आई

Submitted by सचिन चंद्रकांत ... on 26 May, 2020 - 16:54

.... आई ....

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

तू आहेस मातृत्वाचा झरा
तू आहेस मायेचा ओलावा
तू आहेस निखळत्या प्रेमाचा वारा

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

तू आहेस ममतेचा कळस
तू आहेस अंगणातील तुळस
तू आहेस घरातील मांगल्य

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

तू आहेस आपल्या पाखरांची छाया
तू आहेस माझ्या हक्काची जागा
तू आहेस शितलतेची माया

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

तू आहेस माझ्या देव्हाऱ्यातील मूर्ती
तुझी आहेस गं ईश्वरीय कीर्ती
तुझी किती गं वर्णू मी महती

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

तुझी ही अफाट संपदा
लिहण्या लेखणी ही पुढे चाले
पण त्याकरिता शब्द साठा माझा अपुरा पडे

आई... कशी लिहावी मी शब्दात तुला

✒️सचिन चं लावणे...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users