केवढी

Submitted by रोहितकुलकर्णी on 6 July, 2020 - 14:16

हट्टी आहे गझल केवढी
पण शेराची मजल केवढी

स्वच्छ मनाने लिहित गेलो
कविता बनली तरल केवढी

आत्मीयतेच्या आधाराची
हुबेहूब ही नकल केवढी

ओठावर स्मितहास्य तरीपण
मनात आहे गरळ केवढी

तुझ्या मुखावर इर्षेची ही
धुसफूसणारी अनल केवढी

सुचवून गेली चारच ओळी
प्रतिभशक्ती चपळ केवढी

खरेपणाची व्याख्या आहे
सोप्पी साधी सरळ केवढी

Group content visibility: 
Public - accessible to all site users