मायबोलीबद्दल प्रश्न विचारण्याबाबत

Submitted by संयोग on 9 July, 2020 - 07:22

I am just new on maayboli and also new as writer. I am going to post some story on maayboli.
but before that I have some doubt listed below:
1.After writing story, how can I make copyright for my story?
2.Is it possible to get income by writing stories on Maayboli.
3.Or there is any resource or source by which I find some income, then please let me know.
awaiting for your kind response.
Contact No: 9082006915/9757442466

Group content visibility: 
Public - accessible to all site users

2.Is it possible to get income by writing stories on Maayboli.>>> हे काय मला शक्य वाटत नाही पण तुम्ही जर काही वर्गाच्या हौशी वाचकांना खूपच पकवायला लागलात तर मायबोलीवर न लिहिण्याचे पैसे ते तुम्हाला देऊ शकतात.

मायबोली वर तुम्ही इंग्लीशमध्ये लिहणार की मराठीत ते आधी सांगा.

मिंग्लिश मधे न छापता देवनागरीमधे लिहीलात तर भरपूर वाचक सापडतील, पैसे नाहीत...

हे 'पॅरालल युनिव्हर्स' आहे. पैशापेक्षा मौल्यवान इथं भरपूर सापडेल, पण ते लिहिण्याने नाही, वाचल्याने.
मग लवकरच लक्षात येईल की कॉपीराईट वगैरे सारी अंधश्रद्धा असते.
यानंतर मग इथे लिहायला हरकत नाही. खरंतर आपोआपच लिहू लागाल. शुभेच्छा. Happy

हे सगळं व्हायच्या आधीच लिहू लागलात तरी मस्तच. ऑल रोड्स गो टू..

साजिर्‍यास +१
माझ्या मते ऑनलाईन केलेलं कुठलही लिखाण (थोडे अपवाद वगळता) चौर्यकर्माचं पुण्य घेतातच.

"स्वानुभव वाटतं?" हा! हा! हा! एक नंबर भरत दादा

संयोग दादा अ‍ॅज यु सेड यु आर निउ अ‍ॅज राईटर अल्सो
देन इट्स करेक्ट प्लॅटफॉर्म फॉर यु
फर्स्ट राईट फॉर युअरसेल्फ अ‍ॅंड इफ पीपल वुड लाईक ईट देन कंटीन्यु हीअर ओव्हर!!
अफ्टर गेटींग सम सॅटीस्फाईंग कॉमेंट्स राईट प्रोफेशनल फॉर युअरसेल्फ इन युअर डायरी.
लेटर वेट फॉर कोअलेसेन्स!!
विश यु ऑल दी बेस्ट

मायबोली १ कमेंट > फ़ेसबुक १०० कमेंट ....असे साधे सूत्र आहे. इकडे निवडक टवाळ प्रतिसादांचे अपवाद सोडले तर सर्वच सल्ले हे फक्त आणि फक्त एक वाचक म्हणून प्रेमापोटी दिलेले असतात ज्याचा तुम्हाला लिखाण अजुन समृद्ध करायला निश्चित फायदा होतो. सुरुवातीस काही प्रतिसाद निगेटिव्ह वाटू शकतात पण त्यमागील सचोटी जेव्हा तुम्हाला ओळखु येईल तेव्हा उत्तरोत्तर प्रगती साधली जाईल आणि अर्थातच इकडच्या तुमच्या चाहत्यांची संख्यासुद्धा !
लिखाण कुठेही पब्लिश करा पण मायबोलीचा वापर फक्त त्याची लिंक द्यायला निव्वळ करणे टाळता येईल असे पहा (जर तसा काही विचार असलाच तर आगावू सुचना). मग अश्या वेळी कितीही छान लेख असला तरी कोणी कट्टर मायबोलीप्रेमी त्या पर्सनल ब्लॉगवर भेट देणार नाही हे मात्र खरे Wink

पुढील वाटचालीस शुभेच्छा

how can I make copyright for my story? >. You should contact a reputed lawyer / law firm who practices in that area. You can use your favorite search engine to locate law firms near you.
2.Is it possible to get income by writing stories on Maayboli. >> No cash income to the best of my knowledge.
3.Or there is any resource or source by which I find some income, then please let me know.
awaiting for your kind response. >> You should contact print magazines and book publishers. Most print magazines and books include contact information.

2.Is it possible to get income by writing stories on Maayboli.
>>>

मी एक धाग्याचे हजार रुपये घेतो. प्रतिसादाचे शंभर रुपये घेतो.
प्रतिसाद ५० पेक्षा जास्त शब्दांचा असल्यास वरील प्रत्येक शब्दाला पाच रुपये घेतो.
माझा धागा शतकी झाल्यास त्यानंतर येणारया प्रत्येक प्रतिसादाचे दहा रुपये घेतो.

प्रत्येकाचे रेट वेगळे असतील. मला जे मिळतात त्यात मी खुश आहे Happy

आणि हो,
काही जण तुम्हाला फुकटात लिहा आनंद मिळतो वगैरे तत्वज्ञान सांगून बहकवतील. दुर्लक्ष करा. आपल्या लिखाणाची किंमत आपणच ठरवायला हवी.

अज्ञानी, मी ते पॅकेज लपवणारयांमधला नाही.
आणि जे काही कमावतो त्याचा टॅक्सही भरतो.
मग संकोच किंवा भिती कश्याला?
मराठी लिखाणाची वॅल्यु आपणच वाढवायला हवी. ते फुकटात वा स्वस्तात उपलब्ध करून दिले तर कदाचित जास्त वाचकांपर्यंत पोहोचेलही. पण त्याचा मराठी लेखकांना काय फायदा?
उद्या आपली पुढची पिढी का मराठीत लिहेन?

एखादा मराठी लेखक मला पैसे किती मिळणार हे विचारतोय हे लोकांना आश्चर्याचे वाटत असेल तर हे चित्र भयावह आहे आणि एखादा आपण किती कमावतो हे सांगतोय तर ते विरंगुळा वाटत असेल तर हे चित्र निराशाजनक आहे.

>>कॉपीराईट वगैरे सारी अंधश्रद्धा असते
Rofl

>>वर्डप्रेसवर मिळतात का लेखांना पयशे?
ब्लॉगरवर अ‍ॅड्स रन करुन मिळतात. पण तो थोडा पेशन्सचा प्रकार आहे. म्हणजे लगेच काही छापायला सुरुवात होणार नाही. पण एक मार्ग आहे.

शुभेच्छा Happy

ऋन्मेष मायबोलीच्या पेरोल वर आहे हे अजूनही लोकांना माहित नाही याचे आश्चर्य वाटले.
इतके धागे , इतके प्रतिसाद, मायबोलीचे ट्राफिक सतत फ्लो मध्ये ठेवणे - इतका वेळ घालवणे -कोणी फुकट करेल का?

ऋन्मेष मायबोलीच्या पेरोल वर आहे हे अजूनही लोकांना माहित नाही याचे आश्चर्य वाटले. >> अगदी अगदी! तो माबोच्या, शाखाच्या, स्वजोच्या पेरोल वर आहेच मुळी! इतका वेळ घालवणे -कोणी फुकट करेल का?

शाखा स्वजो मुद्दाम निवडले कारण ते डोक्यात जाणारे भरपूर माबोकर आहेत... त्यांचा उपयोग फक्त प्रतिसाद वाढवायला... मुख्य हेतू माबोची ट्राफिक वाढवणे...

मुख्य हेतू माबोची ट्राफिक वाढवणे... >> नाही हो नाही! एकदम म.म विचार केला ना तुम्ही! मल्टिपल पेरोल रन झाला तर खरा पैसा. डोक्यात जाणारे आणखी बरेच आहेत हो! पण हेच का निवडले? कारण त्यांनी डील केलं. बाकीचे कंजुष निघाले.

पैसे मिळाले असते... बक्कळ मिळाले असते पण दोन अक्षम्य चुका झालेल्या आहेत.
(१) पहिलाच धागा काढतांना इंग्रजीचा आधार घ्यावा लागणे. मराठीला वाईट वाटले.
(२) धागा काढतांना भ्रमणध्वनी क्रमांक देणे, एक नाही तब्बल दोन. अवशक्ता नव्हती आणि त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता आहे हे माहित नसणे किंवा त्याबद्दल निष्काळजी असणे.

आता आलेच आहात तर खुशाल लिहा... पैसे मिळतील अशी अपेक्षा ठेवायची नाही... पैशापेक्षापण जास्त किंमती असलेले लोकांचे विचार वाचायला जरुर मिळतील आणि तुमचे विचार प्रगल्भ (आहे त्यापेक्षा अधिक) होतील.

शाखा स्वजो मुद्दाम निवडले कारण ते डोक्यात जाणारे भरपूर माबोकर आहेत...>>
महागुरु राहिले की.

शाखा स्वजो मुद्दाम निवडले कारण ते डोक्यात जाणारे भरपूर माबोकर आहेत...>>
महागुरु राहिले की.

>>>>

यशस्वी लोकांचा मत्सर करणे आणि त्यातही तो मराठीच असेल तर त्याचा खेकड्यांसारखा पाय खेचणे यासाठी दुर्दैवाने मराठी माणूस कुप्रसिद्ध आहे Sad

यावर स्वतंत्र धागा काढा कोणीतरी

पहिल्याच

पहिल्याच प्रयत्नात विचारप्रवर्तक, आणि गर्दीखेच धागा काढलात! तुम्ही यशस्वी लेखक होणार.

,Srd उत्तम
नवीन सभासदाला हुरुप वाढवणारा प्रतिसाद दिलात
अन्यथा एखादा नवीन आयडी आल्यास त्याच्या कानपट्टीवर
खवचट प्रतिसादाची बंदूक ठेऊन तो कोणाचा ड्यू आयडी तर नाही ना, त्याचे माबोवय काय आहे, त्याची शैली कोणाशी जुळते अश्या गोष्टी चेक केल्या गेल्या आणि त्याच्या अस्तित्वावरच शंका घेतली गेली तर त्या आयडीचा माबोवर बागडण्याचा उत्साह तिथेच मावळतो Sad

यावर स्वतंत्र धागा काढा कोणीतरी
>>> तुम्ही/कटप्पा/अर्चना सरकार ने असा एक धागा काढल्याचे आठवतेय....

तुम्ही/कटप्पा/अर्चना सरकार ने असा एक धागा काढल्याचे आठवतेय....
>>>
हि तीन माणसे एकच नाहीत. तुम्हाला असे म्हणायचेही नसेल. पण उगाच तसे वाटून तेच तेच दळण ईथे पुन्हा नको कोणी दळायला म्हणून आधीच विषय संपवतो हा.

बाकी असा धागा मला तरी आठवत नाही. कुठे असलाच वा कोंणी काढलाच तर मन मोकळे करायला आवडेल.

मराठीच असेल तर त्याचा खेकड्यांसारखा पाय खेचणे यासाठी दुर्दैवाने मराठी माणूस कुप्रसिद्ध आहे>>
कुठल्या जगात वावरताय तुम्ही. जेव्हा काही संकट येतं तेव्हा मदतीला धावुन जाणार्यांमध्ये मराठी माणुस आघाडीवर असतो.

कुठल्या जगात वावरताय तुम्ही. जेव्हा काही संकट येतं तेव्हा मदतीला धावुन जाणार्यांमध्ये मराठी माणुस आघाडीवर असतो.
>>>>>

ते करत असेल
मी म्हणतोय ते वेगळे आहे
हा गुण आणि तो दुर्गुण दोन्ही एकाच वेळी असू शकतात ना

आपल्यातला कोणी पुढे जात असेल तर मराठी माणुस त्याला डोक्यावर घेतो.
ही खेकड्याची उपमा मराठी माणसाला कशी चिटकली कुणास ठाऊक.

स्वानुभव वाटतं?>>> मी कुठे पकवतो मायबोलीकरांना? लोकांनाच माझे अनुभव खोटे वाटतात. भुताने कोणत्यातरी म्हाताऱ्याला सिगरेट दिलेली चालते, कोणत्यातरी ड्रायवरचा हडळीने उडत केलेला पाठलाग चालतो. पण हेच जर मी सांगितलं तर माझ्या नावाने लगेच नाक मुरडतात.

संयोग, तुम्ही लिहा, पहिले कविता, प्रवासवर्णन फोटो, छोटी कथा, मग ललित लेख, व मग खास प्रश्न घेउन असे बाफ काढा. प्रतिसाद मिळून तुमची अशी एक खास जागा तयार होईल. इथे लिहिलेले आधीचे लेख बघा. दिग्गज माबोकरांनी फार मेहनत घेउन, प्र्रूफ रिडीन्ग करून वगैरे लेख मालिका कथा, कादंबर्‍या लिहिल्या आहेत.

पैसे मिळायचे काही मला माहिती नाही.

करोना काळात तुम्हाला इथे मैत्री, आनंद व सोबत नक्की मिळेल. व काय करायचे त्याचे सल्ले पण मिळतील हार्दिक शुभेच्छा.

ऋन्मेष मायबोलीच्या पेरोल वर आहे हे अजूनही लोकांना माहित नाही याचे आश्चर्य वाटले.

क्षणभर वाटलं माबोच्या पॅरोलवर आहे.

संयोग दादा अ‍ॅज यु सेड यु आर निउ अ‍ॅज राईटर अल्सो
देन इट्स करेक्ट प्लॅटफॉर्म फॉर यु
फर्स्ट राईट फॉर युअरसेल्फ अ‍ॅंड इफ पीपल वुड लाईक ईट देन कंटीन्यु हीअर ओव्हर!!
अफ्टर गेटींग सम सॅटीस्फाईंग कॉमेंट्स राईट प्रोफेशनल फॉर युअरसेल्फ इन युअर डायरी.
लेटर वेट फॉर कोअलेसेन्स!!
विश यु ऑल दी बेस्ट

>> मायबोलीवर डोक्यात जाणार्‍या दोन गोष्टी:
१. रोमन लिपीत लिहिलेले मराठी
२. देवनागरीत लिहिलेले इंग्रजी

लेखनातून पैसे कमवायचा विचार असेल, कॉपीराईट हवा असेल तर आंतरजालावर लिहू नका.

माबोवरतर अजिबात लिहू नका. इथले लेख फक्त 30 दिवस संपादीत करता येतात; त्यानंतर ते इथे कायमचे दृश्य राहतात. नंतर पुस्तक प्रकाशित करायचे ठरले आणि प्रकाशकांनी जालावरून लेखन हटवा सांगितले, त्यानुसार तुम्ही माबोला विनंती केली, तरी ते लेखन हटवत नाहीत.

नवीन लेखक असाल, वाचकांकडून अभिप्राय हवा असेल तर 'जाहिरात' म्हणून (ज्यातून पैसे मिळणे अपेक्षीत नाही तर बिझनेस मिळणे अपेक्षित आहे) सॅम्पल लेखन फेसबुक किंवा स्वतःचा ब्लॉग करून तिथे टाका. तिथून जेव्हा हवं तेव्हा ते तुम्हाला काढून टाकता येईल.

इथे लिहायचेच असेल तर लेख टाका, १५-२० दिवसांत इथल्या सुजाण वाचकांचा अभिप्राय मिळवा आणि २० दिवसांनी स्वतःच लेख डिलीट करून टाका.