वृद्ध मंडळीना कसे समजावून सांगावे?

Submitted by सियोना on 20 July, 2020 - 14:38

सध्या सगळीकडे कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सर्वांना माहित आहे. माझे सासरे व सासूबाई पुण्यात राहतात आणि आम्ही पिंपरी चिंचवड मध्ये. कोरोना परिस्थिती मुळे आम्ही त्यांना मार्चमध्ये आमच्या घरात रहायला या सांगितले पण तुमच्याकडे करमत नाही असे सांगून त्यांनी येणं टाळून ते दोघे एकटे राहतात. पण शेजारच्या लोकांना मुलगा आणि सून किती वाईट आहे हे सांगतात. त्यांना वाटते की दर आठवड्याला त्यांना भेटायला यावे. आमची दोन लहान मुले आहेत.कोरोनामुळे मुलांना खेळायला सुद्धा बाहेर जाता येत नाही. किती ही समजावून सांगितले तरी सासू-सासरे दोघे फिरायला जातात. घराजवळ किती तरी दुकाने आहेत पण तरीही डी मार्ट मध्ये जातात. घरात बोर होतंय म्हणून. मागे KFC मध्ये खायला जायचे आहे म्हणून भांडण झाले कारण आम्ही विरोध केला. लहान मुलांना एकवेळ समजावून सांगणे सोपे आहे पण म्हातार्या लोकांना कसे समजावून सांगावे कळत नाही. त्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून काळजी घ्यायची हेच सांगून सुद्धा ऐकत नाही. काय करावे कळत नाही. इतर नातेवाइकांचे सुद्धा ऐकत नाही. सासरे वय वर्षे 73 आणि सासूबाई वय वर्ष 65 आहेत.
सासू बाईंना उच्च रक्तदाब आणि मधुमेह आहे. सासर्याना संधीवात आहे फेब्रुवारी मध्ये 15 दिवस ICU त होते (चक्कर येऊन रस्त्यावर पडले होते आणि मेंदूला मार लागला होता ) त्या मुळेच जास्त काळजी वाटते.

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

DJ चांगले विचार आहेत. त्यांचे वा आमचे घर सांगण्यात वाचकांना कळावे म्हणून दिले आहे. आम्ही घरात बोलताना आपले घरच म्हणतो गैरसमज नसावा.
रेव्यू खूप छान माहिती.

बोलणाऱ्याच्या लक्षात येत नाही आपण बोलतोय त्याचा समोरचा काय अर्थ काढेल. पण समोरच्याला साधे शब्द खटकू शकतात, त्याची भावना वेगळी होऊ शकते.>>>>> आमच्या कडल्या वयस्कर मंडळींचा हा एकपात्री कार्यक्रम गेले १७ वर्षापासुन चालू आहे आणी समोरच्याला त्याची बाजू मांडण्याची संधी आजतागायक कधीच मिळालेली नाही. सॉरी जरा पर्सनल लिहीतेय. पण माझ्या अनूभवातुन हेच सांगेन स्वतःची बाजू कणखरपणे मांडायला शिका. ही वयस्कर मंडळी ( रेव्यु तुम्ही आणी विक्रम सिंह सोडुन ) समोरच्याला त्याची बाजू अजीबात मांडु देत नाहीत.

किती मस्त पोस्ट आहे रे॑व्यु.

ही वयस्कर मंडळी ( रेव्यु तुम्ही आणी विक्रम सिंह सोडुन ) समोरच्याला त्याची बाजू अजीबात मांडु देत नाहीत.>> हे मी अनुभवले आहे. नाही मांडता येत आपली बाजू.

आत्ताच वाचले पिंची मध्ये करोना जास्तीच कहर करतो आहे. तुम्ही पण काळजी घ्या. मी पूर्वी पुणे पिंची रिटर्न जर्नी करत असे आई बरोबर
पी एम टी बस मधून. त्याची तुमच्या बाफ मुळे आठ्वण आली. काळजी घ्या. ( मुलांना ऑनलाइन खेळणी मागवा. आजच वाचले मॅटेल कंपनीचे शेअर्स वर गेले आहेत. कारण लॉक डाउन मध्ये मुले व्हिडीओ गेम्स ना वैतागून बार्बी व इतर खेळ णी नव्या उत्साहाने खेळत आहेत. काल मी घरी पोह्चले तेव्हा सोसायटीच्या कोविड कॉर्नार मध्ये हॅमलीज चे खोके आले होते.

मला काय वाट्ते कपल असेल तर एक फ्रंट तयार होउन ते फोर्स फुली मांडू शक्तात व भांडू शकतात. एकेक टे म्हातारे जरा जुळवून घ्यायचा प्रयत्न करतात.

*वयस्कर मंडळी ( रेव्यु तुम्ही आणी विक्रम सिंह सोडुन ) समोरच्याला त्याची बाजू अजीबात मांडु देत नाहीत.* - बर्याच वयस्कर मंडळींचा अनुभव नेमका उलटाही असूं शकतो , आहेही ! Wink
मला परत सांगावंसं वाटतं , कृपया स्वत:च्या मर्यादित अनुभवावरून सरसकट वयस्कर मंडळींबददल निष्कर्ष काढणं अनुचित आहे.
दुसरं, ही मंडळी म्हणजे परग्रहावरून आलेली विक्षिप्त जमात नसून याच समाजातून वयस्कर झालेली आहे; थोड्या फार फरकाने बरे-वाईट, हट्टी- समजूतदार इ.चं त्यांच्यातलं प्रमाण इतरांपेक्षा वेगळं असणार नाहीं.
तिसरं, या विषयावर लिहीताना, 'सुपातल्यानी जात्यातल्याना.. ' हया म्हणीचं भानही ठेवणं हितावह.

अहो, वाचलंत ना तूम्ही ! आपल्या वयाचे सर्व बाहेर जावून धुडगूस घालताहेत म्हणे ! आपणच तरी कां असः कोंडून रहायचं घरात !!20190918_204446_2.jpg

आज्जिबई आज ज्येष्ठ नागरिकांबाबत असे म्हणत आहेत यात काही नवीन नाही. अर्ध्या हळकुंडाची नेहमीची कहाणी... Wink

आज्जिबई आज ज्येष्ठ नागरिकांबाबत असे म्हणत आहेत यात काही नवीन नाही. अर्ध्या हळकुंडाची नेहमीची कहाणी>>>>> तुमचे नाव घेऊन मी इथे काही लिहीले आहे का? प्रत्येक ठिकाणी तुम्ही पर्सनल होऊन भ्याडासारखे माझ्यावर ताशेरे मारत असता.

माननीय प्रशासक, फिल्मी व इच्चुकाटा हे दोघेही आय डी माझ्यावर कायम वै . पद्धतीने ताशेरे मारत असतात याची कृपया नोंद घ्या.

ह्यात भ्याडा सारखे काय आहे? तुमचं तेच ते पाल्हाळ दिसतं ते सांगितलं. नाही पटत सोडून द्या अन्यथा चालत्या व्हा. पब्लिक फोरम असेच असते.

चालत्या व्हा सांगायला मायबोली तुमची खाजगी मालमत्ता नाही, त्यामुळे गुंडासारखी भाषा वापरु नका. या पुढे तुम्हाला किती खाली उतरायचे ते उतरा, तुमचे प्रतीसाद फाट्यावर मारणार.

भाषा गुंडासारखी वाटते, बोलणे भ्याड असल्यासारखे वाटते यात तुमच्या बुध्दीचा दोष आहे म्हणून चालते व्हा म्हटलं. किमान ती तुमची जवळची, तुम्हांस समजणारी भाषा असावी असे वाटले म्हणून. बरे त्याने मायबोलीवर हक्क दाखविता येत नाही. आणि हो, प्रतिसाद फाट्यावर मारा हा सल्ला घेतल्याबद्दल आभार.

भाऊ सहमत आहे.

बातम्यात ऐकतोय त्यानुसार धारावीसारखा परीसर वेगाने कोरोनामुक्त होतोय आणि पुणे-पिंपरी-चिंचवड एकूणच लॉकडाऊन शिस्त पाळली जात नसल्याने कोरोना फोफावतोय.
आता या लॉकडाऊन शिस्त न पाळणारयांमध्ये वृद्धांवरच तो ठपका ठेवण्यात काही अर्थ नाही.

गंमत म्हणजे ज्या अमेरीका वा एकूणच पाश्चात्य देशांतल्या व्यक्तीस्वातंत्र्याचे आपण गोडवे गातो तिथे व्यक्तीस्वातंत्र्याला बाधा म्हणून लॉकडाऊनला निदर्शने वगैरे काढून विरोध करतात. गंमतच आहे Happy

>>खूप छान रेव्यु, पण सगळेच एवढे नशिबवान नाहीत. हातावरचे पोट यांचे हाल आहेत.>>> एसारडी साहेब अगदी खरं आहे........ त्यांच्या बद्दल खरोखर वाईट वाटतं

रेव्यु यांची मूळ पोस्ट मार्गदर्शक आहे. हातावरचे पोट ज्यांचे आहे त्यांना बाहेर पडायला पर्याय नाही पण म्हणूनच ज्यांना शक्य आहे त्यांनी घरी रहावे. जर सधन व्यक्तीही हॉस्पिटल मध्ये गर्दी करू लागल्या तर गरीबांना इलाज मिळणे अधिक अवघड होईल. शिस्त पाळत नाही म्हणून वृद्धांवर ठपका नाही (सरसकट सर्वांवर तर नाहीच नाही). पण जे पाळत नाहीत त्यांच्यासाठी:- मुला-नातवंडांना आदर्श घालून देण्याची संधी असताना ती आपल्या वर्तनाने वाया घालवली याबद्दल खेद राहिल. एरवी आपले वर्तन कितीही आदर्श असले तरी मुला-नातवंडांना 'तुमचा काळ वेगळा होता' ('तुमची बॉस/सासू वेगळी होती इ इ) ही पळवाट असतेच. आता तसं काही नाही करोनाचे नियम सर्वांना सारखेच. आहे बघा संधी.

हा धागा मागे गेल्याने नंतरच्या पोस्ट्स वाचल्या नव्हत्या.
रेव्यु, पोस्ट आवडली!
सी, खरे आहे. घरी राहून आपण व्यवस्थेवरचा ताण कमी करतो आहोत आणि ही मोठीच मदत आहे.
सियोना, काळजी घ्या! हल्ली सौम्य लक्षणे असतील तर घरीच उपचार घेता येतात. कोरोना नसू दे आणि असला तरी त्यातून आजी आजोबांना लवकर बरे वाटावे यासाठी शुभेच्छा!

आजच माझ्या एका कलिगचे वडिल करोनाने गेले. एकदा hospitalized होते. Low immunity होती. गेल्या आठवड्यापासून परत त्यांच्या दुकानात जाउन बसायचे. सगळ्यांंचे सल्ले उडवून लावले.

गेल्या आठवड्यापासून परत त्यांच्या दुकानात जाउन बसायचे>>>>

ज्यांना स्वतःची काळजी नाही ते इतरांची काळजी का करतील? दुकानात जाऊन त्यांनी किती जणांना करोना संसर्ग दिला असेल देव जाणे.

वयाबरोबर शहाणपण आपोआप येत नाही. वयाबरोबर मूळचा मूर्खपणा वाढत जातो हे माझे निरीक्षण. घरात बघतेय जवळून. का.ना. असो नाहीतर ज.ना. Happy Happy Happy Happy

Pages