प्रलय

Submitted by Asu on 7 June, 2020 - 05:26

प्रलय

जळी तुफान, 'निसर्ग' वादळी
आकाशी फिरे टोळांची टोळी
काय चालले काहीच कळेना
भूमीवर तर उभा दुष्ट कोरोना

झाडं उखडली घरं कोसळली
छपरं उडाली नभी पत्त्यापरी
बेघर झाली कितीक माणसे
संसार उघड्यावर रस्त्यावरी

टोळी टोळांची येई अचानक
करीत शेतातली पिके फस्त
धनधान्य गेले श्रमही लुटले
शेतकरी दीन,झाला उध्वस्त

कोरोना अजून शांत होईना
रोज हजारोंचे करतो भक्षण
मानवा कुणी न उरला वाली
कुणी करावे कुणाचे रक्षण?

जळी स्थळी अन् आकाशातून
प्रलय माजला जणू चोहीकडे
शिक्षा पापाची पुरे ना आता
शरणार्थी तुज घालतो साकडे

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
(दि.05.06.2020)
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

या वर्षी पांडुरंगाला प्रत्यक्ष भेटायला वारकरी सुद्धा नाहीत. घरूनच साकडे घालावे लागणार बहुतेक. छान लिहिली आहे कविता.