रूपक

Submitted by _दयानंद_ on 20 May, 2020 - 11:43

मन हे निर्मळ | जैसे चंदन पिवळं |
उगाळता वरवंटी | ठाई सुगंध सुगंध |

तन हे अत्तर । जैसे कुपीत जपले |
उघडता उनमळे । काहो क्षणात सगळे |

जन येथे सारे । जणू मतलई वारे |
सोभोवती सांगड | फक्त सुखांत |

धन येथे सारे । का त्या लोभियांसी प्यारे |
निर्धन येथे राही । सदा समाधानी |

सौंसार हा सारा । दोन जीवांचा मिलाप |
सुख दुःख दिवेमाळ । संगे पेटवावी |

माय बाप यांचे प्रेम । जैसे समुद्र अनंत |
कितकाही तो सिंचता । राही तितूकाच |

आजी आजोबांची माया । जैसी वटवृक्ष गर्द छाया |
‎अंगी खेळा बागडाया । होती पारंब्याही |

दैव येथे काहो वसे । फक्त दगड धोंड्यात |
नाही कुणी का शोधला । त्यासी मनुष्य प्राण्यांत |

‎नीती तत्वे येथे का हो । फक्त लेखन पुस्तकी |
‎वाचूनिय एकदाची । मग विसरावी |

धर्म कर्म बैलजोड । आता भुलत चालली |
धर्म हाची आता कर्म । कैसे स्वीकारावे |

_दयानंद कांबळे_

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults