प्रेमगाथा ही गाजली नसती

Submitted by Amol shivaji Rasal on 30 June, 2020 - 06:14

आली नसती वेळेवर ती खोली सुद्धा सजली नसती
आनंदाच्या अश्रूंनीही पापणीसुद्धा भिजली नसती..

वाट पाहिली नेहमीच अन धैर्य सोबत नसतानाही
प्रतीक्षेत तो होता नाहीतर प्रीत जराही रुजली नसती..

तिच्या पुढेच गाऊन गेला आयुष्याचे प्रेमगीत ते
तिला प्रचिती झाली असावी तीही खट्याळ हसली नसती..

मित्रांची ओळखही तिजला त्याने स्वतःच करून दिली
मित्रांच्या मदतीशिवाय डाळ जराही शिजली नसती

आलीच शेवटी त्याच्याकडे ती गोडगोजिरी स्वप्ने घेऊन
आयुष्याचे नंदनवन अन प्रेमकथा ही गाजली नसती..

Group content visibility: 
Use group defaults