बाईचं घरात लक्श पाहिजे

Submitted by म्हाळसा on 4 July, 2020 - 23:09

माझ्या हिट्लर आईचे घरप्रसिद्ध डायलाॅग्ज—
“हळदीचे डाग नॅपकिनला लागताच कसे“
“केसांची वाट लावलीस.. तेल घालून २ वेण्या बांधत जा“
“किती सुंदर गातेस पण आवाज बघ जरा..ओरडून ओरडून आवाजाचं खोबरं करून टाकलय“
“मुलं ऐकत नाही म्हणजे काय..पिरघळून चिमटा काढ“
“काय? मुलांना रामरक्शा येत नाही? बाईचं घरात लक्श पाहिजे“
“मुलं आईच्या डोळ्यावर असली पाहिजेत..मी बघ कसं ठेवलं तुला.. तुझी मजाल होती?”
“कांदा सांभाळून वापर..एवढ्याच कांद्यात २ भाज्या झाल्या असत्या माझ्या.. नवऱयाला रस्त्यावर आणशील“
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे माझी चाळीशी यायला अजून बरीच वर्षे बाकी आहेत तरीही
“चाळीशी यायची वेळ आली..तुमच्या पार्ट्या कधी संपणार“
.
मला खात्री आहे तुमचीही आई बरीचशी अशी असेल.. तुमच्याही आई अथवा बाबांचे किंवा इतर हिट्लर व्यक्तींचे तडकते भडकते डायलाॅग्ज येऊद्यात जरा..

कृपया करून कुठल्याही प्रकारे शाहरूखीय वळण देऊ नये Happy

Group content visibility: 
Use group defaults

माझी आई हिटलर नाही. Happy
वरच्यातला एकही डायलॉग नाही तिचा.
उलट काय अशी राहतेस. अजुन तरुणपणातच अशी गबाळेपणाने रहायला लागलीस. चांगली टापटीप रहा पहिल्यासारखी.
फक्त वायफळ खर्च केलेला आवडत नाही. आणि त्यांच्यासाठी केला असेल तर अजुनच Happy
त्यांच्यासमोर (आई पप्पा- सासु सासरे) मुलांना ओरडायची मारायची तर सोय नाही.

म्हाळसा, तुमचे लग्न झाले का? नाही, असे विचारण्याचे कारण म्हणजे मुली परदेशात असतात ते शिकायला पण जातात आणी बर्‍याचश्या लग्नानंतर पण जातात म्हणून विचारले. जर लग्न झाले असेल तर सासु-सासर्‍यांवर एक धागा काढा >>> हो झालं आहे ना लग्न.. पण सासु आई असल्यासारखी वागते आणि आई सासुसारखी..म्हणून आईवरच धागा काढावा लागला Happy

पण सासु आई असल्यासारखी वागते आणि आई सासुसारखी.
>>>

माझ्या बायकोतर्फे ईंच का पिंच..
कारण हा तिचाही फेव्हरेट डायलॉग आणि मत आहे .. तुझ्याघरचे कूल आहेत, आमच्याकडेच फार लेक्चर असते Happy

एखादी रेसिपी आईला विचारली की ती हमखास म्हणते, मन लावून कणिक भाज, चित्त थाऱ्यावर ठेवून अमुक अमुक कर..... परवा मोठ्या नातीला भांडे आवरताना पाहून म्हणे तुम्ही तिघी (तिची लेक आणि दोन नाती) आलटून पालटून भांडी आवरत जा.... एकीवरच भार नको पडू देऊ... Lol अरे ! आता मुली म्हणतात की आजीने सांगितलं होतं ना सगळ्यांनी turns घ्यायचे.... मग आज तू कर!

म्हाळसाजी तुमच्या आईला सून आहे का... तुमच्या वहिनींची मते ऐकायला मजा येईल >> हो .. माझ्या आईला सून आहे.. माझ्या भावाने माझ्या जिवलग मैत्रिणीशीच लग्न केलंय.. भाऊ आणि वहिनीही सध्या माझ्यासारखेच अमेरिकेत.. त्यामुळे आता मी आणि वहिनी एकत्र मिळून आईबद्दल गाॅसिप करतो. .एकंदरीत आता आईलाच सासुरवास भोगावा लागतोय Happy

सहमत आहे च्रप्स.
एकच स्त्री ही आई प्त्नी सासू या तिनही भुमिकांत वेगवेगळी वागू शकते.
आमच्या ऑफिसम्ध्ये सहासात बायकांच्या घोळक्यात मी एक्व्टा पुरुष जेवायला बसतो. त्यामुळे ईच्छा असो वा नसो त्यांच्या घरगुती गॉसिप गपा ऐकायला लागतात. प्रत्येकीच्या सासू नणंद जाऊ भावजय वगैरे नात्यातील बायकांबद्दल एकेक सुरस कथा असतात. सगळ्याच बायकांना आपणच कर्रेक्ट आहोत असे वाटत असते.

मार्केटमे कलइच नया आएला है -
आपल्या अमेरिकेतल्या नविन घराचा गृहप्रवेश असतो.. नविन घराच्या चावीपासून ते पूजेसाठी दागदागिने साडी नेसून आलेल्या प्रत्येक छावीचा (छाव्या म्हणजे माझ्या मैत्रिणी) फोटो व्हॅाट्सॲप स्टेटसवर लावला जातो.. मग दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डोळे चोळत व्हॅाट्सॲप उघडतो तेव्हा तीस एक शुभेच्छांचे मेसेजेस असतात.. कोण नविन घराचं कौतुक करत असतं तर कोण आपल्या साडीचं, कोणी घराचा पत्ता मागत असतं तर कोणी पार्टी.. पण ह्या सगळ्यात आपल्या एका सुंदरश्या साडीतल्या सोलोफोटोवर कधी नव्हे ते आईची कमेंट पडलेली असते.. तीने आपलं काय, किती आणि कसं कौतुक केलंय म्हणून आपण तो मेसेज उघडतो आणि त्यात लिहीलेलं असतं -
“साडी नेसलीस पण मंगळसूत्र कुठंय?”

माझ्या वडिलांना मुलांनी चहा पिलेला चालायचं नाही. मग आम्ही ते घरात नसताना चहा प्यायचो.एकदा आम्ही चोरून  चहा पीत असताना ते अचानकच आले आणि खूप चिडून फक्त एवढंच म्हणाले, 'चहा प्या आणि मरा'. आणि लगेच रागाने घराबाहेर निघूनही गेले.आम्ही निर्लज्ज, हसत सुटलो होतो सगळे.  मग आम्ही कुणी चहा मागितला की म्हणायचो, चहा प्या आणि मरा. कधी कधी पालक अगदीच टोकाचं बोलतात. 

साडी नेसलीस पण मंगळसूत्र कुठंय?”>>> अगदी अगदी.
Rofl
मस्त आहे धागा. टिकली कुठाय?? रीप जिन्स ला फाटकी चड्डी म्हणणे.. केस कुरळे असल्याने ते विंचरून पण केस तरी विंचरायचे अशी टीप्पणी टाकणे वगैरे Wink
हॉटेल डिशेस चे फोटो टाकल्यास, हावरट अशी कमेंट करणे Wink

हाहा. काही तयारी केली आणि आईला दाखवली तर टिकली लाव, हातात काहीतरी घाल ही वाक्यं येतातच.

केस कुरळे असल्याने ते विंचरून पण केस तरी विंचरायचे अशी टीप्पणी टाकणे वगैरे >>>> अगदी, मला तर तेल लावून विंचरण्याचे आदेश असायचे.
आईचा सगळ्यात आवडता डायलॉग, फेक तो फोन आधी Wink Proud

“साडी नेसलीस पण मंगळसूत्र कुठंय?”>>
ब्लाऊज नीट शिवून घेतली नाहीस. तुला सांगत होते नेहमीचा आपला लिमराज बरा. (आमचा कोल्हापुर मधला टेलर.)

रीप जिन्स ला फाटकी चड्डी म्हणणे.. केस कुरळे असल्याने ते विंचरून पण केस तरी विंचरायचे अशी टीप्पणी टाकणे वगैरे Wink>>
आशु२९, तुम्ही मला एकदम जाणिव करुन दिली कि मी आता आमच्या 'आईसाहेब' झाली आहे. Lol
मुलीला आणि भाच्याला हे सगळे डायलॉग म्हणते मी.
भाचा ते कपाळावर झुल्फ फिरवित अस्तो. सगळ कपाळ झाकून जात. खाली मास्क. मग फक्त डोळे तेवढेच दिसतात. त्यात हातात फोन.

टिकली कुठाय?? रीप जिन्स ला फाटकी चड्डी म्हणणे.. केस कुरळे असल्याने ते विंचरून पण केस तरी विंचरायचे अशी टीप्पणी टाकणे वगैरे>> माझ्या आईकडे ह्या साठी खास शब्द आहेत, “लंकेची पार्वती“.. ह्यात टिकली, बांगड्या, मंगळसूत्र, जोडव्या, कंगवा, फाटकी जिन्स असं सगळंच येतं Proud

माझी आई हिटलर नाही. Happy
वरच्यातला एकही डायलॉग नाही तिचा....+१.

पण तुझा लेख आवडला.

आईचा महाखतरनाक डायलॉग म्हणजे मी तुझ्या जागी असते तर अमुक तमुक केले नसते/तसा विचार केला नसता.
या डायलॉग मुळे मी टेकीला आले होते/आहे.कितीवेळा सांगितले की तू आणि मी दोन वेगळ्या व्यक्ती आहोत.वेगळे विचार करणार.पण नाही.लोकरंगमधील एका लेखामुळे शेवटी तिला ते पटवून घ्यावे लागले.पण आदत्से मजबूर आहेच.

Pages