गझलेचा प्रयत्न

Submitted by प्रगल्भ on 8 July, 2020 - 02:37

जवळ येऊनही हे असे दुरावणे आले
जेव्हा तुझ्याच शब्दांत तुला मोजणे आले

आभाळाकडे मागितली माऊली मी
तसे मागून तुझ्या सावलीचे येणे आले

फाडूनी टाकली पाने जरी माझ्या गझलांची
नको असतानाही त्यांत तुला वाचणे आले

तोडूनी सारे पाश तुला भेटायला येण्याआधी
माझ्याच दाराच्या उंबर्‍यात तुझे नाकारणे आले

(माफी असावी मी माबो वर कथा/ कादंंबरी विभागात एका कादंंबरीचे भाग लिहीत होतो...अजूनही लिहीतो आहे त्यात गझलेकडे जरासे दुर्लक्ष झाले.
गझले माफ कर बाई--/\-- ! जे शिकायला आलो त्याकडेच दुर्लक्ष झालं... ध्येयाकडेच दुर्लक्ष झालं... )

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

चांगला प्रयत्न आहे.
खयाल चांगले सुचताहेत.
वृत्तांत लिहायचं जमलं की झालंच.

हे सरावाने येऊ शकते की अंगभूत असावे लागते याची कल्पना नाही.

अरे व्वा!! भरत दादा. कसे आहात. बर्‍याच दिवसांनी दिसलात
खूप खूप धन्यवाद. तुमच्या दिलेल्या लिंक्स मुळे लिहिता येतयं. मी तरी मात्रा मोजल्याच नाहीयेत. विसरलो बघा

"वृत्तांत लिहायचं जमलं की झालंच" --> यावरून आठवलं

आणि जोवर गझल ही नीटशी गझल होत नाही तोवर मी प्रयत्न करतच रहाणार आहे.
ज्या दिवशी कोणी म्हणेल "काय जमलीय गझल" किंवा "छान/सुंदर 'गझल'" तेव्हा ती गझल तुम्हाला आणि बेफिकीरनाच अर्पण केलेली असेल.

जवळ येऊनही हे असे दुरावणे आले (१६)
जेव्हा तुझ्याच शब्दांत तुला मोजणे आले (१८)

आभाळाकडे मागितली माऊली मी (१३)
तसे मागून तुझ्या सावलीचे येणे आले (१५)

फाडूनी टाकली पाने जरी माझ्या गझलांची
नको असतानाही त्यांत तुला वाचणे आले

तोडूनी सारे पाश तुला भेटायला येण्याआधी
माझ्याच दाराच्या उंबर्‍यात तुझे नाकारणे आले