फोटो...

Submitted by पूर्वी on 1 July, 2020 - 14:35

फोटो....
ईयत्ता पहिली...
पाच वर्ष वय होते माझे.
कन्यापाठ शाळेचा गाणे, नृत्यचा कार्यक्रम राममंदिरात ठेवला होता.
मला" नेसते, नेसते पैठण चोळी ग आज होळी ग "या गाण्यावर नृत्य करायचे होते
वेणी घालण्यासाठी केस सोडले पण मला वेणी तर घालता येईना. त्याकाळी मोकळे केस म्हणजे विचीत्र, अशोभनीय मानले जायचे. माझे केसही फार मोठे होते. त्याची आमच्या वर्गाच्या बाईंनी अंबाड्यासारखी गssच्च गाठ बांधली. खूप खूप गच्च आणि लगेच मी ष्टेजवर गेले.
केसांमुळे डोक्यात होणाऱ्या वेदना विसरण्याचा, चेहर्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न करत मी ते गाणे-नृत्य पुर्ण केले.
‌कार्यक्रम संपला. माझे वडील पोलीस पाटील होते. त्यांचेसोबत एक उंच,ऐटदार चालणारी व्यक्ती येत होती.ते p.s.i.होते तर!
‌खाकी ड्रेसवरील पोलीस म्हणजे माझ्या पोटात तर भितीचा गोळाच यायला लागला. जीव मुठीत घेऊन, काय होईल की म्हणून मी जागेवरच स्तब्ध ऊभी राहिले.
‌वडील आणि ते जवळ आले.
‌दादा--"ही माझी मुलगी आहे, साहेब."
‌इन्स्पेक्टर नी माझ्या डोक्यावर हळुवार थोडेसे थोपटलेअन् म्हणाले--
‌"खुsप छान काम केलेस, बेटा."
‌त्या कौतुकाच्या वाक्याने भिती कमी झाली अन् मी मान उंssच करून पाहिले.
‌अहाहा..... आत्यंतिक तेजस्वी, मोठे, करारी तरीही प्रेमळ असे दोन डोळे दिसले मला.
‌करारी, तेजस्वी तरी प्रेमळ!!त्या वयात नेमक्या शब्दात भाव कळत नव्हते पण काहीतरी खूप छान पाहिले हे कायम लक्षात राहिले.
‌कोण होते ते काका??
‌नाव गाव काही माहिती नाही अन् कधीच कळले पण नाही. वडीलांना खूप भित असायचो आम्ही म्हणून त्यांनाही कधीच विचारले नाही.
‌आयुष्यात पुन्हा कधीच तसे डोळे पाहिले नाही.
‌डोक्यातील केसांच्या वेदना विसरायला लावणारे..."खुsप छान काम केलस,बेटा."हे वाक्य मात्र मनात जपून ठेवले मी.


आता जेंव्हा खूप सारा त्रास सहन करून एखाद्या प्रसंगातुन, संकटातून मी बाहेर पडते तेंव्हा देवघरात येऊन बसते. देवघरातील सत्यनारायणाच्या फोटोतील डोळे अग्गदी असेच जानवतात मला!..
‌अत्यंत तेजस्वी, करारी आणि प्रेमळ!
‌त्या सर्वसाक्षीकडे पहाते तेंव्हा त्याच्या प्रेमळ नजरेतून एकच वाक्य जानवते..."खुsप छान काम केलस, बेटा."
‌अन् मग झालेल्या सार्या वेदना विसरुन जाते मी!!

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नृत्य nRuty असे लिहा.
तसे मला पण फार काही खास लिहिता येत नाही.
घराणेशाहीबद्दलचा उपरोध गोष्टीतुन छान व्यक्त झाला, त्यामुळे भावना सत्यनारायणापर्यंत पोचल्या.
प्रॉमिस केल्याप्रमाणे प्रतिक्रिया टाकली,

घराणेशाहीबद्दलचा उपरोध गोष्टीतुन छान व्यक्त झाला, त्यामुळे भावना सत्यनारायणापर्यंत पोचल्या.
>> ??

नीलिमा @ घराणेशाहीबद्दलचा उपरोध गोष्टीतुन छान व्यक्त झाला, त्यामुळे भावना सत्यनारायणापर्यंत पोचल्या. >>> कोणताही गोष्टी चा शेवट सत्यनारायण करतात ना म्हणून