एवोकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.

Submitted by अस्मिता. on 14 June, 2020 - 17:01

एवोकॅडो सँडविच , तिरंगी पचडी , अजिलिओ ए ओलिओ.

हे तिन्ही पदार्थ वेगवेगळे आहेत पण मी एकाच धाग्यात लिहिले आहेत.

एवोकॅडो सँडविच

साहित्य .. १ पिकलेले एवोकॅडो , २ हिरव्या मिरच्या, १ लिंबू, वाटीभर चिरलेली कोथिंबीर , २ लसणाच्या पाकळ्या, चमचाभर मध /साखर , थोडे मीठ, १ टमाटा, अर्धा कांदा (साधारण अर्धी वाटीभर चिरून) , मीठ चवीनुसार / अर्धा चमचा, चीज स्लाइस, बटर.

20200611_190118.jpg
*

20200611_191037.jpg
*
20200611_191031.jpg
*
20200611_191326.jpg
*

20200611_191705.jpg
*
20200611_191759.jpg
*
20200611_192556.jpg
*

कृती... एवोकॅडो साल व बी काढून मिक्सर मध्ये घाला. त्यात लिंबू पिळून, चमचाभर मध/साखर , मीठ व हिरव्या मिरच्या (फोटो मध्ये नाहीत पण टाकल्यात ) आणि लसूण घालून व्यवस्थित फिरवून एकजीव करून घ्या.
आता या स्टेपला ही रेसिपी डीपची झाली आहे. पण डीपने पोट नाही भरत म्हणून सँडविच करू Happy !
या मिश्रणात आता बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टमाटा, कोथिंबीर घालून हलवून घ्या. मीठ कमी वाटत असेल तर तेही टाकून घ्या. हे झाले स्प्रेड तयार. आता दोन ब्रेड मध्ये लावून हवे असल्यास चीज स्लाइस वर ठेऊन बटर वर नीट भाजून घ्यावे.

माहितीचा स्रोत...भाची देवकी Happy .

********************************************************

तिरंगी पचडी

हा एक कोशिंबीरीचाच प्रकार आहे. पण मी वाफवून घेतली आहे. मूळ रेसीपीत (हमखास पाकसिद्धी) शिमला मिरची व टोमॅटो होते पण मी नाही घातले. शिवाय कांदा घातला जो नाही घातला तरी चालते.

साहित्य... मोठे मोठे किसलेले गाजर, रेड cabbage मला जांभळा वाटतो हा, थोडा चिरलेला कांदा , मीठ , मिरपूड , थोडे तूप , फोडणी पुरते जिरे, लिंबाचा रस, किंचित साखर.

माझ्याकडे तयार पाकिटे होती म्हणून फार झटपट झाले.

20200611_122914.jpg

कृती...थोड्या तूपावर जिरे घालून कोबी व गाजर कीस वाफवून घ्या. अजिबात जास्त शिजू द्यायचा नाही. मीठ व थोडी साखर आणि चमचाभर मिरपूड घालून वाफवून घ्या.
माझा फार निबर होता, कोवळा असेल तर ही स्टेप गाळली तरी चालेल. नंतर बोल मध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा घालून लिंबू पिळून गरम गरम खायला घ्या. सकाळी केलेले संध्याकाळी चांगले लागत नाही. पुन्हा गरम करू नये. लिंबू भरपूर चांगले लागते.. भाजी ऐवजी चांगले लागते.

20200611_122805.jpg

माहितीचा स्रोत हमखास पाकसिद्धी , चूकुन तीन तीन order केले गेलेले कोलस्ला/coleslaw पाकीटे संपवण्यासाठी केलेली धडपड .

*******************************************************

अजिलिओ ए ओलिओ
साहित्य.. स्पघेटी पास्ता अर्धा पुडा, दोन टेबलस्पून लसणाचे बारीक तुकडे, एक टेबलस्पून चीली फ्लेक्स, तीन टेबलस्पून ओलीव्ह ओईल (no substitute for olive oil please), थोडे किसलेले मोझ्झोरेला किंवा पार्मेजान चीज, थोडी कोथिंबीर, मीठ चवीनुसार.

कृती...पास्ता पाकीटावरील सुचनेनुसार अल डान्टे उकडून घ्या. स्पघेटीच हवा. पेन्ने, बो टाय प्रयोग करू शकता. मी नाही कधी केले.
एका कढईत थोडी गरम झाल्यावर olive oil टाका. नंतर लसूण परतून (सतत हलवणे व आच मिडीयम लो ठेवणे ) घ्या . अर्धवट परतला की चिली फ्लेक्स घालून हलवत रहा. तेलाचा रंग किंचित बदलेल. साधारण लसूण कुरकुरीत झाला की उकडून ठेवलेला पास्ता मधील मोठी अर्धी वाटी पाणी/स्टार्च बाजूला ठेवून बाकीचा पास्ता गाळून घेऊन या तेलावर टाका. अगदी दोन मिनिटे यावर तेल उलटसुलट toss करून सगळीकडे हे तेल व्यवस्थित लागले पाहिजे हे बघा. कोथिंबीर टाका. एक दोन मिनिटात आच बंद करा. ताटात वाढून वरून थोडे चीज भुरभुरावे. खायला तयार.
( मी चुकून चांSगले परतले त्यामुळे रंग गडद आला पण चव छानच लागली.)

20200614_124742.jpg
*

20200614_125812.jpg
*
20200614_130524.jpg
*
20200614_131021.jpg
*
20200614_131323.jpg
*
20200614_131430.jpg

*
माहितीचा स्रोत भाची देवकी. रणवीर ब्रारचा विडीओ सुद्धा आहे ...हा pop झाला होता ती बरीला (Barilla) spaghetti ची दीर्घ जाहिरात होती. हा नंतर दिसला.
यात इतके कमी इनग्रेडियंट आहेत की बदल न करताच छान लागेल. पण केला तर मला सांगा व फोटो जोडा. Happy धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी अँव्हकॅडो स्मूदी / मिल्कशेक करताना त्यात अँपल सुद्धा टाकते >> अच्छा! पुढच्या वेळेला हे करून बघेन.

कारण अँव्हकॅडो नुसतं बऱ्यापैकी गुंईगुंई असतं >> हाहाहा! हा शब्द आवडलाय. गुंईगुंई Happy

एक अख्ख पोटात जाण्यापेक्षा अर्ध अँपल आणि अर्ध अँव्हकॅडो >> दोन्ही फळं अर्धी कापून ठेवली तर न वापरलेला गर काळा पडत जातो. लिंबाच्या रसाने थोडा वेळ ते टिकेल, पण फार नाही. तुम्ही उरलेल्या अर्ध्या सफरचंद आणि लोणी फळाचं काय करता? की खाणारी/पिणारी माणसे जास्त असल्यामुळे संपून जातात?

धन्यवाद हरचंद पालव,
आधी मी दोन माणसे पिण्यास उत्सुक आहेत का नाही ते बघते. बहुतेक वेळा मुलगा असतो तयार Happy . नाही तर उरलेल्याचे डीप करून संपवतो.
साहित्यामध्ये पिण्यास उत्सुक दोन व्यक्ती..... लिहायला हवे होते. Happy
सर्वांचे आभार.

तुम्ही उरलेल्या अर्ध्या सफरचंद आणि लोणी फळाचं काय करता? >>>. उरत नाही. आम्ही दोघे आठवड्यातला एक दिवस हाच ब्रेकफास्ट करतो, त्यामुळे एक अँपल आणि एक अँव्हकॅडो मध्ये दोन ग्लास मिल्कशेक बनवते आणि दोन्ही फळं सम्पतात. एक दिवस एका अँव्हकॅडोचं ग्वाकामोले रोल किंवा सँडविच. ते पण एकाचं दोघांना पुरतं.
आठवड्यात दोनच अँव्हकॅडोचं पॅकेट आणते, त्यामध्ये दोन जणांचा दोन दिवसांचा ब्रेकफास्ट होतो. (मुलगा included नाही, तो प्रोफेशनल प्लेअर असल्यामुळे क्लबच्या डाएटिशिअन ठरवलेले ब्रेकफास्ट द्यावे लागतात)

आधी मी दोन माणसे पिण्यास उत्सुक आहेत का नाही ते बघते >>
आणि
उरत नाही. आम्ही दोघे आठवड्यातला एक दिवस हाच ब्रेकफास्ट करतो >>

तात्पर्य, मला सुकडू सुतारसाठी अर्धा मिल्कशेक काढून ठेवायला पाहिजे! Happy

हे आमचं.aglio e olio and spinaci mhanjech paalak.,,.ek change sangu ka asmita? Pastya मधे mozzarella पेक्षा कधीही parmesan टाकले तर खूप छान लागते.आणी मी ह्याच्या मध्ये roasted almonds व थोडे लिंबू पिळून घेते.protein packed breakfast होतो.

अरे वा , मानसी छान दिसते आहे स्पघेटी.
mozzarella पेक्षा कधीही parmesan .....
हो गं , सहमत आहे पण नेमकं संपले होते. Roasted almond idea चांगली आहे. धन्यवाद . Happy
Spinach and broccoli both work. I have tried.
Broccoli needs to be steamed though.

Ok.aaj man ghatta karun aani nawryacha exclamation marks kade Purna durlaksha karun avocado aanle aahet.sandwich jhalyawer foto taken.btw te piklele aahet ki nahi kase olkhayvhe? Mhanje khanyasathi ready wagaire,?

Pages