तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है।

Submitted by बिथोवन on 10 June, 2020 - 10:08

दुनिया जिसे कहते हैं, जादूका खिलौना है
मिल जाये तो मिट्टी है, खो जाये तो सोना है’

किती साधेसरळ उत्तर आहे माणसाच्या मनात माजणाऱ्या गोंधळाचे! ‘जे मिळाले नाही तेच महत्वाचे वाटत राहणे हा मानवी स्वभाव, आणि हवे ते मिळाले की संपली त्याची आस. हीच ती
मृगतृष्णा! हरणाला लांबवर पाणी असल्याचा भास आणि मोठ्या कष्टाने तिथे पोहोचले कि ते गायब होउन पुन्हा दूरवर परत ते पाणी दिसू लागते ते मृगजळ. तसेच मानवी जीवनाचे आहे असं हा शायर सांगतोय. शायर आहेत निदा फाजली. जे मिळाले ती माती आणि जे मिळाले नाही ते सोने! निदा फाजली हे टोपण नाव मुक्तदा हसन यांचं. उर्दू शायरीतली वजनदार असामी. माती आणि सोन्याची गोष्ट त्यांच्या आयुष्यात ही घडली.

ग्वाल्हेरच्या राणी लक्ष्मीबाई कॉलेजमध्ये ते शिकायचे. त्यांच्याच वर्गातल्या विद्यार्थिनी वर त्यांचा जीव जडला आणि तिच्यासाठीच रोज कॉलेजला जायचे. त्यांची ना कधी भेट झाली ना कधी संवाद. अन् एके दिवशी कॉलेजच्या नोटीस बोर्ड वर त्यांनी वाचलं. _“कुमारी टंडनका एक्सिडेंट हुवा हैं और अब वो नही रही.”_

या घटनेनंतर मुक्तदा उदास आणि अबोल झाले. एके दिवशी संत सूरदास यांच्या भजनाच्या ओळी त्यांच्या कानावर पडल्या. ‘मधुबन तुम क्यौं रहत हरे? बिरह बियोग स्यामसुंदरके ठाढ़े क्यौं न जरे?’ ( कृष्णाच्या विरहात उदास झालेली राधा फुलांच्या बागेत झाडांना म्हणते आहे " तू अजून हिरवीगार कशी? कृष्णाच्या विरहात तू जळाली कशी नाहीस?) . हे ऐकल्यावर निदा फाजली यांना अव्यक्त प्रेम म्हणजे काय ते कळाले. सूरदास यांचे सर्व साहित्य त्यांनी वाचले. या संताची हृदयाला भिडणारी भाषा त्यांच्या शायरीत आली आणि सोबत आले तत्वज्ञानही.

" दुनिया जिसे कहते हैं, जादूका खिलौना है"
" मिल जाये तो मिट्टी है, खो जाये तो सोना है’"
जगजीत आणि चित्रा सिंग यांनी ही गझल लोकप्रिय केली.

या गझलेतील पुढचे कडवे निसर्गातील एक साधे निरीक्षण पण शायर आशयघन अश्या दोन ओळी निर्माण करतो:

‘बरसातका बादल तो, दीवाना है, क्या जाने
किस राहसे बचना है,किस छतको भिगोना है’
भर पावसात ज्यांचे छत कोरडेच राहिले ते ही ओळ ऐकून नियती मुकाटपणे स्वीकारायला हवी अशी स्वतःला समजूत घालतात.

‘ग़म हो कि ख़ुशी दोनों, कुछ देरके साथी हैं
फिर रस्ताही रस्ता है, हँसना है न रोना है’
ह्या ओळी म्हणजे मानवी जीवनाच्या क्षणभंगुरतेचे सुंदर वर्णन.

‘आवारा मिज़ाजीने फैला दिया आंगनको
आकाशकी चादर है, धरतीका बिछौना है’
संत कबीरदासजींचे भजन आहे, ‘मन लागो यार फकिरीमे.’* तोच मूड व्यक्त करणा-या निदाजींच्या या ओळी.

कॉलेजातल्या त्या अव्यक्त प्रेमाबद्दल त्यांनी लिहिलं होतं:

‘तू इस तरहसे मेरी ज़िंदगीमें शामिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है.’

तेरे बगैर जहाँ में कोई कमी सी थी
भटक रही थी जवानी अंधेरी राहों में
सुकून दिल को मिला आ के तेरी बाहों में
मैं एक खोई हुई मौज हूँ तू साहिल है
जहाँ भी जाऊँ ये लगता है, तेरी महफ़िल है

ये आसमान, ये बादल, ये रास्ते, ये हवा,
हर एक चीज़ है, अपनी जगह ठिकानेपे,
कई दिनोंसे शिकायत नहीं ज़मानेसे,
ये ज़िंदगी है सफ़र, तू सफ़रकी मंज़िल है,
जहाँ भी जाऊ, ये लगता हैं तेरी महफ़िल है।

आणि शब्दांवर प्रभुत्व असलेला, मोजक्या शब्दात आशय मांडणारा हा शायर एका शे'रमध्ये म्हणतो-

" धूपमें निकलो, घटाओंमें नहाकर देखो
ज़िंदगी क्या है किताबोंको हटाकर देखो"

आपल्याला हे पावसात भिजायला आणि उन्हात फिरायला जमायला लागलं की समजावं
आयुष्य शब्दांच्या पलीकडले आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अज्ञातवासी!
वाव! थॅन्क्स.... "फर एलिझ' या जर्मन शब्दाचा अर्थ. 'एलिसासाठी'.. फॉर एलिस! अभिजात संगीत आणि 'फर एलिझ' यांचं अगदी जवळचं नातं. ही रचना पियानोसाठी ए मायनर मध्ये लिहिली गेली. सुरुवातीला एक 'ए थीम' वाजते. या थीममध्ये उजव्या हातानं मेलडी वाजवताना डावा हात एक प्रकारची साथ देतो. या थीमनंतर दुसरी 'थीम बी' वेगळ्या पट्टीमध्ये वाजते. मग पहिली 'थीम ए' मूळच्या पट्टीमध्ये वाजते. यानंतर तिसरी 'थीम सी' तिसऱ्या पट्टीमध्ये वाजते आणि शेवटी पहिली 'थीम ए पुन्हा एकदा मूळच्या पट्टीमध्ये वाजते. या रचनेचा फॉर्म ए-बी-ए-सी-ए म्हणजे रॉन्डो फॉर्म' आहे.

गंमत म्हणजे बीथोवनची प्रेयसी थेरेसे हिच्यासाठी ही रचना लिहिली गेली. पण जग मात्र ही एलिसा कोण असेल याविषयी तर्कवितर्क करत राहिलं...!
आपल्याकडे हमखास हे संगीत गाडी रिव्हर्स गिअरमध्ये घेताना असतेच पण खूप कर्कश... तैवान मध्ये कचरा उचलणाऱ्या गाड्यांना असला हॉर्न बसवलाय!

बिथोवन मस्त प्रतिसाद, खरं सांगायला गेलं तर यातल्या काही गोष्टी मला आधीही माहिती होत्या, पण मराठीत वाचायला छान वाटलं.
बिथोवनशी आधी नातं जडलं, ते वायोलिनच्या क्लासला. आमचे गुरुजी (हो त्यांना आम्ही जोशी गुरुजीच म्हणतो, आणि त्यांना आवडतदेखील.) एकदा बिथोवनविषयी बोलायला लागले, की कितीतरी वेळ बोलत बसतात. मर्यादा नाही.
फर एलिस ही बिथोवनची सगळ्यात सुंदर रचना असं मलातरी वाटतं. किंबहुना वायोलिनवर वाजवताना थोडं वेगळेपण येत असलं, तरी उसमे जो दर्द है, जो प्यार है, त्याला तोड नाही. Happy
तसं कॉपीराईट नसल्याने फर एलिझ कुणीही कुठेही वापरू शकतात. Inglourious basterds ते Django Unchained मध्ये सुद्धा tarantino ला फर एलिझ वापरताना बघून ऑ झालं होतं, पण त्याने ज्या सिनसाठी त्याचा वापर केला, तो बिथोवनचा गौरवच होता, आणि हे पुन्हा बघितल्यावर कळाल. पण रिवर्स गियर आणि कचऱ्याच्या गाडीसाठी याचा वापर करणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, इथली पापे इथेच फेडावी लागतात. Lol

बिथोवन किंवा अज्ञातवासी सिम्फन्यांवर धागा काढा एक फर्मास. आता डोक्यात फर एलिझ आणि मोझ्झार्तची सिम्फनी नं 40 वाजत आहेत.. 40 वाजत आहे कारण आज सकाळी सलील चौधरींच इतना ना तू मुझसे प्यार बढा ऐकलं होतं जे 40 वर बेतलं आहे.

हा मान बिथोवन यांनाच देऊयात. त्यांचा तो हक्कच आहे (नावानिशी शाबीत Lol
मात्र मी कायम पडीक राहील त्या धाग्यावर!
बादवे, आमच्यासारख्या शिकाऊ व्हायोलिन वादकांसाठी मोझार्ट हे फार मोठं वाड्मय आहे. Happy

व्वा... ब्रॅड पिट आणि मायकेल फॅसबेंडर.. अज्ञात वासी... तुम ने तो दिल के तार छेड दीये भय्या...! क्वेंटीन म्हणजे हिंसा.. पण मोहक हिंसा..! येस... तुम्ही म्हणता तसं फर एलिस चित्रपटाच्या प्रसंगाला साजेसा. आणि त्याचा दुरुपयोग केला तर पापं फेडावी लागतील या विधानावर तर जान कुर्बान! भ्रमण ध्वनी यंत्रात तुणतुणंत होता अगोदर. बिथोवन क्या चीज है कळल्यावर ते पाप मी करू धजलो नाही. पापाचं प्रक्षालन म्हणून श्री स्वामी समर्थ धून लावून ठेवलं ते आजतागायत!

तुमच्या आणि इथल्या मायबोली नामक प्रासादातल्या सर्व बंधू भगिनींच्या प्रतिसादाला मान देऊन बिथोवन आणि मोझार्ट या संगीतकारांचा धागा सुरु करतो लवकरच. ब्लेस मी!