सेलिब्रिटी क्रश

Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 07:58

आमिर खान ‘कयामत से कयामत तक ‘ मधे विवाहीत असल्याचं कळाल्यावर तुमच्यापैकी किती जणांच्या ह्रदयाचा ठोका चुकला होता?( जसं कि विवाहीत नसता तर तुमच्या बरोबरच संसार थाटणार होता)
.
आणि किती जणांना तेव्हा हे माहिती होतं की पाप केहते है मधे ती लाल कपडे घातलेली त्याची बायको आहे ते..
.
लहानपणी अशा सगळ्या माहितीचा प्रसार मी टेडटाॅक मधे बोलल्या प्रमाणे करायचे...
.
देवा काय दिवस होते ते.. लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा कमी लक्श देऊन जरा जास्त आभ्यास केला असता तर आज नक्कीच कुठे तरी टेडटाॅक देत असते..
.
तुम्ही पण असे टेडटाॅक दिलेत का अथवा अजूनही देता का? तुमच्या आवडत्या नट अथव नटीच्या लग्नाची बातमी कानावर पडता हळहळ व्यक्त करता का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सेम हिअर,पण त्याच लग्न झालेले समजलं आणि सगळं टाकून दिलं Lol जसं काही तो 1माझ्याशीच लग्न करणार होता Lol>>>> Rofl
साऊथ सुपरस्टार अजित पण कसला आहे. बदाम बदाम बदाम. पिकलेले केस एवढे शोभून दिसणारा मिसो नंतर तोच असावा बहुतेक.

माझ्या अख्ख्याच्या आख्या धाग्यांनी खरेच कोणी अनकनफर्मटेबल होत असेल तर आज वचन देतो तुम्हाला नाही काढणार अख्खा धागा. यापुढे एक शब्द वाचकांना गेस करायला नक्की सोडणार दरव्वेळी.>>

पण म्हणजे अन कम्फर्टेबल करायचं काही सोडणार नाहीस तर

म्हाळसा ,
तसे पाहता ऋ माबो वरचा सेलेब्रिटी आहे आणि इथल्या अनेक जणांचा तो क्रश वगैरे जरी असला तरी हे अवांतरच
तर अवांतराकरता क्षमस्व.

हर्पेन आधी चिडवा मग कौतुक करा..
असो जास्त अवांतर नको. आधीच ईथे शाहरूखच्या पोस्टही विषयाला धरून असल्या तरी अवांतरच समजल्या जातात.

असो,
वर द्रविड लिहिलेय त्यावरून आठवले.
दादा माझा क्रश होता. मी दादाचे फोटो आणि माझे फोटो यांचे कोलाज करायचो. त्याची प्रत्येक खेळीनंतर त्याचा रेकॉर्ड माझ्या एक्सेलशीटमध्ये अपडेट करायचो. दादाने सचिनपेक्षा जास्त रन्स मारले तर आनंद व्हायचा. दादा लवकर बाद झाला तर सचिनही बाद व्हावा असे मनोमन वाटायचे. लॉर्डसवर दादाने फिरवलेले टीशर्ट आजही माझ्या आयुष्यातील बेस्ट क्रिकेट मोमेंट आहे आणि कायम राहील. आजही दादा माझा आवडताच खेळाडू आहे. पण तेव्हा आपण त्यासाठी एवढे पागल होतो याचे हसायला येते. त्याच्या प्रेमापोटी अगदी मी डाव्या हाताने फलंदाजीही सुरू केलेली. ते देखील वर्ष दिड वर्षे करत होतो Happy
जोक्स द अपार्ट - आपल्या क्रशला दादा बोलणारे फार कमी असतील या जगात Happy

पण क्रश हा विचित्रच प्रकार असतो. त्या त्या वयात वा त्या ठराविक काळात आपल्याला कोण आवडेल हे सांगता येत नाही. नंतर हसायलाही येते.

नेहा धुपिया - नवीनच आलेली तेव्हा हि सुद्धा माझा क्रश होती. नेहा धुपिया की बिपाशा बासू याबाबत मी काही काळ कनफ्यूज होतो. पण नेहाने बाजी मारली. तिचे सौंदर्य वेगळ्याच पठडीतले होते. आणि त्या वयात ते फारच आकर्षक किंवा ईंग्लिशमध्ये सांगायचे झाल्यास हॉट आणि सेक्सी वाटलेले. कदाचित चार सहा महिने वा वर्षभर. नंतर माझी मते विचार बदलले तसे हे क्रश मागे पडले. तरी आजही नेहा धुपियाला स्क्रीनवर बघून आतून सुखावतो. हल्लीच तिला देवी शॉर्ट फिल्म आणि तुम्हारी (कि हमारी?) सुल्लू मध्ये पाहिलेले. ती स्क्रीनवर असताना आजही ईतरांना झाकोळून टाकते हे खरेय

ती स्क्रीनवर असताना आजही ईतरांना झाकोळून टाकते हे खरेय>>हो मलाही तसेच वाटतं, मी फक्त एकच picture बघितला आहे तसा
ती सलमान,गोविंदा आणि कतरीना अशा जोड्या असतात
त्यात ती कतरीना पेक्षा छान दिसलीये

मुव्हीच नाव आठवत नाही सलमान लवगुरु असतो आणि नेहा सिंगल पैरेंट असते

मुव्हीच नाव आठवत नाही सलमान लवगुरु असतो आणि नेहा सिंगल पैरेंट असते
>>>

ती लारा दत्ता
पिक्चर पार्टनर
ती सुद्धा आवडीची आहे माझ्या. तिचे सौंदर्य टिपिकल नाही. लक्षवेधक आहे.

त्यात ती कतरीना पेक्षा छान दिसलीये
>>>
कतरीना खूप आधी ती लहान आणि नाजूकशी असताना आवडायची. त्यानंतर बाई झाली तसे तिचे सौंदर्य टिपिकल झाले

क्रश नेहमी सौंदर्यासक्त का असतो ? गुणासक्त असेल तर अधिक फायद्याचा ठरेल ना !
>>>>

जर माझे सेक्शुअल ओरिएंटेशन स्ट्रेट असेल पण तरीही माझा क्रश पुरुष असेल तर तो सौंदर्यासक्त नसून गुणासक्तच झाला ना.. की हे चुकीचे लॉजिक आहे?

राहुल द्रविड़ (त्याच्यासारखे कौशल्य वाढवण्यास भर दिला तर) गुणासक्त क्रश म्हणेन पण नुसते दिसतो छान म्हणत क्रश असला तर तो काय किंवा हीरो हीरोइन काय सर्व सौंदर्यासक्त क्रश मध्येच मोड़तील (निवडक अपवाद वगळता)

गुण दोष बघून जी आवडते ते क्रश कसे असेल.... क्रश म्हणजे इनफ़ॅच्युएशन ...

बादवे - राहुल द्रविड दिसतो छान म्हणूनच क्रश असावा...
तेंडुलकर नसता का क्रश मग मुलींचा...

एक एक्स फॅक्टर असतो जो आकर्षित करतो...

तेंडुलकर नसता का क्रश मग मुलींचा...
>>>>>
होता की.. सोळाव्या वर्षी पदार्पण केले तेव्हाच झालेला. त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीही त्याच्या प्रेमात पडलेल्या Happy आणि कोणाला काही कळायच्या आतच चटकन त्याने लग्न केले.

बाकी दिसण्याचा स्टाईलचा एक्स फॅक्टरचा मुद्दा योग्यच आहे.
त्यमुळेच कोहली धोनी युवराज हे खेळाडू याबाबतीत शर्मा धवन रैना रहाणे पुजारा अश्या खेळाडूंपेक्षा भाव खाऊन जातात

कुठल्याही हिरोपेक्षा राहूल द्रविड जाम cute वाटायचा.>>yess... द्रवीड चा धीरगंभीर पणा ,maturity फार आवडायची..
Rhtdm ani Mechanical engineer ..यामुळे mechanical ची मुल फार manly वाटायची.. आणि आमची सॉफ्टवेअर वाली चम्या वाटायची... आणि नवरा ही mechanical वाला च.मिळाला या नादात की काय माहीत नाही... Lol

ऋन्मेष ... दादा आणि शाखा मला पण कॉलेज मध्ये असताना प्रचंड आवडायचे..यावरून कॉलेज चा ग्रुप यथेच्छ चिडवायचा
KKR शाहरुख ने घेतल्यावर एकदम भारी वाटलं होतं..
गांगुली ला टीम मधून काढल्यावर, कधीतरी तो पुण्यात नेहरू स्टेडियम ला एक रणजी मॅच खेळणार होता.मी आमच्या ग्रुप ला खूप convince करून घेऊन गेले होते.बहुतेक मी एकटीच मुलगी होते पूर्ण स्टेडियम मध्ये. दुसऱ्या दिवशी एका मैत्रिणीला पण घेऊन गेले मग Happy

तसे पाहता ऋ माबो वरचा सेलेब्रिटी आहे आणि इथल्या अनेक जणांचा तो क्रश वगैरे जरी असला तरी हे अवांतरच
तर अवांतराकरता क्षमस्व.>> हर्पेन तुम्ही ऋन्मेषला जरा जास्तच लाईम लाईट दिलात Happy

ऋन्मेष खरेच क्रश असू शकेल काहींचा... पण त्याने स्वतःची खरी ओळख दाखवली त्यामुळे काही क्रश का दिल टूटा होगा...

अरे विषय बदला मला लाजवू नका प्लीज. मी स्वत:च स्वताचे कौतुक करण्यात कम्फर्टेबल असतो. दुसरयाने चार चांगले शब्द म्हटले की मग मला काय करायचे सुचत नाही.

१. रॉजर फेडरर - शांत आणि अतिशय कम्पोस्ड
२. सोफी टर्नर - ही दिसायला जितकी सुंदर दिसते, त्याशिवाय बोलतेही छान
३. वाणी कपूर - किलर स्माईल, आणि खट्याळपणा
४. ब्रॅड पिट - हँडसम आणि ग्रेसफुली एजिंग
५. श्रद्धा कपूर - ही एक सामान्य पण गोड मुलगी वाटते, आजूबाजूला वावरणारी
६. अजितकुमार - सॉल्ट पेपर लूक प्रचंड आवडतो.
७. महेश बाबू - पर्सनालिटी आणि वावर सुद्धा.
८. Alexandra daddrio - न जाणे का, आमच्या चेहऱ्यात प्रचंड साम्य आहे, असं लोक म्हणतात. पण हीचे डोळे प्रचंड सुंदर आहेत.

६. अजितकुमार - सॉल्ट पेपर लूक प्रचंड आवडतो.
७. महेश बाबू - पर्सनालिटी आणि वावर सुद्धा.
>>>>>

नॉन बॉलीवूड कलाकार आहेत का हे?

७. महेश बाबू - पर्सनालिटी आणि वावर सुद्धा.
>>>>> yesssss हा कसा विसरले मी,हा तर हल्लीचा क्रश होता,सध्या डोक्यातून गेला
नम्रता शिरोडकर चा नवरा

साऊथचे सुपरस्टार्स आहेत ते.
>>>
ओके मी बघत नाही तिकडचे चित्रपट.
कमल हसन, रजनीकांत वा नागार्जुन असे जे बॉलीवूडमध्ये स्वत:ला आजमवतात तेच माहीत आहेत. आणि मध्यंतरी कोण आलेला तो व्हाई धिस कोलावरी डी, एका चित्रपटातही होता, तो एक चेहरयाने ठाऊक आहे.

पण तिथे चिकने चोपडे नसलेलेही स्टाईल मारत हिरो बनतात हे फार आवडते. बॉलीवूडमध्ये हिरो बनायला तुम्ही देखणे दिवे हवे हे रुचत नाही.

मिलिन्द सोमण, जॉन एब्राहम, आर माधवन, अर्विन्द स्वामी (ओन्लि फॉर रोजा), डेव्हिड बेखम जाम क्रश.

बाकी काय घाण पसरतायेत शा खा शा खा करून? स्वदेस, डीडीएल्जे आणि दिल से मधे हार्ट बीट चुकली होती, पण क्रश नाही.

स्वदेस, डीडीएल्जे आणि दिल से मधे हार्ट बीट चुकली होती,
Submitted by aashu29 on 5 July, 2020 - 15:17

>>>>
+७८६
दिल से !

स्पेशली तो रेल्वे स्टेशनचा सुरुवातीचा सीन. रात्रीची वेळ. सुनसान स्टेशन. भिजलेला शाहरूख. मरणाची थंडी. हातात चहाचे दोन गरम ग्लास. त्यात पावसाचे टपटप पडणारे पाणी. आणि त्याची ती आर्त हाक.. ओयेss.. मी मनिषा कोईरालाच्या जागी असतो तर ट्रेनमधून उडी टाकली असती Happy

Pages