फलक बघितले मी अनेक
पण एक बघितला,
वृध्दाश्रम लिहिले होते त्यावर एक!
प्रवेशद्वारातून आतमध्ये केला प्रवेश;
अबोल,निरागस,पीडित- दुःखी
चेहरे दिसले त्यात हरेक!!
श्वास मुठीत धरून
प्रत्येकाची केली विचारणा!
कहाणी ऐकून त्या थरथरत्या होटांची
मलापण रडू आवरेना!!
म्हणे हे म्हातारे बेजोड झाले,
अडगळीचे समान झाले!
ते शोभत नाही आमच्या
सुबक महालाला;
देऊन का नाही टाकावे,
त्यांना भंगारखाण्याला!!
कायरे व्यथा ही मानवाची,
नात्यात ही किंमत पैश्याची!
ज्या मातापित्याने पोसले आयुष्यभर,
खेळविले अंगाखांद्यावर,
त्यांचे ओझे उचलण्यास
हा खांदा झाला निकामी!
हीच कारे मानवा
तुझी जीवनातली पुण्याई!!
आठव त्या श्रावण बाळाला,
कावड घेऊनी खांद्यावरी!
अंध मातापित्यास
सारा संसार फिरवूनी आणी!!
कथा ही रक्त आणि अश्रूंची फार जुनी,
घाव घातले शरीरावरती
रक्त निघती भराभरा!
पण डोळ्यांमधून आसवे पाडण्यासाठी
घाव घातले अंतकरणा!!
मला माझे कळेनासे झाले,
जीवनाचे सार लगेच उमगले!
उपकार भूतकाळातले
भविष्यात नसतं;
आजच अस्तित्व उद्याचं नसतं!
मग जगावं तरी कुणासाठी
कारण कुणीच कुणाचं नसतं!!