मी त्या कंपनीत काम करत असताना माझ्या हाताखाली एक सिनिअर मॅनेजरचे रिपोर्टिंग देण्यात आले. त्याला एक महत्वाचा प्रोजेक्ट दिला होता परंतु अनेक महिन्यापासून तो पूर्ण होत नव्हता त्यामुळे मॅनेजमेंट त्याच्यावर नाराज होते.
दोन मीटिंगमध्ये माझ्या असं लक्षात आलं की या माणसाकडे उत्तम टेक्निकल कौशल्य आहे मात्र त्याच्याकडे संभाषण आणि लीडरशिप क्वालिटी नाहीत. माझ्या असंही लक्षात आलं की त्याच्या हुशारीची जाणीव सगळ्यांनाच आहे मात्र आता सगळ्यांनी ठरवूनच त्याला वाळीत टाकायचे ठरवले आहे आणि प्रत्येक दिवशी लोक आज "इस्को साले को कैसा मजा चखाया" यावर बोलत.
मी न बोलता त्याच्या पाठीशी उभा राहिलो कारण पार्ट ऑफ द सिस्टीम बनूनच काम करावं लागतं. मात्र अवघ्या काही दिवसातच तो कंपनी सोडून गेला. लोकांनी बरीच हळहळ व्यक्त केले छान होता वगैरे लोक बोलले मुख्य म्हणजे तेच लोक बोलले.
एकदा त्याचा मला फोन आला आणि जाताना सुद्धा मला खूप त्रास दिला असं त्यांनी मला सांगितले.
मी म्हटलं मित्रा जाऊदे आता तू जिथे आहेस तिथे सुखी आहेस ना मग आता मागचे नको आठवूस. तुम्हाला कल्पना नसेल परंतु काही कारखान्यांमध्ये पॉलिटिक्स अत्यंत हिडीस असते. मला वाटतं एकच रूटीन असल्याने लोक बोर झालेले असतात, गट असतात आणि मग असे काही विकृत खेळ शोधून काढतात.
ठरवून वाळीत टाकणे या खेळाचा हळूहळू लोक विकृत आनंद घेऊ लागतात.
सुशांत सिंगचे पण कदाचित असे झाले असावे.
कुठलेही क्षेत्र असो शिक्षण,उद्योग,समाजकारण,कला,विज्ञान या सगळ्यांमध्ये एखाद्या लायक माणसाला ठरवून कॉर्नर केले जाते. इतकंच काय whatsapp ग्रुप वर पण हा खेळ घडतो. आठवुन बघा नक्कीच तुम्हाला ही काही उदाहरणे आठवतील.
#गेम्स
गेम
Submitted by सखा on 17 June, 2020 - 00:54
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कंपनी डर्टी पॉलीटिक्सचा भरपूर
कंपनी डर्टी पॉलीटिक्सचा भरपूर अनुभव आहे. कंपूत सामील झाले नाही, आपण हुशार असलो, कामाशी काम ठेवत असलो की बाकीच्या रिकामटेकड्या, जुन्या खोडांना बघवत नाही. काड्या करायला सुरुवात करतात.
... करायला सुरुवात करतात.>>
... करायला सुरुवात करतात.>> खरंय
विनोदी लेखन?
विनोदी लेखन?
मायबोलीवर देखील हा प्रकार
मायबोलीवर देखील हा प्रकार झालेला आहे.
उदाहरणे -
दिनेश
ऍमी
वाईट आहे.
वाईट आहे.
एॅमींच काय ??
एॅमींच काय ??
खरच धागा चांगला आहे. पण
खरच धागा चांगला आहे. पण विनोदी नाही.
#गेम्स आहे तर याला विरंगुळा मध्ये हलवा.
सिद्धी आपल्या सूचनेप्रमाणे
सिद्धी आपल्या सूचनेप्रमाणे विरंगुळा मध्ये टाकला आहे.
AMi चा छळ केला इथल्या
AMi चा छळ केला इथल्या काकवांनी. त्यांच्या मताव्यतिरिक्त इतर काही सहन होत नाही म्हणून. मायबोलीवरच्या कंपूबाजीचा कंटाळा येतो खरं तर.. पण असो