सेलिब्रिटी क्रश

Submitted by म्हाळसा on 2 July, 2020 - 07:58

आमिर खान ‘कयामत से कयामत तक ‘ मधे विवाहीत असल्याचं कळाल्यावर तुमच्यापैकी किती जणांच्या ह्रदयाचा ठोका चुकला होता?( जसं कि विवाहीत नसता तर तुमच्या बरोबरच संसार थाटणार होता)
.
आणि किती जणांना तेव्हा हे माहिती होतं की पाप केहते है मधे ती लाल कपडे घातलेली त्याची बायको आहे ते..
.
लहानपणी अशा सगळ्या माहितीचा प्रसार मी टेडटाॅक मधे बोलल्या प्रमाणे करायचे...
.
देवा काय दिवस होते ते.. लहानपणी ह्या सगळ्या गोष्टींकडे जरा कमी लक्श देऊन जरा जास्त आभ्यास केला असता तर आज नक्कीच कुठे तरी टेडटाॅक देत असते..
.
तुम्ही पण असे टेडटाॅक दिलेत का अथवा अजूनही देता का? तुमच्या आवडत्या नट अथव नटीच्या लग्नाची बातमी कानावर पडता हळहळ व्यक्त करता का?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

इथे एक मान्यवर आहेत ते देतील हवे तेव्ढे ज्ञान.
क्रश म्हणजे काल्पनिक इमेज वर प्रेम. मला सलीम फेकू फार आवड्तो.

अच्छा तो हैदराबादचा सलीम फेकू का? पूर्वी काही व्हिडीओज बघण्यात आले होते.. आधी मुंबईतल्या सगळ्यांचा नंबर लाऊ देत मग गाडी हैदराबादला वळवेन 

लहानपणी अशा सगळ्या माहितीचा प्रसार मी टेडटाॅक मधे बोलल्या प्रमाणे करायचे...
>>>

हे काही कळलं नाही. उदाहरणादाखल लिंक मिळेल का?

माझी वयात येतानाची म्हणजे अगदी पौगंडावस्थेतील पहिला क्रश मनिषा कोईराला. तिला ते अग्नीसाक्षी आणि बॉम्बे (आताची मुंबई) मध्ये पाहिलेले आणि बस्स! वेडा झालेलो. ..

माझा या क्रश प्रकरणावर एक धागाही होता. पण मला या ॲपमधून लिंक देता येत नाही.
तू ही रे तेरे बिना मी कैसे जिऊ हे गाणे मला आजही बालपणात घेऊन जाते आणि नॉस्टॅल्जिक करते. पुढे जाऊन माझे पहिले प्रेम जे होते ती मुलगी सुद्धा मला सेम मनिषा कोईराला वाटायची. किंबहुना तेच कारण असावे तिच्या प्रेमात पडायचे.
कारण जेव्हा प्रियांका चोप्रा माझे क्रश झाली तेव्हा मी तिच्यासारख्याच दिसणारया मुलीच्या प्रेमात पडलो होतो. बहुधा हे सर्वांशी होत असावे.

येनी वेज
तुम्ही बहुधा माझ्याच जनरेशनच्या असाव्यात. कारण आमच्या बॅचच्याही अर्ध्या मुली आमीरवर पागल होत्या. आणि माझ्या बॅडलकने मी शाहरूख होतो Sad

तुम्ही बहुधा माझ्याच जनरेशनच्या असाव्यात. कारण आमच्या बॅचच्याही अर्ध्या मुली आमीरवर पागल होत्या. >> ऋन्मेष.. नाही ओ..मी तुमच्याहून १ जनरेशन लहान आहे. माझ्या बॅचच्या सगळ्याच मुली ह्रितिकवर फिदा होत्या.. त्यामुळे शाहरूख म्हटलं की ह्रितिकचा मोठा भाऊच डोळ्यासमोर उभा राहतो Happy

अमीर - कयामत से कयामत- क्रश- त्याची बायको हे समजावलेत तेंव्हाच तुमची जेनेरेशन कळली... आता कशाला सारवासारव Happy

अमीर - कयामत से कयामत- क्रश- त्याची बायको हे समजावलेत तेंव्हाच तुमची जेनेरेशन कळली...
>>>>
क्रश हा प्रकार साधारण कितव्या वर्षापासून सुरू होत असावा यावर हे अवलंबून आहे.
शाळेत आमीर अणि कॉलेजात हृतिक असे असू शकते

माझ्या बॅचच्या सगळ्याच मुली ह्रितिकवर फिदा होत्या..
>>>>
हृतिकवर मुली मुले जे कोणी असतील ते केवळ कहो ना प्यार है काळातच फिदा होते. मग लगेच त्याची हवा घसरली आणि एका लिमिटला सेटल झाली पण त्या वर्षी त्याने शाहरूखलाही टेंशन आणलेले हे शहरूखने एकदा स्वतावरच विनोद करताना कबूल केलेले.नंतर मात्र एका कार्यक्रमात त्याने हृतिकला रोमान्स कसा करावा हे शिकवले होते Happy

अमीर - कयामत से कयामत- क्रश- त्याची बायको हे समजावलेत तेंव्हाच तुमची जेनेरेशन कळली... आता कशाला सारवासारव >> सही बात है.

मग लगेच त्याची हवा घसरली >> हवा घसरवण्यासाठी करण जोहरच कारणीभूत.. तो शाहरूखच्या बचावासाठी धाऊन आला आणि ह्रितिकला कभी खुशी कभी गम चं आमिष दाखवून सगळा लाईम लाईट पुन्हा शाहरूखकडे वळवला..आत सिनेमा ह्रितिकने केला नसता तर आज कुठच्या कुठे असता.

काही म्हणा, पण अमीर आणि अजय पुढे शारुखचं काही चाललं नाही.>> अगदी बरोबर.. आणि चालणारही कसे .. त्याला अजूनही त्याच्या गालावरच्या पडणाऱया खळीचेच काैतुक आहे.. आणि लहान दिसण्यासाठी चक्क झिरो सारखा सिनेमाही केला. एका अर्थी बरच झालं केला ते. तेव्हापासून गायबच आहे Happy

आणि लहान दिसण्यासाठी चक्क झिरो सारखा सिनेमाही केला >> Lol
शारुखला जर अमीरचे दंगल, पीके, मंगल पांडे यासारखे पिक्चर मिळाले असते तर..

ह्रितिकला कभी खुशी कभी गम चं आमिष दाखवून सगळा लाईम लाईट पुन्हा शाहरूखकडे वळवला
>>>>

मुझसे दोस्ती करोगी आणि मै प्रेम कि दिवानी हू सारखे चित्रपट देणारया हृतिकला कभी खुशी कभी गम हा करीअरला चालना देणारा चित्रपट ठरला असावा. आणि तसे त्यात अमिताभही होताच. पण शाहरूखच्या स्टारडमला मात देणे शक्य नाही हे त्यांना चित्रपट साईन करतानाच समजले नाही का? करण जोहरने काय फसवले यात?

एका अर्थी बरच झालं केला ते. तेव्हापासून गायबच आहे Happy
>>>
गायब नाहीये.
त्या दिवशीही कोरोनाच्या धाग्यावर पाकिस्तानला ५५ कोटी देणारा शाहरूख कुठे गायब आहे असा सवाल एकांनी केला होता. पुढे शाहरूखने केलेल्या मदतीच्या बातम्या धडाधड येऊ लागल्या.
मुळात तुम्ही शाहरूखचे अस्तित्व फक्त त्याच्या येणारया चित्रपटातून जोखता आहात. तो भारतातील सर्वात मोठा ब्रांड आहे. आजही तुम्ही त्याला रोज जाहीरातीत बघत असाल. न्यूजमध्ये ऐकत असाल, पेज थ्रीवर वाचत असाल...

शारुखला जर अमीरचे दंगल, पीके, मंगल पांडे यासारखे पिक्चर मिळाले असते तर..
>>>>

मग जे शाहरूखला मिळाले ते कोण्या दुसरयाला मिळाले असते. जे मला कधीच मान्य नसते.

तसे त्यात अमिताभही होताच. पण शाहरूखच्या स्टारडमला मात देणे शक्य नाही हे त्यांना चित्रपट साईन करतानाच समजले नाही का?>>> कर्जमुक्तीतून बाहेर येण्यासाठी लोकं कधी कधी नमतं घेतात आणि म्हणूनच अमिताभने तो चित्रपट स्विकारला.. करण आणि शाहरूख सारख्यांनी ह्याचा फायदा उचलला Happy

मग जे शाहरूखला मिळाले ते कोण्या दुसरयाला मिळाले असते>> दुस-या कोणाला मिळाले असते तर त्यानेही त्याच्या परीने सोनं केलं असतं. पण विचार करा दंगल मध्ये अमीर ऐवजी शारुख असता तर..

कर्जमुक्तीतून बाहेर येण्यासाठी लोकं कधी कधी नमतं घेतात
>>>>
हाच फरक आहे शहरूख आणि ईतरांमध्ये.. तो बॉर्नच रूल करायला झाला आहे. तो जन्मताच किंग खान होता.

वन डे आई विल रुल धिस सिटी हे गूगल करून बघा एकदा Happy

दुस-या कोणाला मिळाले असते तर त्यानेही त्याच्या परीने सोनं केलं असतं.
>>>>
विचारही करवत नाही शाहरूखच्या जागी कोणी दुसरा ...

पण विचार करा दंगल मध्ये अमीर ऐवजी शारुख असता तर..
.>>>>>>
विचार केला

हाच फरक आहे शहरूख आणि ईतरांमध्ये.. तो बॉर्नच रूल करायला झाला आहे. तो जन्मताच किंग खान होता.>> हा हा .. दुसर्यांच्या लग्नात पैसे घेऊन परफाॅमन्स देणारा किंग?

दुस-या कोणाला मिळाले असते तर त्यानेही त्याच्या परीने सोनं केलं असतं. पण विचार करा दंगल मध्ये अमीर ऐवजी शारुख असता तर >> विचारही करवत नाही.. सगळ्यात आधी वय लपवण्यासाठी वाढवलेले केस त्याने कापले नसते आणि झिपऱया पेहेलवान मी तरी बघितला नाही कधी.

. झिपऱया पेहेलवान मी तरी बघितला नाही कधी>>>

झिपऱ्या आणि हाडकलेला....

हल्ली शाहरुख मायकेल जॅक्सनची आठवण करून देतो. मायकेलपण नंतर असाच भयाण दिसायला लागलेला. जसे आहोत तसे नॉर्मल राहायला तर यांना काय त्रास आहे. अक्षय कुमार बघा.. आता ज्या वयात आहे तसाच दिसतो.

त्या दिवशीही कोरोनाच्या धाग्यावर पाकिस्तानला ५५ कोटी देणारा शाहरूख कुठे गायब आहे असा सवाल एकांनी केला होता. पुढे शाहरूखने केलेल्या मदतीच्या बातम्या धडाधड येऊ लागल्या.>>>>>> असे म्हणतात की ज्याने दगड मारला त्याचा सूड घेण्या साठी तो मारलेला दगड घुबड हातात धरुन उगाळत बसतं. तसे काहीसे माझ्या पोस्ट बाबत झालय. मी शाहरुख च्या विरोधी लिहील्यावर इथे काही जणांना हर्ट अ‍ॅटेक यायची वेळ आली. प्रत्येक धाग्यावर मग जळी स्थळी काष्ठी पाषाणी माझी शाहरुख विरोधी पोस्ट दिसु लागली, मग चवताळल्यासारखे प्रतीसाद येऊ लागले. आणी येतीलही कारण जखमा फार खोल झालेल्या दिसतात. वेळीच ईलाज केला तर ठीक नाहीतर भलतेच घडायचे.

कटप्पा सर्वांना सांगून गेले. मग त्या जागी ह्या ताई आल्या आहेत. आता ह्यांचा जागर असेल काही दिवस.

काहे के बैंगन के डिस्क ब्रेकां!!!

हा हा .. दुसर्यांच्या लग्नात पैसे घेऊन परफाॅमन्स देणारा किंग?
>>>>
पोलिसांच्या उमंग कार्यक्रमात पैसे न घेता परफॉर्मन्स देणारा किंग Happy

शाहरूख हा एक कलाकार आहे.
लग्नसमारंभात कलाकारांचा कार्यक्रम आयोजित करणे काही नवीन नाही या देशात.
फक्त शाहरूखने हे केले त्यामुळे ती ब्रेकींग न्यूज झाली कारण तो किंग खान आहे.
असो, पण या निमित्ताने एक बाब तेव्हा प्रकर्षाने जाणवली होती की लग्नसमारंभार ऑर्केस्ट्रा वगैरे सादर करणारया कलाकारांना ईज्जत नाही या देशात Sad

कटप्पा सर्वांना सांगून गेले. मग त्या जागी ह्या ताई आल्या आहेत. आता ह्यांचा जागर असेल काही दिवस.
>>>>

कटप्पा आणि मी हे एकच हे आपण मागेही सुचवले होते
पण ते तर अमेरीकेतले निघाले.
या सुद्धा अमेरीकेतल्याच्य कुठल्यातरी दिसत असून बहुधा ओरिजिनल फोटोच असावा. तरीही हा संशय का?

म्हणजे मायबोलीवर येणारा एखादा नवीन आयडी जर धागा काढू लागला तर त्याला ऋन्मेष नसल्याचा पुरावा सादर करावा का लागावा? त्याच्या अस्तित्वावर संशय का घेतला जावा? नवीन आयडी येथील जुन्या सभासदांना याचा जाबही विचारू शकणार नाही. पण आपण सर्वच जुन्या मायबोलीकरांची जबाबदारी नाही का नवीन सभासदाला ईथे कम्फर्टेबल करायची?
हर्पेन तुम्हीही हसा पण यचा विचार जरूर करा Happy

हवे तर यावर वेगळा धागा काढूया.

Pages