ताई (भाग ३रा )

Submitted by मिरिंडा on 29 June, 2020 - 09:23

दीपाचा चेहरा मला पाहून फुलला होता. " अगं, लवकर तयार हो. आपल्याला निघायचंय ना .....? " मी इच्छा नसतानाही म्हणालो. मला तर तिनी उशीर केला आणि जाण्याचं रद्द झालं तर बरं होईल असं वाटत होतं. त्यावर पप्पाही म्हणाले, " दीपा जरा लवकर तयार हो बेटा. एव्हाना आपण निघायला पाहिजे होतं... " ते पुढे काही म्हणणार तेवढ्यात दीपा त्यांच्या जवळ जाऊन त्याना कवटाळीत म्हणाली," हे काय हो पप्पा, तीन साडेतीनला तर मी आल्ये. नाही गेलं तर नाही का चालणार...." आता मात्र पप्पा माघार घेत म्हणाले, " तुला काय म्हणायचंय ना ते ताईला सांग. उगाच दोघी मला मधे घेऊ नका.,,," असं म्हणून ते जागचे उठले आणि आत गेले. तेवढ्यात ताई येत म्हणाल्या. ""दीपा तू अजून इथेच ,तू आत्ता बाथरुममधे असायला हवीस. " मग तिला उठवून त्यानी आतल्या खोलीत ढकललं. ताई अगदी व्यवस्थित तयार झाल्या होत्या. आत्ता मात्र त्यांनी जाळीदार लाल रंगाचा टॉप आणि खाली निळी लेगिन्स घातली होती. आता तर त्यांची घाटदार छाती लाल चुन्नीने झांकली होती. पण छाती तगडबंद दिसत होती. लेगिन्समधून नितंब त्यांची गोलाई धाडसीपणे दाखवीत होते. माझं डोकं परत गरम होऊ लागलं .मी चोरट्या नजरेने
त्यांच्याकडे पाहिलं. दिवसा चेहरा थोडा पुरषी वाटत होता. पण त्या चांगल्याच आकर्षक दिसत होत्या.आत्ता जर का त्या इथे एकट्याच असत्या तर मी त्याना माझ्या कवेत नक्कीच घेतलं असतं. पुन्हा एकदा मला ताईंनी झपाटलं. माझ्याकडे न बघताच त्या म्हणाल्या , " तुम्ही थोडा चहा तरी घ्याल ना ? आता तुमची आवडती दीपा आलेली आहे... " ही सूचना होती का खंवचटपणा होता मला कळेना. म्हणजे आता जरा विचार काबूत ठेवा असं तर त्याना म्हणायचं नव्हतं. माझेच प्रश्न . माझीच उत्तरं. ..... माझ्याकडे थेट पाहात त्या कीचन मधे गेल्या..मला दीपा येईपर्यंत वाट पाहावी लागणार होती.. का कोण जाणे वातावरणावर परत ताईंचं गारुड पसरल्यासारखं मला वाटलं..... तेवढ्यात दीपा आली. ती तर
मेकप करुनच बाहेर आली. तिचं एक बरं होतं, खूप कमी वेळात ती तयार होत असे. ती चांगलीच आकर्षक दिसत होती. कदाचित आठवडाभर मी तिला पाहिलेली नसल्यामुळेही असेल. ती गोड हसली. ताई पण आकर्षक दिसायच्या पण त्याना प्रयत्न करावा लागत असे.काहीही असलं तरी ताईंची फिगर मादकता निर्माण करीत असे.लगेचंच ताईही बाहेर आल्या. गडद जांभळ्या रंगाची लिपस्टिक त्यांच्या विखारी स्वभावाला एखाद्या नागिणीसारखी शोभून दिसत होती. ताईंनी लावलेला चंदनाचा सेंट मात्र मला थोडा कळकट वाटला. कदाचित त्यांचा घाम त्यात मिसळला असावा. वातावरण थोडंसं सुखद आणि स्वप्नाळू होता होता मधेच पप्पांचा आवाज आला ," अरे चला चला निघायला हवं, व्हॉट आर वुई वेटिंग फॉर ? कमॉन गर्ल्स. .." असं म्हणून आम्ही निघालो. गाडीशी पोहोचता पोहचताच पावसाची जोरदार सर आली. आणि आम्ही सगळे चांगलेच भिजलो. पाऊस थांबण्याची चिन्हे न दिसल्याने गाडी अनलॉक करुन ड्रायव्हिंग सीटवर बसता बसता एकदम ओरडलो, " चला जिथे जो उभा आहे तिथे त्याने बसून घ्यावे. असं म्हंटल्या बरोबर ताई माझ्याजवळ फ्रंट सीटवर बसल्या आणि दीपा आणि पप्पा मागे बसले. माझी अपेक्षा दीपा बसेल अशीच होती. मी सहज रिअर मिरर मधे पाहिलं. दीपाचा निराशेने आक्रसलेला चेहरा दिसला. तिच्या कपाळावर सूक्ष्म अठी होती. ताई माझ्या शेजारीच बसल्याने दिवसा उजेडी त्यांची छाती मला दिसत होती. थिएटरमधल्या अंधारात फक्त घाटदारपणाचा स्पर्श अनुभवला होता. त्यांच्या छातीची वर खाली होणारी लयबद्ध हालचाल माझ्यापासून अर्ध्या हाताच्या अंतरावर होती. ब्रेकवर हात ठेवता ठेवता छातीवर हात जाणार नाही याची खबरदारी मला दीपामुळे घेणं भाग होतं.त्या एकट्या असत्या तर....तर ?
असो . सगळ्यानाच गरम होत असावं. पाऊस जोरात पडत असला तरी काचा बंद असल्याने मधेच अचानक दीपाच्या ओरडण्याने जागा झालो. " अरे, तो एसी तरी फुल कर ना. जीव घुसमटतोय नुसता." अस म्हंटल्यावर मी घाबरुन एसी वाढवला.दीपाने झालेल्या निराशेला वाट करुन दिल्याचं समजलं. अधूनमधून मी चोरट्या नजरेने ताईंचं निरिक्षण करीत होतो. ताईंनी सेंट लावला होता तरीही त्यांचा घाम मिश्रीत दर्प मादकता वाढवीत होता.ताईही माझं निरिक्षण करीत होत्या. पण एक क्षण असा आला की दोघांचही निरिक्षण एकाच वेळेस चालल्याचं दोघांच्याही लक्षात आलं. मग मी मुद्दामच खिडकी बाहेर पाहत ड्रायव्हिंग करु लागलो. कोणीच कसं काहीच बोलत नाही ? याचं मला आश्चर्य वाटलं मी जोरात ब्रेक दाबून गाडी थांबवली. परिणामी ताई माझ्याजवळ आल्या आणि दीपा पप्पांजवळ. लगेचंच दीपा ओरडली ,"अरे काय झालं काय ? अशी काय गाडी चालवतोयस ? आणि आपण थांबलो कशाला ?" मी जरा जोरातच ओरडलो" आपण मयताला चाललोय का? एवढा सीरीयसनेस कशाला ? दोन तरुणी बरोबर असताना स्मशानशांतता का ? चला मी गाडी फिरवतो. " , त्यावर वाईट वाटून दीपा म्हणाली " सॉरी,,," मग मीच म्हंटलं " ठीक आहे , कोणाला जागा बदलायच्या असतील तर पाहा. " ताईंची इच्छा दिसली नाही . दीपानी नाद सोडला असावा. मलाही ताई जवळ हव्या होत्या. पंधरावीस मिनिटं मग दोघींची बडबड चालू राहिली. मी एका रिसॉर्ट कम हॉटेलजवळ गाडी थांबवली आणि म्हंटलं " बघा कोणाला काही नाश्ता वगैरे करायचा असेल तर. असं म्हणून मी खाली उतरलो.
माझ्या मागोमाग सगळेच उतरले. प्रथम मी आणि दीपा बरोबर चालत निघालो. ताई आणि पप्पा सावकाश चालत येत होते. मी दीपाकडे पाहिलं तिचा चेहरा पुष्कळसा सौम्य वाटला. तिचे डोळे थोडे जागरणाने थकल्यासारखे दिसले. मी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवून माझ्याकडे ओढली. तिला असं आवडत असल्याचं दिसलं मी तिला जवळ घेऊन दाबली. तिने पण माझ्या खाद्यावर मान टेकवली. तिचा चेहरा कुरवाळल्यावर तिला बरं वाटलेलं दिसलं. मी मागे वळून पाहिलं. ताई फक्त पाहात होत्या. हॉटेलमधे शिरल्यावर मी मुद्दामच दीपाजवळ बसलो.
वेगवेगळ्या ऑर्डर्स सगळ्यांनी मागवल्या . हेतू हा की ज्याला जे आवडेल ते तो खाऊ शकेल. ताईंनी दीपाच्या प्लेटमधला वडा घेतला मी मुद्दामच ताईंच्या प्लेटमधल्या सामोशाचा तुकडा घेतला. आणि दीपाकडे पाहिँलं
तिच्या चेहऱ्यावर आठी पडली नाही. उलट ती हसली. आता मी तिच्या जवळ होतो. त्यामुळे काहीही केलं तरी तिला चालणार असावं. असा मी तर्क काढला. बायकाना नवरा फक्त जवळ म्हणजे त्यांच्या मालकी हक्काच्या परिसरात असावा लागतो. पप्पा चुपचाप खात होते. त्याना खरोखरीची भूक लागली असावी. त्यांनीही दीपाच्या प्लेटमधला वडा उचलला, ते पाहूऩ दीपा म्हणाली, " मी खाऊ ना काहीतरी ....? " पप्पा म्हणाले," माझ्या प्लेटमधलं खा. मग तर झालं ... " तेवढ्यात टेबलाखालच्या माझ्या पायाला कसला तरी गरम स्पर्श झाला. मी हळूच पाहिलं तो ताईंचा पाय होता. त्या अर्थपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहात होत्या. मग मीही माझा पाय त्यांच्या पायावरुन फिरवला. त्यांना तो जाणवल्याचे दिसले. मग मीच म्हंटलं " चला निघायला हवं. अजून दीडेक तास तरी आहे. माळशेजचा पायथा फार जवळ नाही आहे. त्यात गावात घर शोधणं म्हणजे अर्धा एक तास नक्की. आपण साडे पाचच्या आत पोहोचूच शकत नाही . " आम्ही गाडीकडे निघालो तेव्हा गाडीत बसत पप्पा म्हणाले," अहो गावात शिरलो की माहिती असल्याने वाडा लवकरच सापडेल. तरीही गेल्या वर्ष सहा महिन्यात जाणं झालं नाही.."
साडेतीन वाजत होते. पाऊस थांबला होता. दूरवर कुठेतरी काळे ढग दिसत होते. चकचकीत ऊन पडलं होतं. ओलसर थंड वातावरण आता वाढत होतं. वाराही घूंघूं.. घूंघूं... आवाज करीत वाहत होता. वरखाली जाणारा डोंगराळ रस्ता आता दोन्ही बाजूवर असलेल्या लालबुंद मातीच्या अंगावर वाढलेलं हिरवंगार दाट जंगल ,मधूनच जाणारं रस्त्याचं काळं कार्पेट भराभर मागे टाकीत आम्ही चाललो होतो. आता एसी बंद केल्याने दोन खिडक्या उघड्या ठेवल्या होत्या. वारा सगळ्यांचेच केस उडवीत होता . ताई मधेच म्हणाल्या खिडक्या बंद करा आणि एसी चालू करा. आता दीपाची तिच्या प्रोजेक्ट बद्दल नॉन स्टॉप बडबड चालू होती. ताईंनी स्वत: भोवती डोक्यावरुन चुन्नी गुंडाळून घेतली होती. ते पाहून मी विचारलं, " ताई थंडी लागत असेल तर एसी बंद करुन हीटर चालू करु का ? " , असं विचारल्यावर ताई चिडल्या सारख्या दिसल्या आणि म्हणाल्या ," काहीतरीच काय ,,,,," मी मिरर मधून दीपाकडे पाहिलं. ती हसत होती. मग पंधरावीस मिनिटं कोणीच काही बोललं नाही. दीपा आणि पप्पा पेंगत होते. ते लवकरच निद्राधीन झाले. ते जाणवून मी थेट ताईंकडे पाहिलं. एसीच्या वाऱ्याने उडणाऱ्या चुन्नीला धरण्याचा प्रयत्न करीत असलेल्या ताईंचा मला जवळ असलेला खांदा कुरवाळीत म्हंटलं, " आज इतकं मौनव्रतसं धरलयत ? रागावलात का ? "
माझ्या हातात हात गुंफत ताई फक्त लाजल्या. तेवढ्यात दुसऱ्या हातात धरलेलं चुन्नीचं टोकं उडालं आणि त्यांची घाटदार छाती सताड उघडी पडली.
मी हळूच माझा हात त्यांच्या चेहऱ्यावरुन फिरवला. ताईंचं चेहरा उत्तेजित होऊन लाल झाला. मग मी माझा हात काढून घेतला. ताईंनी उघडी दिसणारी छाती झाकायचा जराही प्रयत्न कला नाही. ड्रायव्हिंगमुळे माझा दुसरा हात पूर्ण गुंतला असल्याने मला काहीच करता येत नव्हतं. असं वाटत होतं गाडी थांबवावी आणि ताईंना मिठीत ओढून प्रणयाच्या सगळ्या पायऱ्या ओलांडून ताईंच्या गरम श्वासात हरवून जावं. पण हे शक्य नाही जाणवून मी ड्रायव्हिंग कडे लक्ष केंद्रित केलं. आता अर्ध्या तासावर भिरणे गाव आलं असताना मी ताईना म्हंटलं " आलं तुमचं गाव." अजूनही पप्पा आणि दीपा पेंगत होते. मी स्पीड कमी करीत गाडी साईडला लावली. ते पाहून ताई म्हणाल्या, " हे काय गाडी का थांबवलीत. ,,? " ताईंची छाती अजूनही सताड उघडी होती. मी पटकन ताईना खेचून माझ्याअडे ओढल्या. त्याबरोबर त्या माझ्या मिठीत आल्या. त्यानी धक्का देऊन मला बाजूला ढकलले. नेमके त्याच वेळेस पप्पा जागे झाले..खडबडून म्हणाले ," पोचलो आपण ,,,? " त्यावर मी म्हणालो ," गाडी गरम झाल्ये म्हणून थांबवल्ये. " मी बाहेर येऊन बॉनेट उघडले. गाडी खरच तापली होती. मग थंड पाणी घेऊन गाडीत घातलं. मी थोडं इकडे तिकडे केलं बॉनेट बंद करुन गाडी स्टार्ट केली. आता दीपाही उठली होती. पप्पानी इकडे तिकडे पाहून ओळखलं आणि म्हणाले, " अरे हेच तर भिरणे गाव, . गाडी उजवकडे घ्या. आणि मग पुन्हा डावीकडे घ्या " मी गाडी उजवीकडे वळवली. मग गाडी सरळ घेऊन दहा मिनिटे गेल्यावर जंगलातच पप्पा महणाले, " हा काय आला की वाडा , घ्या डावीकडे, ते पाहा गेट. "
... समोर एक गंजलेले प्रचंड गेट होतं. खाली उतरुन पप्पानी ते उघडलं. मी गाडी आत घातली. पाच वाजून गेले होते. संधीप्रकाशात काळ्या चिऱ्यांमधे बाधलेला एक दुमजली वाडा एखाद्या राक्षसा सारखा बसला होता. आम्ही सगळेच खाली उतरलो. समोरुन काटकिट्या अंगाचा एक उंच माणूस आला आणि त्यानी पप्पाना नमस्कार केला. आमचं सामान उचलून तो वाड्याकडे चालू लागला. आम्हीही त्याच्या मागोमाग वाड्यात प्रवेश केला.
...........

का कोण जाणे मला हा वाडा अजिबात आवडला नाही. एक तर आतला पिवळा प्रकाश. आणि मुख्य दरवाजाचा आकार. तो मोठा होता पण आकार बदामासारखा. इतकाच फरक की बदामाचा खालचा भाग टोकदार असतो. इथे मात्र दोन्ही बाजू एकदम थांबल्यासारख्या वाटत होत्या. त्यात सरळ उंबरा बसवलेला होता. कोणाचं आर्किटेक्चर होतं कोण जाणे. मी इकडे तिकडे पाहात आत शिरलो. बाहेरचा हॉल रेल्वे प्ल्ँटफॉर्म सारखा मोठा वाटला. आम्ही सगळेच जण म्हणजे किडा मुंग्यांचा पुंंजका जणू एका कोपऱ्यात जमला आहे असं वाटलं. सीलिंग पंधरा ते वीस फूट उंचीचं. म्हणजे जिन्यांच्या पायऱ्या पण बऱ्याच असणार. हॉलला एकूण सहा खिडक्या सगळ्याच बदामाच्या आकाराच्या. आर्किटेक्टला बदामाचं बरंच आकर्षण असावं. लांबच्या एका बदामी दरवाज्यातून साठीकडे झुकलेली स्त्री आली. तिने सगळ्याना नमस्कार करुन म्हणाली, " चहा की काही थंड पेय्य घेणार की जेवणच करणार." मी थंड पेय्य घेणार असल्याचं म्हंटलं . तिथल्याच सोफ्यावर बसलो. माझं निरीक्षण चालूच होतं, ते पाहून पप्पा म्हणाले, " वाडा दोनशे सव्वादोनशे वर्षांपूर्वीचा असावा. आम्ही इथले आता चौथे मालक. हे सगळं विचित्र बांधलंय खरं पण ते तोडून नवीन बांधायचं म्हंटलं तर काही कोट घालवावे लागतील. आणि इथे कोण नेहमीसाठी राहणार आहे. ...नाही का ? " . पतिसादाकरिता मी फक्त हुंकार भरला. इथे बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतील. एकाच फेरीत काहीच पाहणं होणार नाही. तेवढ्यात मोठा ग्लासभरुन आंब्याचं थंडगार पन्हं राधाबाईंनी आणून ठेवलं. बाहेर काळोख पसरला होता. राधाबाईंनी एक दोन उघड्या खिडक्या आणि बदामी दरवाज्या बंद करीत म्हंटलं, " या जंगलातून वेगवेगळे किडे आणि सरपटणारे प्राणी आले ना तर त्याना हुसकून लावताना जीव वरखाली होईल. आणि रात्री झोप लागणार नाही ती वेगळीच." असं म्हणून त्या आत गेल्या. .... ताई म्हणाल्या, " चला मी तुम्हाला वाडा आणि त्याबरोबर तुमची खोलीही दाखवते . म्हणजे जेवल्यावर विश्रांती घेऊ शकाल. " असं म्हणून त्या उठल्या पण मी हाललो नाही . त्या एका भिंतीत कपाटासारखी दारं असलेला दरवाज्या उघडू लागल्या. दारं उघडल्यावर भिंतीतला एक जिना दिसू लागला. जो वरच्या मजल्यावर जात असावा. . मी हालत नाही असं पाहून आधीच मोठे असलेले डोळे आणखिन मोठे करीत ताई म्हणाल्या, " अरे हो, दीपा आली पाहिजे बरोबर, नाही का ? " त्यावर दीपा लगेचंच म्हणाली, " त्याला तू घेऊन गेलीस तरी हरकत नाही." मी उठलो आणि ताईंच्या मागे गेलो. जिन्यावरही पिवळा अंधुक प्रकाश होताच. ......एका वेळेला एकच माणूस जाऊ शकेल एवढाच रुंद जिना. मला आश्चर्य वाटतं, एरवी प्रशस्तपणाची कमाल करणारे हे जुने लोक जिन्यांच्या बाबत एवढे कंजूसपणा का करीत असत, हे ताईंना विचारण्यात काहीच अर्थ नव्हता. मी आणि ताईंंमधे आता एका पायरीचंच अंतर होतं. ताई टॉर्च पेटवून म्हणाल्या ," नीट चाला, पुढे पायऱ्या वळतायत म्हणून तिरक्या आणि अधिक अरुंद होतायत. आता ताईंना अक्षरश : चिकटून मी चाललो होतो. आमच्याच सावल्या जिन्यावर पडत असल्याने टॉर्च लागत होता. ताईंचा लावलेला सेंट संपला असावा आणि त्यांच्या मादक घामाचा दर्प मला वेडं करीत होता. ताईंना आत्ताच मागून पकडावं म्हणून मी माझे दोन्ही हात उचलले पण ताईंना वळणारी पायरी नीट न दिसल्याने किंवा त्यानी हे मुद्दाम केलं असावं म्हणून म्हणा, ताईंचा तोल गेला आणि त्या माझ्या अंगावर पडल्याने माझ्या खांद्यावर दोन्ही हात टेकून त्यानी तोल सांभाळला , मी त्यांंना घट्ट धरुन ठेवल्या. आता माझे ओठ आपसूकच त्यांच्या घट्ट छातीवर टेकले मी त्यांच्या घट्ट छातीला आलिंगन दिले. त्याही माझा चेहरा त्यांच्या छातीवर दाबू लागल्या . जे नैसर्गिक आणि आवश्यक असतं ते तोल साभाळल्यावर तिथेच थांबतं. पण पुढचं दाबणं आणि मी घेत असलेली छातीची चुंबनं थाबेनात. आता ताईंनी माझा चेहरा त्यांच्या ओठांसाठी वर केला आणि ओठ टेकवणार एवढ्यात त्या ओरडल्या, अहो आपण दोघेही पडू. " त्यांचे डोळे जिन्याच्या पायथ्याकडे होते. मी मान फिरवून खाली पाहीलं . शेवटच्या पायरीवर दीपा उभी होती. तिला पण वर यायचं असावं........
तिचे डोळे रागाने विस्फारलेले दिसले. कोणालाही तसंच वाटलं असतं. ताई पुढे निघून गेल्या. मी दीपा येईस्तोवर तिथेच थांबलो. माझ्याजवळ आल्या आल्या मला म्हणाली ," काय चाललं होतं तुमचं ,, मी सांगितलं होतं ना ताईपासून दूर राहा म्हणून. " मी तिला समजावण्याचा निष्फळ प्रयत्न केला. मग आम्ही दोघेही दहाबारा वाकड्या पायऱ्या चढून एकदाचे वरच्या मजल्यावर आलो....ताई वरुन टॉर्च दाखवीत उभ्या होत्या. धक्का दायक गोष्ट म्हणजे वरती जिन्यातल्या दिव्याचा अंधुक प्रकाश पसरला होता. प्रकाश कसला अंधारच जास्ती. तेवढ्यात ताईंनी समोरच्याच खोलीचं कुलुप उघडलं आत शिरुन लाइट ऑन केला. पुन्हा आतल्या पिवळ्या प्रकाशात एक प्रशस्त खोली दिसली जिच्या समोरच्या भिंतींपर्यंत उजेड जेमतेमच पोहोचत होता. खोली कसली एक मोठा दिवाणखानाच होता. भिंती मळकट पिवळ्या रंगाच्या असाव्यात.ल़ाबच्या कोपऱ्यात एक बेड दिसला. जवळच एक टेबल खुर्ची आणि वॉर्डरोब होतं. दोघांचेही रंग काळपट चॉकलेटी होते. दीपा आत न शिरता बाहेरच उभी होती. ते पाहून मी तिला आत बोलावले त्यावर ती म्हणाली " मी बाजूच्या खोल्या उघडून बघते. " असं म्हणून तिनी ताईंकडून चाव्या घेतल्या. ती गेल्यावर ताई म्हणाल्या, " ही तुमची खोली. वॉशरुम जिन्याच्या डाव्या बाजूला आहे. " आता त्या माझ्या जवळ येत म्हणाल्या, " या नं, मघाशी अर्धवट राहिलेलं काम पुरं करु या. आता दीपा एवढ्यात येत नाही असं म्हणून त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकले. त्यांचे ऊष्ण श्वास आणि वासनेनी आसुसलेले गरम ओठ माझ्या ओठांवर टेकले. माझा हात त्यांच्या पाठीवरुन फिरत होता. त्या वेड्यासारखी माझी चुंबनं घेऊ लागल्या. दरवाज्या उघडा असल्याची जाणीव होऊन दीपा येईल की काय या भीतीने मी त्याना दूर लोटणार एवढ्यात दीपाने दरवाज्यात येऊन हाक मारली. " ताई त्या खोलीतला लाईट लागत नाहीये. ..बल्ब गेलाय का ? " ते ऐकून मी ताईंना जोरात दूर लोटलं. त्या तोल सावरीत दरवाज्याजवळ गेल्या . आणि दीपाच्याहातात आणखी एक चावी खुपशीत म्हणाल्या, " ती रुम माझ्यासाठी ठेव. तू पुढची रुम उघड " दीपा गेली. तिला काही दिसलं नसावं असं वाटतं. किंवा दिसूनही तिने न दिसल्यासारखं केलं असावं. मी थोडा घाबरलो, आता ती मला फैलावर घेणार हे नक्की. ताई आत वळत म्हणाल्या, " सबंध रात्र आपल्याला आहे. तुम्ही फ्रेश होऊन या जेवण तयारच असेल. माझी रुम तुमच्या बाजूचीच आहे. " आणि मिश्किल हसत निघून गेल्या.
मी दरवाज्या आतून लावून घेतला आणि समोरची खिडकी उघडली. आत मधे थोडा थोडा येणारा पावसाचा आवाज एकदम वाढला.
पाऊस बराच पडत असावा.सहज म्हणून मी खिडकीबाहेर पाहिलं. काळोखामधे दाटीवाटीने उभे असलेले मोठाले व्रुक्ष माझ्यावर नजर ठेवून असावेत असं वाटलं. खोलीतला थंडगार ओलसरपणा अंगावर काटा आणीत होता.समोरच असलेलं वॉर्डरोब मी उघडण्याचा प्रयत्न करुन पाहिला. पण त्याची दारं जरा देखिल हालली नाहीत. त्याला कुलुप नव्हतं. असलं तरी अंगचं असावं. ताईंकडे किल्ल्या कोण मागणार. मी दारं ओढून पाहायचा पुन्हा प्रयत्न करुन पाहिला. दारं मालकाशी भलतीच इमानदार आहेत असं वाटलं. पप्पानीही कधी उघडायचा प्रयत्न केला नसावा. पुरुषाचा स्वभाव शिकाऱ्या सारखा असतो. एखाद्या गोष्टीच्या तो मागे पडला तर ती तडीस नेईपर्यंत सोडत नाही. आजूबाजूला दारं उचकटण्यासाठी काही मिळतंय का ते पाहू लागलो. आता तुम्ही म्हणाल मला हे नसते उपद्व्याप कोणी सांगितले होते. मुकाट्यानी जेवायचं आणी झोपायचं सोडून. पण पुरषी स्वभाव दुसरं काय ? मी सगळीकडे शोधलं पण काहीही सपडलं नाही. शेवटी टेबलाचे खण कसेतरी उघडले. आत एक हातभर लांबीचा लोखंडी तुकडा , चामड्याचे हातमोजे ,एक लहान घमेलं, काही खिळे इ. सापडलं. का कोणजाणे चामड्याच्या हात मोज्यांचा संबंध कोणत्या तरी गुन्ह्याशी असावा असं वाटलं. एकूण माझं वाड्यासंबंधी मत चांगलं नसल्यामुळे असं झालं असावं. मी लोखंडाचा तुकडा घेऊन वॉर्डरोबकडे निघालो. कदाचित जेवणाचं बोलावण़ येईल असं वाटलं म्हणून मी तो तुकडा परत टेबलाच्या खणात ठेवला. तेवढ्यात दरवाज्या वाजला. दारात राधाबाई, " खाली चला सायब जेवण तयार आहे. " त्या नम्रपणे म्हणाल्या. त्या गेल्यावर कपडे बदलून जेवायला निघणार एवढ्यात दीपा आली. " चल जेवायला...ताईला नको ना पाठवू बोलवायला. " मी काहीतरीच काय अशा अर्थी हात उडवले. जेणेकरुन खेळीमेळीचं वातावरण राहील. याचा अर्थ तिनी मगाशी पाहिलं होतं तर . मी तिच्या मागोमाग निमूटपणे खालच्या हॉलमधे आलो. टेबलावरच्या उदबत्त्यांच्यावासाने मन प्रसन्न झाले. आम्ही दोघानी अशा रातीने खुर्च्या पकडल्या की माझा आणि ताईंचा
संबंधच येणार नाही. टेबल आठ माणसांचं आणि आम्ही चौघेच..ताईंचा चेहरा थोडा आक्रसल्यासारखा दिसला. जेवण अतिशय सुंदर आणि चविष्ट होतं. मी शाकाहारी असल्याने जेवणात एकही मांसाहारी पदार्थ नव्हता. जेवणं शांततेत चालू होती. अचानक घुं घुं घुं .....घूंघूं.... घूं असा घुबडाचा आवाज आला. मी जरा दचकलो. हा अपशकूनच होता. मी बाकीच्यांकडे पाहिलं. पण ते जसं काही घडलंच नाही असे जेवत होते..हा आवाज अशुभ आहे हे मला बाकीच्याना सांगावसं वाटत होतं. आस्ते आस्ते जेवणं झाली. राधाबाईंनी प्रत्येकाच्या हातावर बडीशेप ठेवली. मग सगळेच रेळल्यासारखे सोफ्यांवर बसले. अचानक ताई म्हणाल्या ," इथे असे घुबडाचे आवाज कॉमन आहेत. दिवसासुद्धा येतात. " काही वेळान मी उठलो. दीपाकडे पाहून म्हणालो," ,चला, मला झोप येत्ये. " .... " ,नक्की झोपायलाच जाताय ना ? की काही शोध घ्यायचाय. ? " ताई खंवचटपणे म्हणाल्या. मी काही शोधतोय हे याना कसं माहीत. ताईंचा आगाऊपणा मला आवडेनासा झाला..काही न बोलता मी जिन्याकडे वळलो. खोलीत जाऊन मी दरवाज्या लावून घेतला. टेबलाच्या खणातला लोखंडी तुकडा काढून मी तो वॉर्डरोबच्या बंद दरवाज्यात घालून जोर लावू लागलो. दोनचार वेळा प्रयत्न केला पण उघडलं नाही. मी विचार केला आपल्याला तरी काय करायचंय हे सगळं करुन ,गुमान झोपलो तर...... माझी नजर वॉर्डरोबच्या खालच्या भागात बरोबर मधे एक लाकडाची खिटी दिसली तिथे गेली. मी ती आधी पाहिली असती तर ते केव्हाच उघडले असते. मी जोर लावून ती उघडली तर ती तुटून खाली पडली. मी कपाळावर हात मारुन घेतला. आता तर आशाच नाहीशी झाली. मी पुन्हा लोखंडी तुकड्याने प्रयत्न केला. दोन अडीच इंच जाडीचा दरवाज्या थोडा हालला.. मग पुन्हा जोर लावून पाहिलि आता ते हळूहळू उघडू लागला. पुन्हा पाच सात मिनिटांच्या झटापटीने तो उघडला. आत काही जरीकाठाच्या लुगड्याच्या घड्या , एक घमेलं,काही काठ्या ,चारदोन मुखवटे, काळ्या रंगाचे डगले, ते बाजूला केल्यावर माझा हात एका गोलसर वस्तूवरुन फिरला मी ती बाहेर ओढली, ती एक मानवी कवटी होती. मी घाबरुन ती खाली टाकली. त्यावर ती भंगली, दोन तुकडे आणि भुसा झालेली कवटी पुन्हा उचलणं मला किळसवाणं वाटू लागलं. ,,,,,,, हळूहळू मी भानावर आलो, पण कोणीतरी दरवाज्या वाजवीत होतं. माझ्या अंगाला थरथर सुटली आणि मानेवरुन घामाचा ओघळ वाहत माझ्या निकर पर्यंत आला. ,,,,,,,,,,
(क्र म श: )

Group content visibility: 
Use group defaults

भारीच लिहिली आहे..... प्रत्येक भागाचा शेवट गुंतवून ठेवणारा आहे.... पुढील भाग लवकर प्रकाशित करावा