दूर स्मशाणी प्रेत राहिले

Submitted by निलेश वि. ना. शेलोटे on 13 June, 2020 - 06:36

स्वप्न जणू ते प्रेत राहिले
दूर स्मशाणी बेत राहिले

मी न जराही नाव घेतले
दोष तरी का देत राहिले

ठेव दुरावा तूच बोलले
सूड अनोखा घेत राहिले

काय ढळू मी व्यर्थ आसवे
रिक्त दिलासे येत राहिले

हीच म्हणाले काय ओळखी
रोज उधारी नेत राहिले

जोर कशाला आज पावसा
फार कुठे का शेत राहिले

निलेश वि. ना. शेलोटे
वृत्त:- दीपकमाला
(गाललगागा गालगालगा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान....!

जोर कशाला आज पावसा
फार कुठे का शेत राहिले

मस्त होता.

-दिलीप बिरुटे

@प्रगल्भ
@दिलीप सर
@joshnilu

मनापासून धन्यवाद