नमस्कार,
(मराठी) सा रे ग म प आजचा आवाज एक सामान्य प्रेक्षक म्हणुन पाहताना काही विचार मनात आले म्हणुन लिहित आहे. (काहीच्या काही लेखन असा विभाग नसल्याने "ललित" मधे टाकत आहे
(अॅडमिन, इथे योग्य वाटले नाही तर कृपया योग्य जागी हलवाल का?)
बर्याच वेळा हे कार्यक्रम पाहताना असे वाटते हाच कार्यक्रम आज पासुन ३० वर्षानी झाला समजा तर हे लोक कुठली गाणी म्हणतील? नेहमीचीच यशस्वी खळे, मंगेशकर, फडके , देव, लता, आशा इ इ?
यांची गाणी सदाबहार आहेत यात शंकाच नाही पण म्हणुन यांच्या तोडीचे सध्या नवीन काहीच चांगले तयार होउ नये? मी ऑनलाईन कुठल्याही साईट वर गेलो की नकळत मी याच नावांकडे ओढला जातो, नवीन चांगले असे माझ्या पाहण्यात/ऐकण्यात फार कमी आलेले आहे.
पूर्वीच्या काळच्या बर्याच कलावंतांची आर्थिक परिस्थीती तितकीशी चांगली नव्हती. त्याना झगडुन बरच काही मिळवावे लागले होते. आता या नवीन कलाकाराना बरीच चांगली परिस्थिती असतानाही असे काही छान काम करता येउ नये?
बर्याच लोकांचा भर जुनी प्रसिद्ध गाणी गाणे किंवा जुन्या गाण्याना रीमिक्स करणे इतपतच आहे.
(संदीप खरे/सलील कुलकर्णी यांच्या चाहत्यानी मला क्षमा करावी..त्यानी ओरिजनल काम केले आहे, मी त्यांचेही अल्बम ऐकलेले आहेत पण मनाला भिडेल अस मला स्वतःला काही वाटले नाही).
कदाचित नवीन असे काही सुंदर काम झाले असेल तर मी miss केले बहुतेक. (अगबाई अरेच्चा! मधली काही गाणी हा सन्माननीय अपवाद! पण असे अपवाद फारच कमी आहेत.)
तुम्हाला काय वाटते? असे चांगले काम आता होतय का? मला असे चांगले नवीन "original" ऐकण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला माहित असेल तर मला सांगाल का?
धन्यवाद.
जीडी
जीडी
संदीप सलिल
संदीप सलिल ची गाणी आधी खुप आवडली होती पण मग जस जशी ऐकत गेले तस तसं लक्षात यायला लागल की यात खुप तोच तोचपणा आहे नवीन काहीच नाहीये. यांना श्रोत्यांची नाडी कळली आहे त्यामुळे तशाच कविता आणि तशाच चाली सगळीकडे. मग ते खुपच र्रटाळ वाटायला लागलं
पण हल्लीच ऐकलेली आणि खुप आवडलेली म्हणजे "मायबाप" आणि "आईशप्पथ" या दोन चित्रपटातली गाणी. रागदारीवर आधारित आणि खुप छान वाटली. "सावली" पण छान आहेत.
पण जांनी ऐकली नसतील त्यांनी "मायबाप" आणि "आईशप्पथ" आवर्जुन ऐकाच.
मात्र मयबाप ची गाणी मुळ चित्रपट आणुन ऐका. नुसती गाणी ऐकु नका. पहा.
.................................................................................
शहाण्याचे ते कसले जगणे? जगाप्रमाणे जगती ते...
वेडे जगती मनाप्रमाणे! मग जगही त्यांच्यामागे वेडे....!!
मनिषा,
मनिषा, सलिलसंदिपबद्दल मलाही तुझ्यासारखेच वाटते आता.. मी ही उत्साहाने ऐकायला सुरवात केलेली पण कधीकधी तर आधीचे गाणे संपले कुठे आणि नवीन कुठे सुरू झाले तेही कळत नाही, इतके साम्य असते. पण तरीही, काहीतरी चांगले नक्कीच ऐकायला मिळते ह्या दोघांकडुन.
मायबाप बघते आता आणुन.
*****&&&*****
Excellence is not for someone else to notice but for your own satisfaction and efficiency...
जगात सात
जगात सात आश्चर्ये मानली जातात
तशी पुन्हा होणे नाही!
अशी की त्यान्ची पुनरावृत्ती पुन्हा कधीच झाली नाही!
अगदी त्याचप्रकारे, गेल्या शतकात, मराठि अन हिन्दी भाषकात, गाण्यान्बद्दल जी चढाओढ झाली, त्यातुन निर्माण झालेली गायकीची रत्ने, अन्य सात आश्चर्यान्पैकीच आहेत!
बोलपट आल्यावर त्याचा जास्तीतजास्त अन अचूक वापर करुन घेण्यामधे मराठी अन हिन्दी चित्रपटस्रुष्टी कुठेही कमी पडली नाही तर नाट्य सृषीदेखिल यास अपवाद नव्हती!
सध्या मात्र, वर कुणी कुणि म्हणल्याप्रमाणे, वाद्यान्चा गोन्गाट केवळ, झालच तर मागे भसाडे कोरस, यात "गायकी" लुप्त झाली आहे! सूर स्वर आन्धळ्यासारखे चाचपडत शोधावे लागतात! कोणतीच लकेर मनास भिडत नाही! एखाद दुसरा "मोरया मोरया" सारख्याचा अपवाद की जिथे प्रचन्ड प्रमाणात वाद्ये असुनही, ते गाणे आवडले जाते, पण, पण शब्द लक्षात रहातातच असे नाही!
रणान्गणावर लढायला जाताना अन्गात वीरश्री निर्माण व्हावी म्हणून केला जाणारा वाद्यान्चा गजर अन सध्याचे सन्गित यान्च्यात मला तरी फारसा फरक वाटत नाही
अर्थातच, मज सारखा सामान्य माणूस, रोजच्या रोज कानीकपाळी, रणान्गणावरील युद्धसदृषस्थिती अनुभवण्याकरता वाद्यान्चा गजर ऐकत ऐकत मधेच कान देऊन शब्द शोधत बसेल काय?
नक्कीच नाही!
असो
लिंबू,
लिंबू, याबाबतीत आपणच मागासलेले ठरतो आहोत.
हि नविन मंडळी का लोकप्रिय होतात, का गाजतात हेच कळत नाही.
आपण नापसंती दाखवली, तर तूम्हाला नव्यातले काहि कळतच नाही, असे ऐकावे लागते.
बरं यांची लोकप्रियता किती काळाची ? ( का आठवड्यांची ?)
नवा आला कि जूना गेला.
आपण आपलीच गाणी ऐकत बसू या, कसे ?
अगदी बरोबर
अगदी बरोबर दिनेशभाऊ!
माझे काही मुद्दे १. ह्या भाऊ
माझे काही मुद्दे
१. ह्या भाऊ गर्दीत मिसळण्याची इछ्छा नसलेले कलाकार असतीलही कदाचित कुठे तरी अन्धारात. आज कुणाकडे एक लाख रुपये असतील तर तो CD प्रकाशित करू शकतो. त्यामुळेच भरम्साठ सन्गीत सगळीकडे माजलय. जे सन्गीत स्वतहा चालत तुमच्याकडे येते ते निक्रुश्ठ्च असणार. चान्गले सन्गीत आणी कलाकार जिथे असतील तिथे आपण पोहोचले पहिजे. त्या शोधाचा ध्यास घ्यायला हवा.
असे एखादे ठिकाण पाहिजे जिथे गुणिजन असतील ; जे गोन्गाट नसलेले सन्गीत ऐकतील.
२. सन्गीत्कारान्साठी महत्वाचे कि त्यान्नी फक्त नवेपणाचा ; परिपूर्णतेचा ध्यास घ्यावा , प्रसिद्धीचा नाही ; ती आपोआप्च येइल ; त्याची घाई नको. त्याने फक्त आपल्या कामाबद्दल अत्रुप्त रहावे . (Stay Hungree).खूप प्रगती होईल सन्गीताची !
एकदम बकवास!!!
एकदम बकवास!!!
भारतीय/मराठी मानसिकतेला किंवा
भारतीय/मराठी मानसिकतेला किंवा भावनाना नवीन संगीत अजूनही कदाचित suit होत नसावं. खरं सांगायचं तर नवीन संगीतकारही खूप छान संगीत देताहेत. पण कदाचित सूर आधी मग शब्द, किंवा खूप जास्त instrumentation झाल्यामुळे असे होत असावे.
स्वानुभव सांगते,माझ्या काही
स्वानुभव सांगते,माझ्या काही कवितांचं गीतरुपांतर 'चंद्रस्वप्न एकले' या म्यूझिक अल्बमच्या रूपाने मी आणि माझे कलीग सन्मित्र व नव्यानेच संगीतकाराच्या भूमिकेत शिरलेले श्री मिलिंद म. सोमण यांनी २००४ मध्ये केले.. या निर्मितीस इतर सुहृदांनी हातभार लावला. या निर्मितीसाठी मला २००५ चा 'अल्फा गौरव -तत्कालीन झी मराठी- सर्वोत्कृष्ट गीतकार- पुरस्कार- ' कोणत्याही वशिलेबाजी वगैरे शिवाय मिळाला, माझ्या ग्रूपचा उत्साह खूप वाढला.
इथेच सर्व संपले. त्यापुढच्या 'निळाई' ची सर्व सिद्धता असून एकाही म्यूझिक कंपनीने तिची निर्मिती करण्याची तयारी दाखवली नाही. मराठी कॅसेटस कशा पडून रहातात, मराठी लोकांना काही नवे खपवण्यासाठी कशी प्रचंड खर्चाची तयारी असली पाहिजे अशी व्यावहारिक कटू सत्ये तर्हेतर्हेने ऐकून आम्ही शांत झालो !!
त्यानंतर तरीही माझ्या जिद्दी मैत्रिणीने माझ्या रचनांचे मुंबईत काही संगीत सोहळे केले, प्रत्येक वेळी खूप कौतुक झाले, पण त्यातून काही स्थायी निर्मिती नंतर होऊ शकली नाही. आमची खर्च करण्याची वैयक्तिक क्षमताही संपली होती.
सा रे ग म वगैरे कार्यक्रमात तीच ती गाणी ऐकताना हे सर्व आठवल्याशिवाय रहात नाही..
सतत तुलना करणे सोडावे
सतत तुलना करणे सोडावे लागेल!
उदाहरणार्थः निवडूंग, जोगवा यांमधील गीते खूपच सुंदर आहेत.
"Change is only constant"
आपल्याला नविन पिढीला संधी द्यावी लागेल.
Pages