आखुडबुद्धी राजाला हजार लाईक्स मिळाले

Submitted by सखा on 22 June, 2020 - 00:26

आटपाट नगरात एक आखुडबुद्धी नावाचा राजा होता. त्याच्याकडे सारं काही होतं परंतु तो फार फार दुःखी होता कारण त्याच्याकडे सर्व काही असून लोक त्याच्या Facebook पोस्टला लाईक करत नसत.
एक दिवस राजा प्रातःसमयी नदीकाठी शोक करत असताना तिथे अचानक एक तपस्वी साधू आला आणि त्याने राजास विचारले
"हे राजा तु का शोक करत आहेस?"
राजाने कारण सांगितले तेव्हा तो साधू म्हणाला जर तू गोरगरिबांना तुझ्याकडचे सोने-नाणे वाटले आणि मला फक्त शंभर सोन्याच्या मोहरा दिल्यास तर मी तुला एक उपाय सांगेन.
राजाने त्वरित लोकांना सोने-नाणे वाटून साधू ला 100 सोन्याच्या मोहरा दिल्या तेव्हा साधूने राजाच्या कानात एक युक्ती सांगितली आणि काय आश्चर्य राजाच्या पोस्टला हजारो लाईक्स आल्या.
आता तुम्हाला देखील कुतूहल असेल राजाने नेमके काय बरे पोस्ट केले असावे? आणि साधूचा उपाय काय होता? होय ना?
तर हजारो लाईक मिळवणारी ती राजाची पोस्ट होती:
"तमाम जनतेस कळविण्यात येत आहे की काल घोड्यावरुन पडून माझा पाय मोडला!"
#बोधकथा #साधूप्रजाआणिराजा

Group content visibility: 
Public - accessible to all site users