एक स्टुपिडसी लव्हस्टोरी - भाग दुसरा.

Submitted by अजय चव्हाण on 8 June, 2020 - 05:00

भाग दुसरा - द ट्रान्सफर.

"मिस्टर कुलकर्णी कॅबिनमध्ये या" मॅडमने फर्मान सोडले.

शीट! गेलो आता कर्माने.. एक दिर्घ श्वास घेतला आणि उगाचच शर्ट व्यवस्थित करत मी चाचरतच कॅबिनच दार नाॅक केलं.

तिने इशार्यानेच आत यायला सांगितलं. मी गुपचूप मान खाली घालून आत उभा होतो.

"मिस्टर कुलकर्णीऽऽ तुमची हिंमतच कशी झाली माझा हात पकडण्याची ते ही इतक्या लोकांसमोर? लेट काय येता, नुसतचं एकटक डेस्कटाॅपकडे बघत काय बसता? जाब विचारायला गेले तर डायरेक्ट हात पकडता? डोकं बिकं ठिकाणावर आहे ना??

"सं ..स.. साॅरी मॅडम..परत असं होणार नाही" मी शक्य तितके गरीब भाव चेहर्यावर आणत म्हटलं.

"साॅरी बिरी काय नाही हा" असं म्हणत तिने हलकेच ड्राॅवरमधून एक लिफाफा काढून माझ्या हातात दिला.

आईशप्पथ! ही तर मला कामावरूनच काढतेय वाटतं. सालीनं आधीच सस्पेंड लेटर टाईप करून ठेवलं होतं असं वाटून मी गयावया करायला लागलो -

"मॅ.. मॅडम...प्लिज मला कामावरून काढू नका..तुम्ही जे जे म्हणाल ते ते मी करीन. तुमच्या पाया पडतो..प्लिज तुम्ही मला काढू नका.."

अगदीच रडकुंडीला येऊन मी बोलत होतो..

"मिस्टर कुलकर्णीऽऽऽ.. हे तुमचं सस्पेंड लेटर नाही. अनावधानाने हात पकडलात हे कळतयं मला आणि एक दोनदा लेट आलात म्हणून डायरेक्ट कामावरून काढायला इतकीही निर्दयी नाहीये मी.
तुम्हाला तर माहीतच आहे की, आपण पुण्याला नवीन ब्रांच ओपन करतोय सो ते ऑफिस सेट होईपर्यंत तुम्ही तिकडे मला असिस्ट कराल आणि म्हणूनच तुमची टेंपररी पुण्याला ट्रांन्सफर होतेय.
तुमची सॅलरी आहे तेवढीच असेल बट अॅज पर कंपनी पाॅलीसी यु विल गेट फुल अकोमेंडेशन इन पुणे अॅण्ड विल गेट एक्स्ट्रा बोनस अॅण्ड पर्क्स. ह्या लेटरमध्ये सविस्तर माहीती आहे. ती वाचा. एक काॅपी तुमच्याकडे ठेवा आणि एक मला सही करून द्या"

"पण मॅडमऽऽऽ.."

"पण बिन काही नाही आता. टू विक्स आहे तुमच्याकडे. तयारी करा.

"ओके मॅडम..अॅज यु विश" हातातल्या लिफाफ्याकडे निराश होत मी उत्तरलो

.............................................................................................................................................................................

एरवी कुणी मला पुण्याला पाठवल असत तर मी आनंदाने तयार झालो असतो. पुण्यातले रस्ते, तिथली लोक, गंमतशीर पाट्या, हवामान ह्याबद्दल खूप ऐकून होतो मी. ते सारं मला कधी ना कधी अनुभवायचं होतं. मुंबईतल्या धावपळीच्या जगण्याला मी ही कंटाळलो होतो. आय थिंक मला चेंज हवा होता पण आय गेस ही ती वेळ नव्हती. आता कुठे मला माझी ड्रीम गर्ल मिळाली होती. अजून धड ओळखही झाली नव्हती. "सिर्फ सपनों में गुल खिलाने से थोडी कुछ होता है" पण जावं तर लागणारच होतं. बाॅसच्या पुढे आणि गाढवाच्या मागे राहून कसे चालेल? कुणीतरी म्हटलचं आहे ना "आलिया भोगासी असावे सादर" होतो सादर आता काय?

...................................

इकडे नयना आपल्या कॅबिनमध्ये एका हातात पार्करचा पेन नाचवत तिच्या आयफोनवरून कुणाशीतरी बोलत होती..

"शट अप हा गौरी..तसं काही नाहीयेऽऽ यू नो..व्हाॅट आय मिन.."

नयनाला इतकं हर्षभरीत आणि फ्रेंडली बोलताना कुणी बघितले असते तर त्याला नक्कीच 440 व्होल्टचा शाॅक बसला असता.

फोनच्या पलिकडून एक खट्याळ हसू ऐकू येत होतं..

"स्टाॅप ईट गौरी! नयना काहीशा त्रासिक स्वरात म्हणाली.

"ऐ नयु..पण तु दाखवशील ना मला तो..आय मिन मलाही त्याला बघायचय गं..मला पण तर कळू दे..आमच्या मॅडमची चाॅईस
कशी आहे ती"

"तो आणि मी अफ्टर टू विक्स पुण्यातच येतोय..तेव्हा बघ की"

नयना एखादं सरप्राईज द्यावं तसं म्हणाली..

"अय्या खरचं!! आनंदाने उडया मारत गौरी जवळजव किंचाळलीच.

"चल गौरे.. खूप तयारी करायचीय आणि कामही खूप आहे. तिथे आल्यावर भेटूच आपण...बाय." हातातला पेन जागेवर ठेवत नयनाने काॅल संपवला.

......................

दोन आठवडे कसे गेले हे कळलच नाही. माझी ड्रीम गर्ल परत मला कधी दिसलीच नाही.तरीही तिच स्वप्नं पाहणं मी सोडल नव्हतं. कधीतरी ती नक्की येईल असं माझं अंतर्मन मला नेहमी सांगतं आणि ती नक्की येईल असं मला मनापासून वाटतं होतं..
शाहरूखचा ओम शांती ओममधला तो डायलाॅग कधी कधी खुप तसल्ली देऊन जातो.

"सच्चे दिल से अगर किसी को चाहो..तो ये कायानात उसे मिलाने की कोशिश करती है"

स्वतःशीच शाहरूखच्याच स्टाईलने डायलाॅग बरळत कधी झोपी गेलो हे माझं मलादेखिल समजलच नाही.
..........

कानाजवळ मोबाईलचा अलार्म वाजला तसा मी चरफडत उठलो होतो. आज मला पुण्याला जायचं होतं. ठरल्याप्रमाणे मॅडम आणि मी तसे एकत्रच तिच्या BMW ने जाणार होतो. खरंतर त्या हिटलर बरोबर जायची मला अजिबात इच्छा नव्हती पण जावं तर लागणारच होतं. सगळं आन्हिकं वैगेरे आटोपून मी तिच्या येण्याची वाट पाहत होतो..इतक्यात जे पी दत्ता प्रोड्युस र्बाॅर्डर फिल्मची मशिनगनवाली माझी रिंगटोन वाजली -

"धाक्-धाक्..धाक्.. सु..ईऽऽ..मऽऽ..ढिच्यांक्याव
धडाकधुम..धाक्..धाक्-धाक्.."

खासं हिटलरसाठीच ही रिंगटोन मी सेट केली होती..

मी फोन पिकअप केला..

"हॅलो"

"हॅलो.. हा बोला मॅडम"

"हो..हो.
सगळी तयारी झालीय..तुमचीच वाट बघतोय"

"ओके.. येतो"
.............

पावसाला नुकतीच सुरुवात झाली होती. लोणावळा घाट मस्त हिरवळीने सजला होता. ए.सीची गार हवा मनाला तजेला आणत होती तर बाहेरच नयनरम्य दृश्य खरचं खूप छान वाटत होतं. हिटलर माझ्या बाजूलाच बसली होती. कामाव्यक्तरित एक शब्द बोलली असेल तर शप्पथ! ती आपल्या लॅपटॉपवर काहीतरी खुडबुड करत बसली होती. मला अस शांत बसण जमलच नसतं
मी ड्रायव्हरला एफ एम चालु करायला सांगितले.

खुरऽऽऽऽऽ..स....र्........करत शेवटी एकादाची रेंज मिळाली.

"ऐ ..राजुऽऽऽऽऽऽ..उस दिन मैं सिग्नल पे खडी थी. अचानक मेरे सामने गाडी आया"

सुरेश मेनन 'कमला का हमला' ह्या छोट्याशा शोमध्ये कमलाचा आवाज काढत होता. त्यानंतर आर जे ची ती बडबड ऐकल्यानंतर शेवटी एकदाच गाणं सुरू झालं -

ये रास्ता है केह रहा अब मुझसे..
मिलने को है कोई कही अब तुझसे...

दिल को है क्यु ये बेताबी किससे मुलाकात होनी है..
जिसका कब से अरमाँ था..
शायद वही बात होनी है..

यु ही चला चल राही..

यु ही चला चल राही..

images (5).jpegक्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दादा, ह्या stupid लवस्टोरीत पुढे काय होईल!? याचे मी मनातल्या मनात आडाखे बांधले होते.. पण सगळे चुकीचे ठरले.. मस्त झालाय हा भाग! पुभाप्र! Happy Happy

प्रेमट्रेंगल पुढे बरमूडाट्रेंगल नको बनु दे ही सदिच्छा !
Fullllll stupidity उतरलेली आहे कथेत. लगे रहो.+१२३
पुभाप्र

धन्यवाद तायडे, उर्मिला, अज्ञातवासी, रूपाली, तुषार, आसा, पाफा, नौटंकी, नीत्सुश, महाश्वेता, अज्ञानी.

@अज्ञानी.. शेवटपर्यंत चांगलीच लिहण्याचा प्रयत्न करेन..डोन्ट वरी..