पाच मिनिट मे आयाच..

Submitted by सखा. on 30 June, 2020 - 00:12

- पाच मिनिटात तुला कॉल करतो.
- दो मिनिट मे आया च.
- पढके 2-3 दिन मे वापस करता.
- तुम बस हुकूम करो सर.
- तुम्ही निघा मी आलोच.
- मी आत्ता तुझाच विचार करत होतो.
- बस का राव एवढा पण भरोसा नाही का?
असं म्हणणारे सच्चे मित्र तुम्हाला पण आहेत का?

Group content visibility: 
Use group defaults

आहेत ना . काय करणार आपण . जे आहेत ते गोड मानून घ्यायचे ! कधीतरी येतील अशी आशा करत वाट बघत बसायचे. ते एक WIT फेकतात त्यावर उभे राहायचे. Waiting For GODOT !!!!

मोकार आहेत... परंतु

'जो ह्यांच्यावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला'
असं समर्थांनी ह्यांच्याबद्दल पूर्वीच सावध करून ठेवलेले असल्याने आणि स्वानुभवातूनही अस्मादिक शहाणे झालेले आहेत... Happy

स्वतःच्या घरी नोटा छापायचे मशीन लावायचे. स्वतःच शेती करायची. स्वतःच योग्य वेळी पाहिजे तेवढा पाउस पाडायचा , स्वतःच स्वतःचे डॉक्टर व्हायचे. आणि आपली आपण शस्त्रक्रिया करायची म्हणजे देवच व्हायचे. पण देवालाही भक्तावर अवलंबून राहावे लागते. त्याने नैवेद्य दाखवला नाही तर उपाशी, त्याला पण संतांनी विटेवर उभे केले की
राग मानू नका. विनोदी विभागांत आहोत ना आपण ! Light 1 Take it lightly चा दिवा कसा डकवायचा ते माहित नाही. पहा माझा कार्य भाग बुडाला!

मला गर्लफ्रेंड होत्या अश्या काही.. पाच मिनिट मे आई बोलून सोडून गेल्या .. एक तर गार्डनमध्येच सोडून गेली.. अंधार पडल्यावर मी एकटाच घरी गेलो Sad दुसरया दिवशी कळलं की तिचे लग्न झालेले होते Sad

लोकं ईथे हसायला आलेत अणि मी माझेच रडगाणे गातोय
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष >>
तुम्ही चालु द्या हो. लोकांचं कशाला टेन्शन घेता. जमल्यास शारुखचे किस्से पण टाका.

Submitted by ऋन्मेऽऽष on
गेली.. अंधार पडल्यावर मी एकटाच घरी गेलो Sad>> ती सध्या काय करते??

! Light 1 Take it lightly चा दिवा कसा डकवायचा ते माहित नाही. पहा माझा कार्य भाग बुडाला!Submitted by प्रभुदेसाई>> अचूक आणि नेमके. आवडले!

ती सध्या काय करते??
>>>>
माझ्याशी एक्स्ट्रा मॅरीटल अफेअर Happy

मराठीत विवाहबाह्य संबंध.
समाजात हे पाप समजले जाते
मायबोलीवर हा मौज्मजेचा विषय आहे
म्हणून मला मायबोली आवडते Happy

सखा. ऋन्मेऽऽष
धागा कुठल्या कुठे चालला आहे. मी पण माझे योगदान देतो . सखा आणि सखा. ह्या दोन आय डी मध्ये फक्त डॉटचा फरक आहे. पण चाहत्यांच्या संख्येेमध्ये सोळाचा फरक आहे. एक डॉट साला आय डी को क्यासे क्या बना देता है.