खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

VB thanks,
तुमचा प्रतिसाद वाचल्यावर लक्षात आलं, चुकून झालं होत
परत टाकलाय

मग काय, एकतर मला फोटो टाकता येत नाहीत त्यात तुम्ही सगळे टाका छान छान खाऊ.

अँप वापरते न मी.
आता मागच्या पानावर मानव यांनी सांगितल्याप्रमाणे browse वापरून बघितले तरी जमत नाहीय, नुसती लिंक दिसते अन फोटो येत नाही.
मला फारच मठ्ठ आहे की काय मी अस वाटायला लागलंय या मायबोलीवर फोटो न टाकता आल्यामुळे.

मला सेम प्रॉब्लेम यायचा आधी पण माबो लोकांनीच मदत केली... आता मी तुम्हाला करते..मग तुम्ही अजून लोकांना मदत करा फोटो टाकायला...

ब्लॅक पोस्ट (रडणारी बाहुली)
VB अहो फोटो टाकत असते मी ते पण ते अमानवीय पोस्टमध्ये कन्व्हर्ट होतात.

हेहे...

फोटो साईज बघा, केबीमध्ये करा.

VB अहो फोटो टाकत असते मी ते पण ते अमानवीय पोस्टमध्ये कन्व्हर्ट होतात.

बोकलतांना रिपोर्ट केला पाहिजे हा प्रॉब्लेम... Lol

रविवार विशेष

चिकन रेश्मी कबाब

SAVE_20200920_160453.jpg

हक्का नूडल्स
SAVE_20200919_105131.jpg

चिकन लॉलीपॉप
SAVE_20200920_012248.jpg

पनीर टिक्का
SAVE_20200920_160432.jpg

जेम्स बॉन्ड,मस्त प्लेटींग.
मृणलच्या त्या धाग्यावर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे मी चिकन ऐे वजी पनीर तसे केले.तेलाचा पुसटसा हात लावून मॅरीनेट केलेले पनीर शिजवले.मस्त झाले होते.

मी चीनैवजी पनीर तसे केले.तेलाचा पुसटसा हात लावून मॅरीनेट केलेले पनीर शिजवले.मस्त झाले होते.

देवकी आप्पे पात्रात केले का?

Pages