बाईचं घरात लक्श पाहिजे

Submitted by म्हाळसा on 4 July, 2020 - 23:09

माझ्या हिट्लर आईचे घरप्रसिद्ध डायलाॅग्ज—
“हळदीचे डाग नॅपकिनला लागताच कसे“
“केसांची वाट लावलीस.. तेल घालून २ वेण्या बांधत जा“
“किती सुंदर गातेस पण आवाज बघ जरा..ओरडून ओरडून आवाजाचं खोबरं करून टाकलय“
“मुलं ऐकत नाही म्हणजे काय..पिरघळून चिमटा काढ“
“काय? मुलांना रामरक्शा येत नाही? बाईचं घरात लक्श पाहिजे“
“मुलं आईच्या डोळ्यावर असली पाहिजेत..मी बघ कसं ठेवलं तुला.. तुझी मजाल होती?”
“कांदा सांभाळून वापर..एवढ्याच कांद्यात २ भाज्या झाल्या असत्या माझ्या.. नवऱयाला रस्त्यावर आणशील“
आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे माझी चाळीशी यायला अजून बरीच वर्षे बाकी आहेत तरीही
“चाळीशी यायची वेळ आली..तुमच्या पार्ट्या कधी संपणार“
.
मला खात्री आहे तुमचीही आई बरीचशी अशी असेल.. तुमच्याही आई अथवा बाबांचे किंवा इतर हिट्लर व्यक्तींचे तडकते भडकते डायलाॅग्ज येऊद्यात जरा..

कृपया करून कुठल्याही प्रकारे शाहरूखीय वळण देऊ नये Happy

Group content visibility: 
Use group defaults

"तुझं लक्षच नसतं"
"किती वेळ लावतेस,आवर पटापट खेळत बसू नको"
"एक काम धड करता येत नाही "
"1760 वेळा सांगितलंय "

महाश्वेता ने नॉर्मली लिहलं आहे ना की मला जोक समजला नाही,स्ट्रेनजर Uhoh

बरेच सेम डायलॉग आहेत,फक्त मुलांच्या बाबतीतले सोडून, मुलांना हलका फटका दिला तरी कित्ती कित्ती मारते,कोडगा होईल ,रडवू नको पोरांना उगीच असं म्हटलं जातं ,जसं काही आमची रोज फुलांनी आरती असायची लहानपणी Lol

@आदू -
जन्मताच तो डोक्यावर पडलाय. बाकी काही नाही Happy

मग सगळ्या धाग्यांवर घाण करत फिरण्यापेक्षा नवीन धागा काढ ना?
उगीच बाकीच्या लोकांना त्रास कशाला?
@म्हाळसा - सॉरी. खरंच तुमच्या धाग्यावर हे असं चालू व्हावं याच मला मनापासून वाईट वाटत.

हे मस्तय ...

गळके हात आणि फुटके डोळे ... हे बाबांनी दिलेलं pet name

“चाळीशी यायची वेळ आली..तुमच्या पार्ट्या कधी संपणार“ >> माझी आई याला 'यात्रा कमी करा' म्हणते .

केस कापले की.. भुंडी दिसतेयस,लिपस्टिक लावल्यावर ..रंगवलेलं तोंड ... etc. etc .

एकंदर अतिशयोक्ती अलंकार Lol

बायको म्हणते
कोई धंदा छोटा या बडा नही होता
और धंदे से बडा कोई धरम नही होता
.... आणि असे बोलून मला घरातला कचरा काढायला लावते Happy

काही नाही हो, खालील धाग्यावरचे सप्रस यांचे प्रतिसाद बघा पहिल्याच पानावर.>>>>स्ट्रेंजर जुन्या गोष्टी उकरून काढणे चुकीचे आहे,ते ही उगीच आणि तिसऱ्या च धाग्यावर

खरंतर माझीच चूक झाली,माझं प्रश्न विचारण चुकलं

असे बोलून मला घरातला कचरा काढायला लावते>> नशिबवान आहात फक्त कचराच काढायला लावते..आमच्याकडे तर “बघा घरात किती कामं असतात बायकांना“ असं मी काहीतरी बोलताच, नवरा डिशवाॅशर मधली भांडी जागच्या जागी लावणे, कपड्यांच्या घड्या घालणे, रात्री झोपण्या आधी उरलेल् जेवण फ्रिजमधे काढून ठेवणे इ. बरीच कामे करतो.. मुलांना नाही पण नवऱयाला बरोबर डोळ्यावर ठेवलय Happy

डोळ्यावर ठेवणे म्हणजे काय
>>>>
पलको पे रखना चे मराठी वर्जन

नशिबवान आहात फक्त कचराच काढायला >>>> नाही. तो डायलॉग फक्त कचरा काढायचा. दर कामाचा वेगळा डायलॉग आहे. त्यामुळे मलाही काम करायला बरं बाटते.

डोळ्यावर ठेवणे म्हणजे काय
>>>>
पलको पे रखना चे मराठी वर्जन
>>>
मला वाटते, 'पलको पे रखना' याचा अर्थ फार जपणे किंवा फार काळजी घेणे असा आहे, control मध्ये ठेवणे नव्हे!

पलको पे रखना' याचा अर्थ फार जपणे किंवा फार काळजी घेणे असा आहे, control मध्ये ठेवणे नव्हे!
>>>

पण या अतिकाळजीच्या नादात होते तेच. समोरच्याच्या आयुष्यात ढवळाढवळ करत ते आपल्या कंट्रोलमध्ये ठेवण्याचा अट्टाहासच होतो.

च्रप्स तुम्ही मायबोलीचे मांडवली बादशाह आहात. नेहमी तट्स्थ विचार करत म्याटर सॉल्व्ह करून टाकता.

चला आता डायलॉग येऊद्या आपापल्या आई बाबा बायको नवरा यांचे.. नवीन सभसदांचा धागा भरकटता कामा नये Happy

नवीन सभसदांचा धागा भरकटता कामा नये >>
तुम्ही नवीन सभासदांना जे प्रोत्साहन देता, ते पाहून खुप कौतुक वाटतं.

आई- घरी आलीस?
मी- हो आई.
आई - जेवलीस?
मी- हो.
आई- आता झोप
मी - हो
आई- फोन बाजूला ठेव.
मी- काही व्हाॅट्स ॲप मेसेजेस ना रिप्लाय करायचाय
आई- फोनला आग लाव त्या.. व्हाॅट्स ॲपचे सगळे लोक गेले तेल लावत.
मी- बाय आई.

म्हाळसा, तुमचे लग्न झाले का? नाही, असे विचारण्याचे कारण म्हणजे मुली परदेशात असतात ते शिकायला पण जातात आणी बर्‍याचश्या लग्नानंतर पण जातात म्हणून विचारले. जर लग्न झाले असेल तर सासु-सासर्‍यांवर एक धागा काढा. Proud ( जमले तर मी काढेन, पण सध्या मला गाण्यांवर लिहायचे आहे )

सासरच्या लोकांचे सुनेला टोमणे मारतांना लेकी बोले सुने लागे फार भारी असते.

सासरच्या लोकांचे सुनेला टोमणे मारतांना लेकी बोले सुने लागे फार भारी असते.
>>>>

हे आता फक्त गावखेड्यात होत असावे. शहरी भागात सून राहिलीच सासरच्यांसोबत तर त्यांनाच बिचारयांना ऐकून घ्यावे लागत असेल. नवरयाला बोले सासूसासरयाला लागे होत असावे. चालायचेच. ज्याच्या हातात काठी त्याचाच आवाज.

मी- काही व्हाॅट्स ॲप मेसेजेस ना रिप्लाय करायचाय
>>>>
हे मी सुद्धा घरी बोलतो. जणू काही इम्पॉर्टण्ट मेलना रिप्लाय करायचाय या आविर्भावात.
आई भोळीभाबडी. तिला ते पटते.
बायको चिडते. अहो आई कसले मेसेज आणि रिप्लाय. याला तिथे नुसता वाद घालायचा असतो Proud

Pages