"एक बाकी एकाकी"

Submitted by am_Ruta on 23 June, 2020 - 02:15

कधीतरी एकटं राहून बघावं
मनातल्या भावनांना मोकळं सोडावं
आयुष्याच्या गणिताला कधीतरी
अर्धवटच सोडून जगावं...

समोरच्याला अलगद स्वतःपासून अलग करावं,
आपल्या मनाला आईप्रमाणे कुरवाळावं...
स्वत्वाला थोडसं झुकतं माप द्यावं,
त्यासाठी तरी कधी एकटं राहून बघावं...

विचारांची गाठोडी बांधून
मोकळ्या हवेत श्वास घेऊन बघावं...
येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला,
मनापासून आपलंसं करावं...

माणसांच्या या गर्दीतून
स्वतःला नाजूकपणे हाताळावं...
त्यासाठी...,
एकदातरी एकटं राहून बघावं...

-am_Ruta

Group content visibility: 
Use group defaults