"नागराज, तू म्हातारा झालास."
जटाभुजंग गडगडाटी हास्य करत म्हणाला.
नागराजाने मोठ्या कष्टाने डोळे उघडले. त्याच्या कष्टाने होणाऱ्या शारीरिक हालचाली बघून जटाभुजंगाला समाधान वाटले.
"हजार वर्षे नागराज, हजार वर्षे. नऊ जटाभुजंग तुझ्याशी लढता लढता प्राणाला मुकले. आज हा जटाभुजंग तुला संपवणार. तुझ्या सहस्त्र वर्ष आयुष्याचं वरदान आज संपेल नागराज. तुझ्या प्रत्येक पुनर्जन्माला मी जन्मताच संपवणार. हे सर्पसत्र जोपर्यंत त्यात शेवटच्या सर्पाची आहुती पडत नाही, तोपर्यंत चालू राहील."
त्याने तलवार हातात घेतली, व तो नागराजाकडे निघाला.
हजार वर्षे पुरून उरलेला आपल्या पंथाचा सर्वात मोठा शत्रू असा गलितगात्र पडलेला बघून त्याला अतीव समाधान वाटले.
'नागराजाची हजार वर्षे पूर्ण झाल्यावर मी नसेन, पण त्यानंतर त्याचा पुनर्जन्म होईल. पण त्याआधी तू त्याला मारशील असं मला वचन दे. त्याचा मृत्यू जटाभुजंगाच्या हातूनच व्हायला हवा.'
नवव्या जटाभुजंगाचे त्याला शब्द आठवले...
तो चालत होता.
नागराज शेवटची तडफड करताना त्याला दिसला.
चालताना अचानक त्याच्या पायाखाली काहीतरी चुरा झाल्याचा आवाज आला.
त्याने खाली बघितले.
नागाची अतिशय जुनी अशी संपूर्ण कात त्याच्या पायाखाली पडलेली होती!!!
'लक्षात ठेव, साप मेल्यावर त्याचा पुनर्जन्म होतोच, पण सापाने त्याची संपूर्ण कात टाकणं म्हणजे त्याचा दुसरा पुनर्जन्म मानला जातो.'
त्याला नवव्या जटाभुजंगाचे शब्द आठवले!
...तो आता नागराजाच्या अतिशय जवळ होता. नागराज त्याच्या टप्प्यात होता!
की तो नागराजाच्या?
त्याच्या मणक्यातून एक थंड लहर गेली. त्याने त्रिशूळावरची पकड अजून घट्ट केली...
आता मात्र नागराजाची अतिशय तुकतुकीत, चकाकती कातडी बघून तो गर्भगळीत झाला.
...आणि पुढच्याच क्षणी तो मानसिक धक्क्याने खाली पडला...
कारण निमिषार्धात नागराजाने फणा काढून त्याच्याभोवती गिरकी घेतली होती, व रात्रीच्या अंधारात तो कुठेतरी दिसेनासा झाला होता!
जटाभुजंग खडबडून उठला.
"पुनर्जन्म झालाय जटाभुजंगा..." एका खोल दरीतून यावा तसा फुसफुसत एक मानवी आवाज आला.
'संपलं सगळं.'
जटाभुजंग हतप्रभ झाला. त्रिशूळ खाली टाकून त्याने पद्मासन घातले, आणि शांतपणे तो मृत्यूला सामोरं जाण्यासाठी तयार झाला.
...दंश होऊन त्याची गात्रे केव्हा शिथिल झाली, त्याचं त्यालाच कळलं नाही!
समाप्त!
माझ्या आगामी 'विषकन्या, नागलोक व हलाहल' या 'काल्पनिक' पुस्तकांच्या ट्रायलॉजीमधून साभार 
तळटिपा -
१. जटाभुजंग - जन्मेजयाच्या सर्पसत्रात सर्पाचा विनाश करण्यासाठी एक खास तुकडी नेमण्यात आली होती, पुढे जाऊन त्यांनी स्वतःची वेगळी जमात निर्माण केली, व त्या जमातीला 'सर्पांतक' म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचा प्रमुख 'जटाभुजंग' म्हणून ओळखला जाऊ लागला. बारा जटाभुजंग खालीलप्रमाणे.
१. भुजंगतुंग
२. निनाद
३. चंद्रशेखर
४. धराधरेंद्र
५. प्रमोद
६. निरुद्धदुर्धर
७. कदंब
८. मदांध
९. भुजंगराज
१०. नायकम
११. विषकन्या नंदिनी
१२. विषकन्या विजृंभणा
२. नागराज - संपूर्ण तक्षक जमातीचा अधिपती. सहस्त्र वर्षाच्या आयुष्याचं वरदान लाभलेला.
दोन नागराज खालीलप्रमाणे
१. नागराज तक्षक (संस्थापक)
२. नागराज अनंदशयनम
लेखनशैली अप्रतिम. नियमित
लेखनशैली अप्रतिम. नियमित लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा.
अरे वा छान चुरचुरीत (छोटीशी
अरे वा छान चुरचुरीत (छोटीशी म्हणून), सळसळीत ( सापाची असल्याने) गोष्ट. तुमची ती तळटीप वाचेपर्यंत मन त्या गोष्टीत होतं तळटीपेने वास्तवात आणलं
भारी आहे हे....
भारी आहे हे....
चाहत्यांची सेंच्युरी झाल्याबद्दल अभिनंदन!!!
मस्त आवडली
मस्त
आवडली
@रुपाली - धन्यवाद. तुमचे
@रुपाली - धन्यवाद. तुमचे नियमित प्रतिसाद हुरूप आणतात.



@धनुडी - मस्त उपमा. धन्यवाद
@अजय - धन्यवाद! फावल्या वेळात लिहिली.
आणि अभिनंदनाबद्दल धन्यवाद. खरं सांगायला गेलं, तर या गोष्टीचा मी जास्त विचार केलाच नव्हता. पण कुठेतरी आपले १०० चाहते लिस्टमध्ये असणं, इज नाईस फिलिंग
त्याबद्दल मी सगळ्यांच्या ऋणी आहे...
@किल्ली - धन्यवाद.
मस्त! कथा आवडली..
मस्त! कथा आवडली..
अवांतर!
लेखक महोदयांनी, कृपया भूतकालातले प्रयोग आधी पुर्णत्वास न्यावेत! ही विनंतीवजा_ _ _!

माझ्या आगामी 'विषकन्या,
माझ्या आगामी 'विषकन्या, नागलोक व हलाहल' या काल्पनिक पुस्तकांच्या ट्रायलॉजीमधून साभार### ही कुठे वाचायला मिळेल..
@मन्या - धन्यवाद. हो नक्की
@मन्या - धन्यवाद. हो नक्की सगळे प्रयोग पूर्णत्वास जातील.
@योगिताकिरण - धन्यवाद. असली काही पुस्तके नाहीतच. जस्ट फॉर फन, म्हणून काल्पनिक पुस्तके असं लिहिलंय.
पण भविष्यात असं काहीतरी लिहायचा मानस आहे, जमलं तर, आणि हा प्रयोग सगळ्यांना आवडला तर.
अस्सं होयं..पण लिहाच आता
अस्सं होयं..पण लिहाच आता नक्की
खूप मस्त आवडली.
खूप मस्त आवडली.
!
तुमचे खरे पुस्तक आल्यावर ही घेऊच
शुभेच्छा त्यासाठी .
Mastach
Mastach
आवडली भारीये.. जटा भुजंग मानव
आवडली भारीये.. जटा भुजंग मानव आहे का? कि एक जातच सर्पामधील? त्रिशूल हातात धरला म्हणजे मानव/देव/दानव वाटतोय.. पण जटा भुजंग?
लिहा पुढे हि कथामालिका..
फुस्स....
फुस्स....
छान झाली आहे कथा, पण फार लवकर संपली. पुलेशु
शंभर चाहत्याबध्दल अभिनंदन. तो
शंभर चाहत्याबध्दल अभिनंदन. तो शंभरावा मीच
@योगिताकिरण - धन्यवाद. जमलं
@योगिताकिरण - धन्यवाद. जमलं तर नक्की लिहीन.
@मी अस्मिता - धन्यवाद! पण मी एक हौशी लेखक आहे, पुस्तक वगैरे काढण्याचा मानस नाही. जे आहे ते इथेच मांडतोय
@ स्नेहलता - धन्यवाद
@शीतलकृष्णा - धन्यवाद. जटाभुजंगविषयी धाग्यात माहिती अपडेट करतो.
@ पाफा - धन्यवाद. अजून याच थिमवर काही जमलं तर लिहितो.
मस्त आहे कथा!!!
मस्त आहे कथा!!!
माझ्या आगामी 'विषकन्या, नागलोक व हलाहल' या 'काल्पनिक' पुस्तकांच्या ट्रायलॉजीमधून साभार>>> हे पण लवकर येऊ दे
आवडलं
आवडलं
@nautanki - धन्यवाद. मी
@nautanki - धन्यवाद. मी पुस्तकांविषयी खरंच काहीही ठरवलं नाहीये
इट वॉज जस्ट फॉर टिजिंग! पण आता विचार करतो.
@पाचपाटील - धन्यवाद
विषकन्या , नाग नागिण माझा
विषकन्या , नाग नागिण माझा आवडता प्रकार आहे
लिहाच नक्की
मजा येइल
धन्यवाद किल्ली...
धन्यवाद किल्ली...
पेंडिंग वर्क पूर्ण झाल्यावर करतो विचार....
मस्त कलाटणी ....
मस्त कलाटणी ....
धन्यवाद प्रवीणजी
धन्यवाद प्रवीणजी
भारीये ...दहावा जटाभुजंग पण
भारीये ...दहावा जटाभुजंग पण गेला, आता सगळी जबाबदारी विषकन्यांवर का ..
@ए_श्रद्धा - धन्यवाद.
@ए_श्रद्धा - धन्यवाद.
अजून काही ठरवलं नाही, पण दहावा जटाभुजंग गेल्याने आता सर्पांतक जमातीवर निर्णायकी अवस्था निर्माण झालीये.
सर्पांच विष हे त्यांचं सर्वात प्रमुख अस्त्र होतं, त्यामुळे जटाभुजंग धराधरेंद्र याने त्याच्या जमातीतील काही निवडक लोकांवर सौम्य विषाचा प्रयोग करायला सुरुवात केली. मात्र यात पुरुष मंडळीपेक्षा स्त्रिया जास्त प्रमाणात विष पचवू शकतात, हे त्याच्या लवकर लक्षात आले. अशा निवडक स्त्रियांची उपजमात म्हणजे 'विषकन्या'
शिल्पीनी ही पहिली विषकन्या म्हणून गौरवली गेली.
भारी कथा. काल्पनिक पुस्तके
छान कथा. काल्पनिक पुस्तके लवकरात लवकर सत्यात उतरावेत हीच सदिच्छा!
मस्त कथा!
मस्त कथा!
अजुन वाचयला नक्कीच आवडेल
Submitted by महाश्वेता on 13
Submitted by महाश्वेता on 13 June, 2020 - 17:56>>>

धन्यवाद महाश्वेता, नक्की
धन्यवाद महाश्वेता, नक्की प्रयत्न करेन.
धन्यवाद आबासाहेब. आज एक अजून कथा टाकतो. छोटीशीच आहे, पण आवडेल अशी आशा आहे.
वा सुंदर आहे !
वा सुंदर आहे !
ही माहिती नवीन होती .
बीपीनजी धन्यवाद.
बीपीनजी धन्यवाद.
ही माहिती संपूर्णपणे काल्पनिक आहे. खरी नाही
Pages