रुधिराची प्रार्थना

Submitted by नारूचेता on 8 June, 2020 - 04:00

क्षणैक अवघा रुधिर सांगे
का लुप्त साऱ्या धमन्या
अन शिरा शिरांमधे येथल्या
आटला तप्त ज्वाला रुधिर सांगे

झाली जखम कशी मनगटी
सांधल्या मी शिरा साऱ्या
अणू अणूतून पुनश्च संचरले
रोम रोम अंगी रुधिर सांगे

त्याच शिरा अन त्याच धमन्या
अबोल रिक्त झाल्या कशा
पानगळ होई जशी ऋतुकाळीं
प्राजक्त विरला रुधिर सांगे

कोण आपुले कोण परके
हा नसावा विद्रोह मनी
हीच धमनी अन हीच शिरा
रुजवात होवो अंगी रुधिर सांगे

रुधिर विनवितो कर जोडूनि
अनंत काळीच्या सख्या तुम्ही
का व्यर्थ भांडता मम् बाळासम
अर्पिले तन मन सारे रुधिर सांगे

रोम रोम माझे तनू सांगे
स्पंदन स्पंदन माझे हृदय सांगे
सांधा आपुले सौख्य बरे
करुणेने विनवी पुनश्च हा रुधिर सांगे ...

Group content visibility: 
Use group defaults