शकुंतला देवी (विद्या बालन) Coming Soon...

Submitted by ऋन्मेऽऽष on 18 July, 2020 - 11:53

तुम्हाला कोणाला cube root of 61,629,875 and the seventh root of 170,859,375 याचे उत्तर कॅल्क्युलेटर न वापरता काढता येईल?

अच्छा थोडा वेळ घ्याल.. पण काढता येईल म्हणता..

बरं मग एखाद्या 201 आकडी संख्येचा 23rd root सांगता येईल ??

हे थोडे वेळ घेऊनही अवघड वाटतेय ना.. २०१ आकडी संख्या बघायला कशी वाटेल याचा विचार करूनच गरगरायला होतेय ना. मग ते 23rd root वगैरेंवर तर जायलाच नको.

पण या अवघड गणितालाही अवघड करायला समजा मी तुम्हाला याचे उत्तर काढायला फक्त मिनिटभराचा वेळ दिला तर.....

तर तुम्ही हा पकवतोय म्हणत धागा ईथेच सोडून पळून जाल. आणि तसे होऊ नये म्हणून सांगतो एका बाईने हे तब्बल चाळीसेक वर्षांपूर्वी करून दाखवले आहे. अवघ्या ५० सेकंदात याचे उत्तर दिले आहे. आणि मग ते उत्तर बरोबर आहे हे पडताळून बघायला तेव्हाच्या काळी भला मोठा कॉम्प्युटर प्रोग्राम रचावा लागला होता. - ईति विकीपेडीया Happy

ईतकेच नाही तर दोन रॅंडमली सिलेक्ट केलेल्या १३ आकडी संख्या. अनुक्रमे,
7,686,369,774,870
आणि
2,465,099,745,779
यांचा गुणाकार करत तिने त्याचे अचूक उत्तर दिले होते. जे आले होते, 18,947,668,177,995,426,462,773,730
आणि यासाठी तिने वेळ घेतला होता, पुन्हा एकदा, फक्त 28 seconds !

मानवी कॉम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणारया या अचाट भारतीय बाईचे नाव होते शकुंतला देवी !

आणि या कामगिरीसाठी त्यांचे नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले होते. जो मोडायला कदाचित त्यांनाच फिरून जन्म घ्यावा लागेल Happy

ज्यांच्यावर आता पिक्चर येतोय आणि तिचा रोल करतेय खुद्द विद्या बालन !
ट्रेलर ईतका झ्याक जमलाय की ३१ जुलैपर्यंत वाट बघणे अवघड वाटू लागलेय. तुम्हीही एकवार बघून घ्या.

लिंक - https://youtu.be/8HA1HRufYso

वर खुद्द विद्या बालन म्हटलेय कारण तिचे कहाणी आणि डर्टी पिक्चर या आधी पाहिलेत, आणि नुकताच तुम्हारी सुल्लू पाहिल्यानंतर तर शंभर टक्के सांगू शकतो हा रोल तिच्यापेक्षा चांगला दुसरा कोणी करूच शकत नाही.

थिएटरलाच बघायला आवडला असता कारण काही टाळ्याखेचक दृश्य आणि संवाद यात नक्कीच असणार. ट्रेलर बघूनच फार हॅपनिंग कथानक वाटतेय. पण आता चित्रपट प्राईमवर रिलीज होतोय तर तिथेच आल्याआल्या गोड मानून बघावा लागणार Happy

त्यांचा जन्म १९२९ चा. मुलींच्या शिक्षणाची बोंब. त्यांचेही शिक्षण असे बहुधा झालेच नाही. तरीही ही अदभुत प्रतिमा. याला दैवी देणगी म्हणावे तरी अविश्वसनीयच वाटावे.

ट्रेलरने प्रभावित होऊन थोडे गूगल करताना आणखीही काही रोचक माहिती त्यांच्याबद्दल सापडली.

1. Shakuntala Devi had contested Lok Sabha elections against Indira Gandhi from Medak.

2. She was also an astrologer and author of several other cookbooks and novels.

3. She was a pioneer of the study of homosexuality in India.

आणि हे पाहता त्यांचे ओरिजिनल कॅरेक्टर विद्या बालनने ट्रेलरमध्ये साकारलेय तसेच बिनधास्त असावे असे वाटतेय.

त्यांच्याच भाषेत सांगायचे तर,
अगर अमेझिंग हो सकती हू, तो नॉर्मल क्यू बनू Happy
कडक !

ट्रेलर बघून घ्या तुम्हीही. पुन्हा एकदा लिंक देतो
https://youtu.be/8HA1HRufYso

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शकुंतला देवींचे व्हिडीयो यूट्यूबवर आहेत. त्यांच्या मानाने विद्या बालन अमंळ जरा जास्तच नाट्यमय 'लाऊड' वाटते. पण हा सिनेमा बघणार आहे.

>>तुम्हीही एकवार बघून घ्या.<<
शकुंतला देवी आमच्या कॉलेजमधे आलेल्याचं आठवतंय. ट्रेलर वरुन तरी वाटतंय चित्रपटात बर्‍याच फ्लॅमबॉयंट दाखवल्या आहेत. प्रत्य्क्षात त्या तेव्हढ्या न्हवत्या...

सी, राज, +१
थोडं caricature/over dramatization वाटतंय ट्रेलरमध्ये. कदाचित सिनेमा चालावा म्हणून अशा युक्त्या करायला लागल्या असतील. The imitation game या पद्धतीचे हिंदी चरित्रपट कधी बनतील का?

अंमळ अतिशयोक्ती असेलच.बहुधा सामान्य जनांना एखादं प्रभावी व्यक्तिमत्त्व नाट्यमय आणि ग्लॅमरस रितीने सेल करण्यासाठी पिक्चर मध्ये हे करणं गरजेचं वाटत असावं.(झिप लाईन करणारे तानाजी, उत्तर प्रदेशीय पॅडमॅन, मस्तानीची लमाझ डिलिव्हरी करणारे आणि दुश्मन की वाट लावली म्हणून नाचणारे बाजीराव,दाढी कुरवाळत अत्यंत लाऊड पद्धतीने (बहुधा उष्ण प्रदेशात राहणारा) फर ओव्हरकोट घालणारा खिलजी इत्यादी.)
विद्या बालन ने चांगलाच केला असेल रोल.31 जुलै ला नक्की पाहणार.

ट्रेलर नाही आवडला. एखादं कार्टून बघतोय असं वाटलं. खऱ्या शकुंतला देवी आणि त्यावेळेचे वातावरण नक्कीच असे नसणार. फक्त विद्या आहे म्हणून असा बाष्कळपणा नाही सहन होणार.

जिज्ञासा , The Imitation Game अत्यंत आवडता सिनेमा आहे. त्या धर्तीचे चित्रपट बॉलिवूडमध्ये बनणं कठीण आहे.
आपल्याकडे बहुतांश चरित्रात्मक सिनेमे लार्जर दॅन लाईफ असतात .

चालतंय की चरीत्रात्मक सिनेमे असे मनोरंजक बनवलेले. तपशील फार बदलू नयेत. पण मूळ व्यक्तीमत्वाचा गाभा तोच ठेऊन जरा मसालेदार तडका दिला तर चालून जावे. प्रेझेंटेशन चकाचक केल्याने बघतानाही तितकीच मजा वाटेल. मला तरी वाटते.

अर्थात ते तान्हाजी चित्रपटासारखे स्पेशल इफेक्ट वापरून बोअर केलेले असू नये.

अर्थात ज्याची त्याची आवड
सिनेमा हा व्यवसाय आहे. त्यामुळे निर्माता दिग्दर्शक जास्तीत जास्त लोकांची आवड जपायचा प्रयत्न करतात हे ही खरेय.

अर्र... खरंचकी. शकुंतला देवींवरील सिनेमा म्हणजे जसा असायची अपेक्षा होती तसा नसुन मसालेदार केलाय असे ट्रेलरवरुन तरी वाटते. आशा आहे ट्रेलरमधे आहे त्याशिवाय खरंच पहाण्यासारखे अजुन असेल सिनेमात. विद्या बालन खूप आवडते.
शकुंतलादेवींबद्दल गणित सोडुन वैयक्तिक काहीच वाचले नाहीये. आता वाचावे लागेल आधी.

https://youtu.be/D0xe8BC-azo

१९७३ सालची त्यांची मुलाखत

हि ऐकून मला प्रश्न पडलाय की या दैवी गणिती आकडेमोड बुद्धीचा वापर त्यांनी व्यवहारात कुठे कसा केला?

तचेच या मुलाखतीत त्या बोलायला चटपटीत वाटल्या. चित्रपटातील कॅरेक्टर त्यांच्या अगदी उलटे आहे असे तरी वाटले नाही

अर्थात ते तान्हाजी चित्रपटासारखे स्पेशल इफेक्ट वापरून बोअर केलेले असू नये.>> उदा. झिरो नावाचा अतिटुकार सिनेमा

ट्रेलर खुप भडक केलाय, विद्द्या आवडतेच पण सॉरी टु से यात ती काही ठिकाणी खुप नाटकी वाटलिये अजिबात आवडला नाही ट्रेलर
सध्याच्या काळातला उत्तम बायोपिक म्हणजे 'धोनी'

सध्याच्या काळातला उत्तम बायोपिक म्हणजे 'धोनी'
>>

वरच्या प्रतिसादांचा विचार करता तो देखील प्रामाणिक चरीत्रपट नव्हताच.
पण होता मात्र धमाल एंटरटेनिंग. मी तर धोनीचा डाईहार्ड फॅन. मला तर आवडणारच होता.

माझा धागा होता परीक्षणाचा त्यावर, जरूर वाचा

महेंद्र सिंग धोनी - द अन’टोल्ड लवस्टोरी Happy
https://www.maayboli.com/node/60634

शकुंतला देवींवरील सिनेमा म्हणजे जसा असायची अपेक्षा होती तसा नसुन मसालेदार केलाय असे ट्रेलरवरुन तरी वाटते. विद्या बालन खूप आवडते.
शकुंतलादेवींबद्दल गणित सोडुन वैयक्तिक काहीच वाचले नाहीये. आता वाचावे लागेल आधी.-------सहमत.
बघणार आहे कारण विद्या बालन, नवीन विषय, बायोपिक आहे आणि तो बंगाली नट यात नवरा दिसतोय टाईपरायटर(विलन) व मणकर्णिका(नवरा/राजा) पासून आवडायला लागलायं. I hope मुलांसोबत बघता येईल.
धन्यवाद ऋन्मेष, अजिबात कल्पना नव्हती या सिनेमाची!

वरच्या प्रतिसादांचा विचार करता तो देखील प्रामाणिक चरीत्रपट नव्हताच.
पण होता मात्र धमाल एंटरटेनिंग. मी तर धोनीचा डाईहार्ड फॅन. मला तर आवडणारच होता.

माझा धागा होता परीक्षणाचा त्यावर, जरूर वाचा>>> मूर्ख कुठचा

होरीबल ट्रेलर आहे संतापजनक
या चित्रपटावर बंदी आली तर उत्तम होईल

आपल्याकडे मसाला आणि फलटूगिरी केली पाहिजेच असा नियम आहे का
हिडन फिगर्स सारखे चित्रपट आपल्याला व्यर्ज का आहेत

होरीबल ट्रेलर आहे संतापजनक
या चित्रपटावर बंदी आली तर उत्तम होईल
>>>>

बंदी का?
शकुंतला देवींतर्फे कोणी तशी मागणी केली आहे का? संबंधितांना काही खटकले आहे का?

आजकाल विद्या बालन लॉउड अभिनय करते असं वाटतं, सॉउथ नट्यांसारखी. मध्येच डर्टी पिक्स मधले भाव आणते..इऊगाच हसणे, डोळे मिचकावणे कै च्या कै.

शंकुतला देवींची पुस्तकं , बाबांनी आणली जेव्हा मी , स्कॉलरशीप्ची सातवीत असताना परीक्षा द्यायची ठरलं. अवांतर वाचन म्हणून, नंबरावरचं लिहिलेलं पुस्तक वाचले आणि प्रेमात पडले. वाटलं काय दैवी देणगी आहे बाईंना.
मग त्यांची सर्वच पुस्तके विकत घेवून वाच्ली.
अगदी जपली होती बरीच वर्ष्र, मग देवून टाकले.
समलैंगीकवतेवरचे विचार वाचून थक्क झाले.

मूवी ट्रेलर पाहून उथळ व पांचट वाटतोय.

आजकाल विद्या बालन लॉउड अभिनय करते असं वाटतं, सॉउथ नट्यांसारखी. मध्येच डर्टी पिक्स मधले भाव आणते..इऊगाच हसणे, डोळे मिचकावणे कै च्या कै.
>>>>>

मला तर नेमके याच्यासाठीच ती हल्ली जास्त आवडू लागलीय Happy
अर्थात मी सौऊथ डब पिक्चरचा फॅन आहे. मूळ आवडच तशी आहे.
तुम्हारी सुलू तर फक्त आणि फक्त विद्याच्या याच अदाकारीसाठी बघावा... आणि त्यातही नेहा धुपिया बोनस.

ट्रेलर आवडला नाही.. हिडन फिगर्स ची आठवण आली!
हिडन फिगर्स सारखे चित्रपट आपल्याला व्यर्ज का आहेत >> अगदी!

ऋन्मेऽऽष
.>>>>हि ऐकून मला प्रश्न पडलाय की या दैवी गणिती आकडेमोड बुद्धीचा वापर त्यांनी व्यवहारात कुठे कसा केला? >>>>>>
आपणच आपल्या लेखांत उत्तर दिले आहे
ज्योतिषी होऊन पैसा कमावला! आणखी काय करणार ?

मूवी ट्रेलर पाहून उथळ व पांचट वाटतोय.>>>> +१.
पण यू ट्यूबवरील शकुंतलादेवींची मुलाखत ऐकून,विद्ध्या बालनने संवादाचा टोन बरोबर पकडला आहे असं वाटते.

पण यू ट्यूबवरील शकुंतलादेवींची मुलाखत ऐकून,विद्ध्या बालनने संवादाचा टोन बरोबर पकडला आहे असं वाटते
>>>>
.हो ते मलाही वाटले.
याऊपर ईंदिरा गांधीजींच्या विरोधात निवडणूकीला उभे राहणे, २०० देशांत फिरणे, त्याकाळात होमोसेक्शुआलिटीवर लिहिणे हे करायला नुसते टॅलेंट नाही यर स्वभावातही एक बिनधास्तपणा हवा..
शकुंतला देवी प्रत्यक्षात नक्की कश्या होत्या हे फार कमी जणांना माहीत असावे. विद्याने जे कॅरेक्टर साकारलेय त्यापासून किती अंतरावर होत्या हे नेमके सांग्णे अवघड

Pages