Frozen food or pre-made food options

Submitted by दिव्या१७ on 21 July, 2020 - 04:04
विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hello All,

Because of lockdown and work from home schedule became too hectic. No peace, no maid, cannot order anything from outside, need to cook daily, husband is of no use in kitchen as his working hours increased. I am fed-up with struggling daily with house work, cleaning, cooking, kids study, office work. Is anyone tried Frozen food I need some tips and help about how we can reduce workload and pre cook meals to lower kitchen work. Please help.

स्टार डेली मध्ये कच्च्या चपात्या मिळतात.(या व्यवस्थित गव्हाच्या लाटलेल्या चपात्या असतात आणि भाजल्यावर घरच्या पोळ्यांसारख्या लागतात(आयडी चे हिरवे पाकीट)आणि मॉडर्न बेकरी च्या चांगल्या आहेत.
टाटा q ची रेडीमेड बिर्याणी मिळते(मला आवडत नाही कारण तेलकट असते) ती अगदीच अडी अडचणीला चालू शकेल.
कणकेचा डोसा/बेसन धिरडे हे आमचे स्टेपल डायट आहेत घाईत.
फ्रोझन मटार ची उसळ बनवून त्यात शेव फरसाण कच्चे जाड किंवा पातळ पोहे(हेच अख्खा मसूर उसळ, मटकी उसळ बरोबर)
इन्स्टंट रवा डोसा/आप्पे रवा ताकात भिजवून
दूध म्युसली
दही मेतकूट पोहे ऐनवेळी कालवून
पोह्यांच्या चिवड्यात कांदा टोमॅटो घालून भेळ
दही जिरे पावडर चाट मसाला मध्ये पनीर किंवा बटाटा पातळ चकत्या(या मिक्सर च्या ब्लेड ने होतात) घोळवून सँडविच टोस्टर ला बेक करून ग्रील पनीर
जीरा बटर दह्यात आधी भिजवून ठेवून दही वडा सदृश प्रकार

खाववत असल्यास mtr आणि इतरांच्या फ्रोझन डाल फ्राय आणि पावभाजी किंवा मेथी मटार मलाई/कडाई पनीर.या भाज्यांना टिकायला व्हिनेगर टाकायला लागल्याने चव अगदीच बदलते.पण ती मान्य असल्यास उत्तम ऑप्शन.
दुकानात/काही विक्रेत्यांकडे थेट पनीर मिक्स किंवा चायनीज मिक्स म्हणून कापलेल्या भाज्यांची पाकिटं मिळतात.ती घरी परतून पुलाव/शेजवान राईस.
लाल भोपळा थालीपीठ(थालीपीठ भाजणी घरात आहे असे समजून)
अमृतसरी छोले आणि ब्रेड/रेडिमेड नान(रेडिमेड नान तेलकट असतो.या पापाचे परिमार्जन करायला मायबोलीवर अमृतसरी छोले ची ऑईल लेस रेसिपी आहे.)

Thanks Mi_anu. Ghari banun fridge madhe freezer meals, breakfast jar try kele astil tar please share Kara. Kiti diwas aapan freeze karun bhajya (chole, rajma) or Dali theu shakto.

मी सांबार, मटकीची भाजी, पावभाजी फ्रिज करुन ठेवते अधुन मधुन. टॉमेटोची प्र्युरफ, आले लसुन पेस्ट, कांदा भाजुन त्याची पेस्ट करुन ठेवते.

पुण्या- मुंबई मध्ये. घरपोच डबे देणारे भरपुर लोक आहेत.
माझे वडील मुंबईत दोन वेळेचा डबा दोन वेगवेगळ्या लोकाकडुन मागवतात. आधी घरपोच मिळायचा आता सोसायटीच्या गेट वर वॉचमनच्या ऑफीस पर्यन्त मिळतो. हा एक पर्याय आहे.
पुण्यात - पि-चि मध्ये घराच्या खाली पण काही पोळी भाजी केद्र आहेत जे लॉक डाउन च्या काळात शटर बंद करुन चालु होती आणि लोकाना घरपोच / गेट पर्यन्त डबे पोचवतात.
दोन्ही कडे ६०-७० रुपये दरात एक वळेचे जेवण मिळते.

pre-made food options मध्ये
उपमा एक किलोचा भाजुन आणि. आणि बिन कांदा , लसुण आणि टॉमेटोची फोडणी घालुन ठेवली तर फ्रीझ बाहेर पण बंद डब्यात २ महिने राहतो.
भुक लागली तर एक वाटी उपंयाला दिड वाटी उकळते पाणी घातले. आणि १५ सेकंद ते मिश्रण मिक्स केले की उपमा तयार.
मिष्रण करताना फोडणीच्या वेळी काजु , शेंगदणे , उडीद दाळ, कडीपत्ता घातली तर चव पण चांगली येते. एक केलो उपमा मध्ये एका माणसाचे ७-८ वेळा जेवण होते.

हो, समान प्रकारे मूग डाळ खिचडी मिक्स करता येते.मायक्रोवेव्ह ला उकळत्या पाण्यात लगेच शिजवायचे तर डाळ तांदूळ जरा जास्त फोडणीत बराच वेळ भाजून हलके करावे लागतात.(कोणी स्वयंपाक न येणारा माणूस परगावी/परदेशी जात असल्यास हमखास चा उपाय.)
शिरा मिक्स पण छान होते अश्याच प्रकारे.

दिव्या,
तुम्हाला आठवड्याचा स्वयंपाक आणि पूर्वतयारी असे फ्रीज करुन आणि काही प्रमाणात रेफ्रीजरेटरमधे ठेवता येइल. किती मिल्स हवीत, प्युअर वेज की जोडीला अंड चालेल की नॉन वेज त्यानुसार १५ दिवसाचा तक्ता ठरवला तर सोपे होते. तुम्हाला शनिवार-रविवार सुट्टी आहे की फक्त रविवारी? दोन दिवस सुट्टी असेल तर एक दिवस पोळ्या आणि कोरडा खाऊ यासाठी देता येइल. तसे नसेल तर कामाच्या दिवशी लवकर उठून आठवड्यातून दोनदा पोळ्या करणे असे करुन जमवता येइल.

मी पोळ्या, पराठे, इडल्या, चटण्या, करी बेस, आलं-लसूण-कोथिंबीर वाटण, पास्ता सॉस, पेस्तो, उपमा, गोडा शिरा, पुरण, कोथिंबीर्/पालक वड्या, पॅनकेक्स, मफिन्स, बनाना ब्रेड, चिकन फिंगर्स वगैरे फ्रीज करुन ठेवते. लेक पास्ता, भात , पुलाव, तंदुरी चिकन , पुल्ड पोर्क , पावभाजीची भाजी, सांबार, पुर्‍या देखील फ्रीज करतो.
फ्रीजरमधे किती जागा आहे त्यानुसार काय फ्रीज करायचे आणि काय आठवड्यातून एक-दोनदा करुन रेफ्रीजरेटरमधे ठेवून खायचे ते तुम्हाला ठरवावे लागेल. माझ्याकडे मीट, फीश, प्रोड्युस वगैरे फ्रीज करुन ठेवावे लागते त्यामुळे मी छोले-राजमा वगैरे सहसा फ्रीज करत नाही, रेफ्रीजरेटर मधे ठेवते.
मी एकावेळी दोन कडधान्य + बीट आणि एकावेळी दोन कडधान्य + मिक्स डाळ असे दोनदा कुकर लावते. भातही मोठी बॅच करते. आयत्यावेळी फ्रोजन करीबेस, फोडण्या, मसाले. यात लंच साठी चार दिवसाच्या उसळी, रात्रीसाठी दोन वेळा बीटची कोशिंबीर, एक डाल फ्राय, एक डाल पालक, एक बॅच सांबार होते. यातलीच डाळ वापरुन भाताचा बिसी बेले भात, तवा पुलाव, स्टरफ्राय वेजी + भात असे प्रकार होतात.

एक सांगू का, पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या.
आस्वपू मध्ये (अगदी विकेंड्स ना करणार असलात तरीही बराच वेळ द्यावा लागतो हे माझं मत) त्यापेक्षा शनी/रवी वारी आराम फर्मावा.
बाकी दिवस जरा शेड्यूल मधून वेळ काढून लवकर जे काही होईल ते शिजवावं.
पूर्ण ९ तास काम आहे असं शक्यतो होत नाही; आणि ब्रेक्स आवश्यक आहेत. ते घेतल्या गेलेच पाहीजेत.
जरा बाकी लोकांनाही कामाला लावा घरातल्या. भाजी चिरणे, कॉल वर म्यूट असतांना जरा घरातली साफसफाई करणे/ आवरणे इ. नक्की जमू शकेल.