गर्दी असेल विचारही नको वाटतो. मूर्ती आणायला अन विसर्जनाला सुद्धा घरून फक्त दोन जण असणारेत.
दरवर्षी पूर्ण सोसायटीला बोलावतो महाप्रसादाला, पण यावेळी ते शक्य नाही. रादर नमस्काराला देखील कुणाला बोलवायचे नाही हेही ठरवले होते.

हे एवढे सगळे आधीच ठरविल्यामुळे नवीन नियमावळी ऐकून काही वाटले नाही.

गेल्या दहा वर्षापासून धातुच्या मुर्तिची प्रतिष्ठापना करतोय. अंगणात जी फुले आहेत त्याचाच हार. विसर्जन म्हणजे उत्तरपूजा करुन मूर्ति व्यवस्थित ठेवून देतो. डेकोरेशन घरातल्या वस्तुनीच करतो. दहा वर्षापूर्वी केलेले बदल किती काळानुरूप व योग्य होते ह्याचा आनंद होतोय .........

छान माहिती अम्मा, सध्याच्या वातावरणामुळे गणपती साठी जावे का जाऊ नये हा प्रश्न मनात असताना तुमच्या या सूचीमुळे खूप गोष्टी कळल्या, धन्यवाद

मंजुताई खरंच अगदी योग्य निर्णय घेतला तुम्ही दहा वर्षांपूर्वीच.

यंदा आम्ही घरीच हाताने मातीचा जमेल तसा गणपती करणार आणि घरीच त्याचे विसर्जन करणार.

शासनाचे आदेश कधी येतील ते माहीत नाही. आजच्या मिटिंगमध्ये वरील निर्णय हा सरपंचानी घेततेला आहे. ज्या मंडळीना गावी जायचे असेल तर त्यांनी गणपतीच्या आधी १४ दिवस जायचे आहे. म्हणून सर्व सभासदांच्या माहितीसाठी पाठवली आहे.

________

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी सात दिवसच होम क्वारंटाईन करणार

http://dhunt.in/amOuE?s=a&uu=0xd3e2f4771aa0fd18&ss=wsp
Source : "पुढारी" via Dailyhunt

________

गावचा व्हॉटसपग्रूप सध्या पेटला आहे.
क्वारंटाईन ७ दिवस की १४ दिवस
आता चाकरमान्यांना १४ दिवस कसे परवडणार.
थोडक्यात गावी जाऊन नका असे झाले हे.

अर्थात या वर्षी गावाला जायची खरेच गरज आहे का हा देखील एक प्रश्न आहेच.

१२ तारखे च्या आत चाकर मान्यांना कोकणात पोहोचावे लागेल. दहा दिवस क्वारंटाइन आवश्यक आहे. होम क्वारंटाइन व्यवस्थित उरकून मग गणेशाची स्थापना करता येइल.

सरकारची घोषणा खालील प्रमाणे आहे.

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यां चाकरमान्यांसाठी होम क्वारंटाइन होण्याचा कालावधी १४ वरुन १० दिवसांवर आणण्यात आला आहे.

एसटीने प्रवास करताना ई-पासची गरज लागणार नाही. मात्र खासगी वाहनाने प्रवास करताना ई-पास अनिवार्य असणार आहे. कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांना १२ तारखेपूर्वी कोकणात पोहोचावं लागणार आहे.

ज्यांना १२ तारखेनंतर कोकणात जायचं आहे त्यांना स्वॅब टेस्ट करुन तो निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्यांना परवानगी दिली जाईल.

https://www.loksatta.com/maharashtra-news/coronavirus-anil-parab-on-konk... इथे ही बातमी आहे.

ह्यावर्षी आमच्या GSB गणपतीचे online दर्शन घ्यावे लागेल.. स्वयंसेवक सुद्धा नाहीत..पूजा ..onlinE प्रसाद घरपोच..

ह्यावेळी मला माबो वरची ती गोष्ट आठवली.. नक्की कोणी लिहिली आठवत नाही.. गणपती कितीवेळा जाऊन निवडून आणला.. मग घरातले सगळे कसे वैतागले होते.. पण त्यांचा बाप्पा एकदम सुरेख होता.. फोटो टाकला होता त्यांनी.