हॅरी पॉटरच्या भाषेतलं पत्र!

Submitted by मार्गी on 4 June, 2020 - 09:19

सर्वांना नमस्कार!

इतकी मुलं सगळं काही बाजूला ठेवून तासन् तास हॅरी पॉटर कसे वाचू शकतात असा प्रश्न मला पडला होता. इतकं त्यामध्ये काय आहे असं‌ वाटायचं. आणि असंही वाटलं की, मुलांसोबत चांगला डायलॉग करायचा असेल तर हॅरी समजून घ्यायला पाहिजे. शिवाय जगामधलं जर सर्वाधिक वाचलं जाणारं साहित्य ते असेल, तर मग तर समजूनच घ्यायला पाहिजे असं वाटलं. त्यातून हळु हळु हॅरी जगाची ओळख झाली. आणि माझ्या हॅरी भक्त परायण बहिणींच्या मदतीने अक्षरश: अखंड हॅरी नाम सप्ताहातील हॅरी पॉटाप्रमाणे सलग आठही दिवस आठ चित्रपट बघितले (लॉकडाउनचा सदुपयोग करून). शिवाय पुस्तकही वाचायला सुरुवात केली. आणि खूप छान जग उलगडत गेलं. आणि जिच्यामुळे मी हॅरी पाठ करू शकलो तिला- हॅरी भक्त असलेल्या माझ्या पुतणीला वाढदिवसानिमित्त हॅरी भाषेमध्येच एक पत्र लिहिलं! आपल्या जवळच्या हॅरी भक्तांना कदाचित खूप रिलेट होईल (हॅरी साक्षर नसलेल्यांसाठी संधी नक्की असेल)! तेव्हा हॅरी भक्तांसाठी नाव आणि किरकोळ तपशील बदलून हे पत्र शेअर करत आहे! कदाचित हॅरी भक्त मुलांसोबत संवाद साधण्यासाठीही हे उपयोगी पडू शकेल. हॅरी‌ पॉटर इंग्रजीत वाचणारीला उद्देशून लिहिल्यामुळे बराच मजकूर इंग्रजीत आहे, त्याबद्दल क्षमस्व.

30.05.2020

Akhila!

Wish you a very happy birthday dear magician!!!

I am so so glad to write this to you. Sheer happiness! Wonderful feeling that now I can write to you. I am waiting for the day when Adu will also be able to read this like you are reading! I have written 5 letters to her, but she cannot read them yet. But now you are able to read my letter! I am really delighted! You may be knowing, for me writing is as simple as flying is for Hedwig!

अखिला, मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत, खूप काही शेअर करायचं आहे! I can see, you, around ten years ago! तू माझ्याकडे बघून हसायचीस, बाळ असताना लगेच कडेवर यायचीस! परवाच माझ्या लॅपटॉपवर तुझा एक तेजाच्या वयातला व्हिडिओ सापडला. अमेरिकेतला होता, तू एक गाणं म्हणत होतीस आणि खोलीत पळत होतीस! मी शेकोटी पेटवली- काश्मीरची शाल असं गाणं होतं! तेजापेक्षाही छोटी होतीस! आणि तुझं गलबत ग तर माझ्या डोळ्यांपुढे लाईव्ह आहे! मी फक्त गलबत ग म्हणून तुला धक्का द्यायचो आणि तू सागर सा, गलबत ग मनुष्य म पडाव प ते नीलमणी- कहाणी पर्यंत नाचत नाचत पूर्ण गाणं म्हणायचीस!

Akhila, do you know meaning of your name? अखिला म्हणजे one who is unique, unparalleled and exclusive. One who is not actually magician, but magic itself. असा तुझ्या नावाचा अर्थ आहे! आणि अखिला, हॅरी पॉटरच्या जगात तरी कोणी जादूगार नाही, असं असू शकतं. There is possibility- there are many people who are Muggles. पण ख-या जगामध्ये कोणीही muggle असूच शकत नाही. ख-या आपल्या जगामध्ये प्रत्येक जण हा जादूगारच आहे. अगदी खरं सांगतोय. आपल्या जगामध्ये मगल होणं म्हणजे जादूगार नसणं शक्यच नाहीय! आणि तुझ्या नावाचा अर्थ असा आहे की, one who cannot be separated. जी अन्य कोणी होऊच शकत नाही, ती अखिला!

अखिला, मी हॅरी पॉटरच्या जगाशी ओळख करून घेतली, त्याचे सगळे चित्रपट बघितले आणि पहिलं पुस्तकही वाचतोय! मला एका खूप सुंदर जगाची ओळख झाली! आणि हॅरीचं जग आणि आपलं जग ह्यामध्ये खूप parallels and comparisons सुद्धा मिळाले! आणि आता मला हॅरीची भाषा कळालीय, त्यामुळे मी त्या भाषेमध्येही तुझ्याशी बोलू शकतो! आता आपण अशा भाषेमध्ये बोलू शकतो, जी हॅरी न बघितलेल्या/ न वाचलेल्या कोणालाच कळणार नाही! So we have a great code language for sharing!

अखिला, हे बघताना, समजून घेताना तुझं इतकं कौतुक वाटत होतं की बस्स! मला वाटतं Harry Potter and the deathly hallows वाचूनही तुला सहज दोन वर्षं झाली असतील. म्हणजे अगदी आठ वर्षांची असतानाच तुझी ही सातही पुस्तकं वाचून झाली होती! आणि त्याच वेळी तू फास्टर फेणे, तोत्तोचान अशी पुस्तकंही वाचली होतीस! किती ग्रेट आहे हे. लहानपणी मीसुद्धा अनेक पुस्तकं अशीच वाचली होती, त्यामुळे तुलाही अशी पुस्तकं वाचताना बघून मला समाधान वाटतंय, माझे ते दिवस आठवत आहेत! मलाही एक एक पुस्तकाने पकडल्यावर ते सोडता यायचं नाही! म्हणजे Ascendio! असा स्पेल म्हंटल्यानंतर जशा गोष्टी वर फेकल्या जातात, तसं एक एक पुस्तक आपल्याला कुठे तरी घेऊन जातं! किंवा Apparition!

And your intelligence is famous in our family! When you were just 2 years old, you could recall dresses of people whom you had met. You could recall who had said what! And same is about Aju also. Aju also notes minute things, observes small things. So, it was really not a wonder that you had galloped so many books so early. A matter of great delight for all of us.

And now while writing this, I sense that you can understand so many things. That is why I wish to write you about such things. अखिला, हॅरी पॉटरचं जे जग आहे ना, ते खूप आपल्या जगासारखंच आहे. आणि मी म्हणेन की, तुला ते जग नीट कळालं आहे तर तुला आपलं, माणसांचं जगही कळायला खूप सोपं जाईल. म्हणजे मी म्हणेन की, Harry Potter universe is not just entertainment, it was much more than that. Even more than infotainment. It is actually a beautiful reflection of the human world. आणि तुला कदाचित खूप वेळेस वाटत असेल की, कुठे ती हॉगवार्टस आणि कुठे आपली शाळा! कुठे ती Digeon Alley आणि कुठे आपली गल्ली! पण मी तुला सांगेन अखिला की, आपलं युनिव्हर्ससुद्धा तितकंच छान आहे. Akhila's universe is eqully or rather more beautiful than the Harry's. कसं ते तुला सांगतो. Let me prove it.

एक तर आपल्याकडे Muggles and wizards/ witches/ half blood असा प्रकारच नाहीय. आपण सर्वच जादूगारच आहोत. The only concern is whether we know it or we don't. Either we can be aware of it or unaware of it. But we are! प्रत्येकाची जादू वेगवेगळी असते. कोणाची जादू म्युझिकमध्ये असते, कोणाची चित्रकलेमध्ये असते तर कोणाची जादू मेहनतीमध्ये असते. मला वाटतं हॉगवार्टसमध्ये हाऊसेस चारच असतात. बरोबर? ग्रिफिंडर, स्लीथेरिन आणि इतर दोन कोणते तरी. बरोबर ना? पण आपल्या म्हणजे अखिलाच्या जगामध्ये तर अशी खूप म्हणजे खूपच अक्षरश: शेकडो हाऊसेस आहेत जिथे वेगवेगळी मॅजिक घडते. प्रत्येकाचे स्पेल्स वेगळे असतात. आणि इथे फक्त क्विडिचच खेळला जात नाही! एकदा नाही का तुला बोललो होतो पाहा, तू स्वत: किमान दहा ते बारा स्पोर्टस खेळू शकतेस! आणि हॉगवार्टसमध्ये तर विद्यार्थ्यांना घरांपासून दूर राहावं लागतं! पण आपल्या म्हणजे in the Akhila universe, मुलं घरी आई- बाबांसोबत राहूनही हॉगवार्टससारख्या शाळेत जाऊ शकतात! आपल्याकडेही हॅग्रिड, डंबलडोर अशा लेव्हलचे लोक असतात! मी स्वत: भेटलोय अशा लोकांना! खरंच अखिला!

आणि अखिला, हॅरी पॉटरला जसे अनेक दु:ख होते, तसे आपल्याकडेही असतातच. त्यालाही त्रास देणारा ड्रॅको असतो. आपल्यालाही कोणी तरी त्रास देणारं असतं. त्यात जे जे दाखवलंय, ते ते in one or other form, आपल्याकडेही आहेच. काही मुलं असतातच ना ज्यांचे आई- वडील नसतात. किंवा जशी हॅरीला लहानपणी वाईट वागणूक दिली जाते, तशा नकोशा गोष्टी आपल्याकडेही असतात. पण डंबलडोअर म्हणतात पाहा कुठे तरी की, हॅरीने खूप विनम्र राहावं, ह्यासाठी ते गरजेचं होतं. तसंच आपल्याही बाबतीत असतं की, खूपशा चांगल्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. पण त्या गरजेच्या असतात. आपल्याला मेहनत आवडत नाही, खेळ नको वाटतो, पण तोही उपयोगी असतो. किंवा खूप शत्रू हॅरीला व त्या लोकांना त्रास देतात. खूप शत्रू त्यांच्यावर हल्ले करतात, त्यांना पळावं लागतं. आणि आपल्याकडे जसा ज्याचं नाव घेता येऊ शकत नाही- The one whose name cannot be uttered- त्याच्यासारखे लोक असतात, त्याप्रमाणेच हॅरीला मदत करणारा हॅग्रिड असतोच. असे लोक आपल्याला सापडतातच जे आपली मॅजिकल पॉवर activate करायला आपली मदत करतात. And Akhila, it is more of a representation. Vol, sorry, that whose name cannot be said- is rather a symbol of evil nature. Do not regard him as a person. But it is human nature. Everyone represents a nature. Hagrid- Dumbledore these are not persons, but qualities. Snape is not just a person. He represents such factors which repell us, we get afraid of, but they actually support for our growth. Snape is like arduous hard work. We get scared, we hate while doing it, but it is actually beneficial.

Akhila, I was wondering about some spells and names. Like Vol- sorry that name which cannot be said- is actually a French phrase which means 'will do die.' And it should be, of course! Evil is nothing but a will to die. दुष्टपणा म्हणजेच कु-हाडीवर स्वत:च पाय मारून घेण्याची वृत्ती! काही नावं खूप कॉमन आहेत. नगिनी म्हणजे तर आपल्याकडचाच शब्द आहे- नागीण. हिंदीत नागीन म्हणतात. आणि हा स्पेल पाहा- Anapneo! हा स्पेल कोणी आणि कुठे वापरला आहे, सांगता येईल तुला? चल सांग. हे तुला एक पहिलं कोडं! आठवून सांग. ह्या स्पेलचा अर्थ होतो एखादी गोष्ट अडकली असेल, तर ती दूर ढकलायची! बरोबर? तर हा शब्द मला ओळखीचा वाटला आणि मी हॅरीच्या encycleopedia मध्ये चेक केलं! तेव्हा कळालं की, हा शब्द जे के रोलिंग ताईंनी लॅटीन भाषेतून घेतलाय. Anapneo हे लॅटीन भाषेत एक verb आहे व त्याचा अर्थ होतो to breathe in! आता तुला वाटत असेल मी हाच शब्द का सांगतोय! तर हा शब्द माझ्या ओळखीचा आहे, कारण विपश्यना नावाचा मेडीटेशनचा एक प्रकार आहे, त्यामध्ये आतमध्ये येणा-या व बाहेर जाणा-या श्वासावर लक्ष द्यायचं असतं! Giving attention to breath coming in and out! किती साम्य आहे पाहा! असाच आणखीन एक शब्द- Digeon Alley! Alley ला मराठीत गल्ली किंवा आळी म्हणतात. पाहा किती साम्य आहे.

अखिला, त्या अर्थाने बघितलं ना तर भाषा काय, देश काय, culture काय, ह्यामध्ये जे फरक आहेत, ते खूप खूप superficial आहेत. Just formal आहेत. Countries are just imaginary bifurcation. We are one as such. मला सांग, तुला भूगोल चांगला माहिती आहे. भारत कुठे आहे, अटलांटा कुठे आहे, हे नीट माहित आहे. भारत व पाकिस्तानमध्ये बॉर्डर असते. तर ही बॉर्डर म्हणजे काय खरीच कुठली भिंत- कुंपण बिंपण असं अजिबात नाहीय! It is just a formality. Just a perception. पण भारत आणि पाकिस्तानची भाषा खूप म्हणजे खूपच सारखी आहे! तुला थोडं हिंदी येतं ना! आज कल क्या कर रही हो, सब लोग कैसे हैं? इतकं हिंदी‌ येतं ना? अगदी हेच पाकिस्तानातही बोललं जातं. पाकिस्तान आपल्याला शत्रू वाटतो, कारण तोच मित्रही आहे. जो मित्रही नाही, तो शत्रू तरी कसा वाटेल? आणि at a micro level, friends and foe are two sides of the same coin! Everything is so minutely connected. आणि मी म्हणेन की, काही भाषा जरी script, nature, style म्हणून अगदी‌ वेगळ्या असल्या, तरी एक माणूस म्हणून प्रत्येकाची जी internal भाषा असते, built in language असते, ती एकच असते. तुला आठवत असेल पाहा, मी एकदा तुला एक लेख पाठवला होता. एका सायकल मित्राच्या कार्यक्रमाला मी गेलो होतो. त्याने त्याचे अनेक अनुभव सांगितले होते. तो खूप देशांमध्ये सायकलवर फिरला, खूप वेगवेगळे देश, जंगलात राहणारे ट्रायबल लोक अशा लोकांमध्ये गेला. पण कुठेच त्याला भाषेची काहीच अडचण आली नाही. Not that he tried to learn those languages. No. But he was speaking through his heart, not through his intellect. And heart needs no language. When we look at a baby, it smiles! No language needed. तसं.

आणि हॅरीसोबत जे घडतं, त्याची सगळी स्टोरी, त्याची सगळी जर्नी, ते खूप खूप रिअल आहे. एखाद्यामध्ये जर संगीतातली जादू असेल, तर त्याला बरोबर त्या जादूवरचे शिक्षक मिळतात. त्या प्रकारच्या हॉगवार्टसमध्ये किंवा हाऊसमध्ये नेणारा त्या प्रकारचा हॅग्रिड मिळतो. This is universal law. You can find so many examples. From George Washington Carver to Anandibai Joshi. From Shivaji Maharaj to Babita Phogat (गीत्ता- बबित्ता). त्यांच्याकडे जी जी जादू होती, ती साकार होईल, असे लोक त्यांना भेटत गेले. ते भेटतातच. कारण प्रत्येकामध्ये जी मॅजिक असते, ती मॅजिकच एक्स्प्रेस होऊ बघत असते. That magic itself pushes you. That tries to manifest. आणि गंमत म्हणजे अनेकदा आपल्यालाच आपली मॅजिक कळत नसते, आपल्यालाही माहित नसते. जसं हॅरीला हॉगवार्टसमध्ये आल्यावर पहिल्या दिवशी काहीच कळत नव्हतं. आणि अखिला, म्हणून मी म्हणेन की, तुला हॅरी पॉटर वर्ल्ड जितकं आवडतं, तितकंच रिअल वर्ल्डही आवडू शकतं, तू रिअल वर्ल्डमधली हरमायनी बनू शकतेस. हरमायनी कशाला, रिअल वर्ल्डमधली अखिला बनू शकतेस, कारण Akhila means you are unparalleled. Even better than Hermionee. मग तुझी शाळासुद्धा तुझी हॉगवार्टस असेल. मग तू शाळेत रस्त्यावरून किंवा रिक्षातून जाणार नाहीस. तर तू platform 9 3/4 वरूनच जाशील. And then although you are walking, you are not walking. You are gliding. And no broomstick is also needed! इतकी मोठी जादू ही होते!

Therefore, Akhila, I wish you this- that what you have seen in the Harry Potter universe, do not lose in your own universe. That vision is very important. The vision of a magician, the eyes to see it. Do not lose it. There will be troubles. There will be ups and downs. But for every Drako, there is Ron, for every foe, there is a friend. If you have the vision and the right perspective, for you every school is the Hogwarts, everyone is a wizard or a witch.

Akhila, you have read this quote- this incident where young Harry stands before a mirror and Dumbledore tells him something. That incident touched my mind so much. त्यात डंबलडोर त्याला सांगतो ना, की, असा माणूस खूप लकी असेल ज्याचं रिफ्लेक्शन ह्या मिररमध्ये तो आहे तसंच येईल. He will be lucky, who has no ego or no unwarranted aspirations. Who is content is lucky. असा त्याचा अर्थ तुला हळु हळु कळेल. पण हे वाक्य लक्षात ठेवशील. आणि ते दुसरं वाक्यही खूप ग्रेट आहे- मला नेमकं वाक्य आठवत नाही, पण काहीसं असं आहे पाहा- He who does not wish it, gets it. म्हणजे एखादी मौल्यवान गोष्ट त्याला मिळते, जो त्या गोष्टीच्या मागे लागलेला नसतो. In other words and in another way, it can be said like this- Success comes to those who do not run after it. बाकी इतरही वाक्य छान आहेत- To the well-organized mind, death is but the next great adventure. Here, Dumbledore does not mean just death. He means hurdles, fears, obstacles.

And this also- It is our choices ... that show what we truly are, far more than our abilities. जसं डेथली हॅलोजमध्ये हॅरीने ड्रॅकोला वाचवलं होतं पाहा. असे खूपच पॅरलल्स आहेत अखिला! किंवा हे पाहा- Books and cleverness! There are more important things- friendship and bravery! It all boils down to our vision, to our eyes. What we can see is what we get. If we regard people as bad, they become bad for us. If we regard them as good, they become good. आणि ह्यामध्ये ज्या जादुच्या गोष्टी दिल्या आहेत ना, त्या खूपशा ख-या आहेत. Means not verbally, but by principally. माझ्या वाचनामध्ये आलेली एक अशी छोटी गोष्ट सांगतो पाहा.

तू गौतम बुद्धांचं नाव ऐकलं आहेस ना? स्वामी विवेकानंद कसे होते, तसे तेही एक थोर व्यक्ती होते. त्यांच्या आयुष्यातली एक घटना आहे. त्यांचा एक शत्रू होता. त्याचं नाव घेतलं तर चालतं- त्याचं नाव देवदत्त होतं. त्याला वाटायचं सगळे लोक बुद्धांनाच मानतात, मला कोणीच मानत नाही. म्हणून तो चिडला. एकदा बुद्ध एका ठिकाणी बसले असताना त्याने डोंगरावरून एक मोठा दगड त्यांच्यावर सोडून दिला. मोठा खडक होता तो. गडगडत खाली आला. आणि अगदी बुद्धांना त्याचा फटका बसणार, तेवढ्यात तो बाजूला झाला. गोष्ट सांगते की, तो दगड जरी असला, तरी अगदी निर्जीव नव्हता. Even rock also possesses some life, some magic. त्याला कळालं की, इथे तर बुद्ध बसले आहेत. तो बाजूला सरकून गेला. मग त्या देवदत्तने एका बिथरलेल्या हत्तीला बुद्धांच्या दिशेने सोडलं. बिथरलेला हत्ती बुद्धांवर चालून आला. लोकांना वाटलं तो त्यांना आता चिरडून टाकणार. पण वेगळंच झालं. त्याने बुद्धांना बघितलं. तो वेडा हत्ती होता, पण देवदत्त रागाने जितका वेडा झाला होता, तितका वेडा नव्हता. त्याने बुद्धांना ओळखलं. बुद्धांमध्ये जी मॅजिक होती, ती त्याच्यातल्या मॅजिकला कळाली. आणि तो तिथेच थांबला आणि त्याने बुद्धांपुढे सोंड वाकवून नमस्कार केला.

Akhila, there are stories like that. They have certain point in them. Certain meaning. There are experiments. We feel that animals and trees do not know anything. But they are very sensitive. Sometimes humans are corrupt, but animals and trees are so sensitive and pure. If someone is coming near a tree to cut its branches, the tree gets afraid. It fears. It feels danger. There are studies about it. The point I want to share is that there are so many minute connections in our actual universe. Like Snape helped Harry when he was finding something in that river. Snape sent his deer to help Harry and then Ron also came there. तो प्रसंग बघ, आठवला का. अशा खूप गोष्टी आहेत!

I think it is too much. I got tired writing this! But seeing your capacity to gallop books, I think this letter is not a lengthy one!

आणि हो, अजून एक गोष्ट. आता तू १० वर्षांची झाली आहेस! आणि आता माझ्या दृष्टीने इतकी मोठी नक्कीच आहेस की, मला निरंजन म्हणू शकतेस. आणि तुला मला निरंजनच म्हणायचं होतं! अदूचं ऐकून एकदा तू म्हणालीही होतीस. So, why not! Also, now we are friends in Harry's world. And I regard you equal. You may be a kid, but still you are equal to me.

Wish you very happy year once again! And I wish that your new school be your Hogwarts and you preserve your vision, your capacity to see things!

- Niranjan

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

एकदा हॅरीचे चित्रपट एकाच दिवशी सलग दाखवले गेले होते.(सकाळी ९ वाजल्या पासून ते रात्री ९ पर्यन्त.) मी आणि नवरा ते बघायला बसलो. तीन चित्रपट पाहून झाल्यवर मला काही पुढे बघवेना. नवरा मात्र डटून बसला होता. हॅरी आवडत नाही असे नाही. पण एकाच दिवशी ईतकी जादू माझे डोके चक्रावून गेली आणि त्या नंतर बरेच दिवस हॅरी डोक्यातून उतरेना. कुठेही त्याचे नाव नको वाटायला लागले. त्याच्या चित्रपट म्हणले की काटा येउ लागला. त्याला पुन्हा पुर्ववत करायला बरेच दिवस गेले.
अत्ताही हा धागा उघडावा की नाही हा विचार चालू होता. म्हणले जाऊन तर बघावे. पत्र खुप छान लिहिले आहे. वाचताना अत्ता कुठेही हॅरी डोक्यात गेला नाही. नक्किच जे हॅरी भक्त आहेत त्यांना खुप आवडेल हे पत्र.

मार्गी जी मी हॅरी भक्त आहे. मला खूप आवडतं हॅरी पॉटर. आणि आता त्या आवडीच्या लिस्ट मध्ये तुमचं पत्र ही आलंय. किती सुंदर लिहिलंय ! मला खूप आवडलं. जर मी हे माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर केलं तर चालेल ?