आषाढाची वारी

Submitted by सुप्रिया राज जोशी on 10 June, 2020 - 11:00

आगळ्या वेगळ्या प्रावासाची माझी आवड मायबोली च्या वाचकांना आता थोडीफार माहीत आहे. पण तसेही ट्रीप म्हटल्यावर सर्वांना उत्सुकता वाटतेच. प्रत्येकाची प्रवासाची आवड निवड वेगवेगळी असते तशा प्रत्येकाच्या प्रवासाच्या मर्यादाही ठरलेल्या असतात. सहसा आपण त्या मर्यादा पार करून कुठचा प्रवास करायला बघत नाही. पण अशा प्रवासाबद्दल आपल्याला कुतूहल मात्र असते. अनेकांना माझ्या प्रवासाची गोष्ट खूप विचित्र वाटली असेल. पण आपल्या माहितीत नाहीत असे अनेक भन्नाट प्रवास लोक करत असतात.

अशाच एका अद्भुत प्रवासाची गोष्ट मी नुकती ऐकली. घरबसल्याच इतरानाही ती ऐकायला मिळावी म्हणून तीच गोष्ट फेसबुक फेसबुक लाइव्ह वर मी ब्रोडकास्ट करायची ठरवली.
परवा १२ जून ला आळंदीहून माउलींच्या पादुकांचे प्रस्थान होईल. उद्या रात्री पासूनच सारे वारकरी मात्र मनाने तिथेच पोहचले ही असतील.
त्याच पंढरपूरच्या वारी ची गोष्ट आहे! वारकरी युवा मंचाचे संस्थापक, अक्षय भोसले, आपल्याला ती अद्भुत गोष्ट सांगणार आहेत. मायबोली वरच्या वाचकांना सुद्धा ऐकायला आवडेल असे वाटले म्हणून इथे मुद्दाम लिहिले.

आज गोष्ट ऐकायला मिळते आहे. कोणास ठाऊक, त्यातून कोणाला आपापल्या चौकटीच्या बाहेरचा प्रवास करायची प्रेरणाही मिळेल. सर्वांना सस्नेह आमंत्रण देत आहे ... फेसबुक लाइव्ह साठी ... उद्या गुरुबार ११ जून संध्याकाळी सात वाजता.

fb live annoucement copy.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users