शाही मटण (कांदा, लसूण तेल विरहीत) - एकदम सोप्पी कृती

Submitted by विक्रमसिंह on 22 May, 2020 - 07:49
shahi mutton
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३ तास
लागणारे जिन्नस: 

१ किलो मटण
आल
दही ४ मोठे चमचे (R1)
काजू ८
बदाम ४
मीठ
केशर
दालचिनी
मिरी
तमालपत्र
वेलदोडे सोललेले.
दोन चमचे क्रीम
लवंग (R1)
मिरची (पाहिजे असल्यास) फ्लेवर साठी (R1)

क्रमवार पाककृती: 

१. मटण व्यवस्थित धुतल्यानंतर दही व मीठ लाउन १ तास मॅरिनेट करा.
२. काजू, बदाम अर्धा तास पाण्यात भिजवून नंतर त्याची पेस्ट करा

मॅरिनेट केलेले मटण एका कढईत घेऊन त्यात काजू बदामाची पेस्ट मिसळा. बाकी वर दिलेले पदार्थ मिसळून मंद गॅसवर झाकण लावून अंदाजे दोन तास शिजवत ठेवा. खाली लागू नये म्हणून मधून मधून हलवा.

अत्यंत मुलायम , सुवासिक मटण तयार.

चिकनही असेच करता येते. शिजवायला कमी वेळ लागतो इतकेच.

अधिक टिपा: 

ज्या मंडळींना नेहमी स्वयंपाक करण्याची सवय नाही त्यांनी मिठाच्या प्रमाणासाठी व कढईला खाली लागू नये म्हणून तज्ञ मंडळींची मदत घ्यावी. मीठ जास्ती होणे हा एकच धोका.

माहितीचा स्रोत: 
ट्रॅव्हल अँड लिविंग चॅनेल
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी हे आधिही ३- ४ दा केले आहे. सर्वांना खूप आवडले.
आज परत करणार आहे. फोटो टाकीन.

मुख्य फायदा. : ही एकदम वेगळी चव असलेली कृती असल्याने नेहमीच्या तज्ञ मंडळींशी तूलना होत नाही. शिवाय चवही अप्रतीम. मूळ मटणाची चव . केशराचा सुवास. एकदा करूनच बघा.

नेहमी स्वयपाकाची सवय नसणार्‍या मंडळींसाठी अतीउत्तम. काही चुकायचा प्रश्नच येत नाही. Happy

फोडणी घालायचीच नाही Uhoh फार कोरडं नाही लागणार का. केशर नुसतं टाकायचं? फोटो असता तर अंदाज आला असता.

मलाही तेच वाटले तेल तूप नाही का पाककृती मध्ये....
मी तर शाकाहारी आहे. नवरा करतो त्याला देते. सोपी वाटते आहे मात्र Happy
धन्यवाद

आताच करून झाल.
१ किलो मटणाला फक्त २ चमचे दही पुरते?>> नाही पुरत. तुमच बरोबर आहे. दही ४ चमचे. पण थोडे मोठे. आज माझा अंदाज चुकला होता, म्हणजे मी विसरलो होतो
त्यामुळे आज मी करताना खाली लागायला लागल. पण हळू हळू प्रत्येक वेळेस थोड पाणि टाकल. मग ओके. चव बेस्ट. सुवास दरवळणारा.
मटणाचे स्वतःचे तेल (चरबी) पुरते. मी आज मिरच्याही चवीला टाकल्या. तुकडे करून. तीन छोट्या.
फोटो टाकतोय. Happy

रंग फक्त केशरामुळे आलाय. Happy

फोटो नीट टाकता आला नाही. सॉरी. टेक्नॉलॉजीकली डिफरंटली एनेबल्ड. Happy

छान दिसतंय पण भात किंवा पोळीला लावून खाण्यासारखं नाही. चकणा म्हणून खाऊ शकतो Wink तुम्ही कसे खाता.

चंपा तुमच बरोबर आहे. हे वन डिश मिल आहे.
या पदार्थाचा आनंद घेण्यासाठी इतर तीव्र चवी, स्वाद (आमटी, भाजी, लोणची, चटण्या) पानात नसले पाहिजेत. एकतर स्टार्टर म्हणून किंवा सॅलड, सूप, चीज सँडविच बरोबर मजा येते. अगदीच कार्ब पाहिजे असतील तर दही भात. Happy
आणि अर्थातच चकणा म्हणून.

रेसिपी सोपी वाटते. पण त्यापेक्षाही तुमच्या 'तज्ञ मंडळी' हा उल्लेख वाचून गंमत वाटते. मी हा शब्दप्रयोग घरी वापरायला सुरुवात केली आहे.