खाऊगल्ली - आजचा मेनू - (२)

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2020 - 10:56
khaugalli lajpat nagar

जब तक सूरज चांद रहेगा,
खाऊगल्ली का नाम रहेगा !

लोकहो, आधीच्या धाग्याचे पोट भरले, आता अजीर्ण नको म्हणून हा दुसरा Happy

सर्व रसिक खवैयांचे खाऊगल्लीत स्वागत _/\_

ईथे शुद्ध शाकाहारी आणि कट्टर मांसाहारी एकत्र गुण्यगोविंदाने नांदतात.
कारण आपली कुठेही शाखा नाही Happy

आधीच्या धाग्याची लिंक - https://www.maayboli.com/node/61189

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी केले होते. ओला नारळ खराब निघाला. मग सुका नारळ किसून, गूळ किसून त्यात वेलची आणि जायफळ पूड टाकून तुपात जरा परतले.
घरात फक्त मल्टीग्रेन कणिक होती, तीच्या पार्‍या करुन सारण भरुन कशा बशा पार्‍या बंद केल्या आणि उथळ तूपात तळले. बरेच तडे गेले.
फोटोजनीक अर्थातच नव्हते. बायको म्हणाली कशाला नसते उद्योग केले, तिने एक खाल्ला कसाबसा मी तीन खाल्ले.

मला ती चण्याची उसळ वाटली आधी.. पण मस्त आहे तुरीची उसळ..
मृनु शंकरपाळे मस्त दिसतायत ..चहा बरोबर छान लागतील.. मी तिखट शंकरपाळे बनवते..आमच्यकडे तुकडी म्हणतात त्याला..

स्वस्ति.. तुमचा मोदक भारी आहेच.. द्या स्पर्धेत पाठवून.. तुमच्या मुलाचा पण छान आहे..

मंजूताई.. डीकंन्स्ट्रुकंटेड मोदक भारीच..

मृणाली तुझा पण मोदक मस्त आहे..

मानव , श्रवु
परत बनवा की तळणीचे मोदक .
स्पर्धेत एन्ट्री येऊ देत

बघा त्यांनी खरंच केले मोदक ज्वारीच्या पीठाचे. पुडी(न्ग) नाही सोडली नुसतीच.>>>>> Lol मानव, आता कुठेही भाकरी म्हंटलं कि पुडिंग आठवतं आणि पुडिंग म्हंटलं कि म्हळसा आठवते Happy

बाकी मागच्या पानावरचे साबुदाणा वडा, मोदक, तुरीची उसळ सगळं तोंपासु. आणि शंकरपाळे, ज्वारी च्या पिठाचे मोदक सगळंच भारी

हे सगळे पदार्थ आयते आणून द्या,मी चवीने खाईन Happy
संपर्कातून mail करा मी स्वतः address, phone no सगळं सगळं देईन, हे पदार्थ देणाऱ्याला Happy
विशेषतः ते साबुदाणा वडे :लाळ टापापकणारी बाहुली:

धन्यवाद किल्ली.

मलाही मैत्रिणींना घरी बोलवून खाऊ घालायला खुप आवडते. गप्पा मारता मारता. Happy

मस्त कुरकुरीत मुरमुरे.

Submitted by अन्नपूर्णा on 28 August, 2020 - 07:44>>> मस्तच! मोदक बनविणे स्पर्धेत द्या ही पाककृती.

सगळेच पदार्थ मस्त...तोंडाला पाणी सुटले>>+१

Pages