"माझ्या प्रेमाचा कयास"!

Submitted by चंद्रमा on 26 June, 2020 - 15:13

तिची वाट बघून-बघून
झालो आता वेडा-पिसा!
बसची टिकीट काढून-काढून
माझ्या रिकामा झाला खिसा!!

एकदा दारावर थाप पडली,
मला वाटलं माझं दिल आलं!
दार उघडून बघतो तर काय;
घरच्या ईलेक्ट्रिकचं बिल आलं!!

एकदा बस तिची सुटत होती,
म्हणून सैरावैरा धावलो!
देव पाठीशी होता म्हणून;
मरता-मरता वाचलो!!

एकदा ती भेटली़....…
इम्प्रेस करावं म्हणून म्हटलं,
अशी काय आहे तुझ्या नयनांमध्ये जादू
दिवसा मिटतात रात्री चकाकतात!
घुबडाचे प्रत्यारोपण तर
नाही केले मधू!!

हे ऐकून तिने,
माझ्या गालफडात लगावलं!
मी काय बोललो;
हे नंतर मला गावलं!!

काय सांगू मित्रांनो,
माझ्या दैवाची हकीकत!
भिखारी होऊन मारली थाप;
जिथे काही नाही मिळत!!

बस पुरे झाले आता,
नाही जाईल पुन्हा प्रेमाच्या वाटा!
पण पुन्हा एक फुलपाखरु समोरुन गेलं;
म्हटलं जुणं विसरुन ऊफाळू
पुन्हा प्रेमसागराच्या लाटा!!

Group content visibility: 
Use group defaults