पडघमेट्स
१९८४ च्या डिसेंबर महिन्यात माझा थोरला भाऊ मोहन गोखले मला फर्ग्युसन महाविद्यालयात घेऊन गेला. तिथल्या हॉलमध्ये थिएटर अकॅडमीच्या नवीन नाटकाच्या तालमी चालू होत्या. आदरणीय अरुण साधूंनी लिहिलेल्या "पडघम"नाटकाचं दिग्दर्शन डॉक्टर जब्बार पटेल करत होते.तिथलं सगळं वातावरण मी तोपर्यंत पाहिलेल्या आयुष्यापेक्षा खूप वेगळं होतं. मोहनचे जुने मित्र ज्यांनी मला अगदी लहानपणापासून पाहिलेलं असे आणि सर परशुरामभाऊमधले सोलापूरकारांचा राहुल, सुषमा साने, गौरी पाळंदे आणि माधव अभ्यंकर सोडून कोणीच ओळखीचं नव्हतं,बाकीचे सगळे संपूर्णपणे नवीन. माझ्याकडे उत्सुकतेनं आणि मायेनं बघणाऱ्या आणि बिलकुल ढुंकून न बघणाऱ्या प्राण्यांच्या कळपात मी डेरेदाखल झाले.
माझ्याकडे गणपती उत्सवात केलेली आणि शाळेतल्या नाटकात केलेली कामं ,वक्तृत्व स्पर्धा आणि एक दोन बसवलेली नाटकं आणि पुरुषोत्तमला केलेलं घोंटुल नावाचं नाटक सोडून काही गाठी नव्हतं.मोहनची बहीण या अर्हतेवर नाटकात काम मिळावं असं मला आणि मोहनलाही अर्थातच वाटत नव्हतं ,पण प्रयोगाच्या थोडं आधी दुसऱ्या नायिकेनी काम सोडलं आणि थोडक्या काळात ती रिकामी जागा मी भरली,
बरेच जण माझ्यासारखेच, उत्साही पण अननुभवी आणि काही जण सॉलिड अनुभवी,उत्साही आणि महत्वाकांक्षी असं गंमतशीर मिश्रण असलेले होते.
तर अशा सगळ्या लोकांना माझ्या मित्रानं म्हणजे पव्या देशपांडेनी दिलेलं नाव म्हणजे Padhghamates" पडघमेट्स
पडघम हे एक अप्रतिम राजकीय भाष्य होतं .विद्यार्थी चळवळीवर आधारलेलं
विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायामुळे गोंधळून गेलेलं कॉलेज जीवन, त्यातले मित्र आणि मैत्रिणी, त्यात नेतृत्व गुण असणारा एक विद्यार्थी,
प्रस्थापित अंदाधुंद व्यवस्थेचा विरोध करणारा ,त्याच्या कर्तृत्वावर फिदा होऊन खूप सारे विद्यार्थी त्याच्याकडे ओढले जातात, तो त्यांना खूप चांगल्या जगाची स्वप्नं दाखवतो आणि तेही लोकशाहीच्या चांगल्या न्याय्य मार्गानी , मग त्याच्यातली चमक ओळखून सगळेच जण त्याला आपल्याकडे ओढू पाहतात.उजवी आणि.डावी विचारसरणी तसंच राजकीय पक्ष सगळेच.खूप प्रेम आणि पाठिंबा मिळूनही कालांतराने तोही ह्याच भ्रष्ट व्यवस्थेचा भाग होऊन जातो , ती व्यवस्था त्याला आपल्यात सामावून घेते किंबहुना गिळंकृत करते, तो चपखलपणे त्यात सामावतो, प्रश्न तसेच राहतात, तीच तगमग ,तीच उद्विग्नता मग परत आणखी एक जण उठतो..त्याच्याही मागे काही मुलं जातात ,थोडक्यात हे चक्र अव्याहत चालू राहणार आहे हे प्रतीत करणारं हे नाटक.
हे एक रंगमंचावर केलेलं पथनाट्य होतं ,संपूर्ण नाटक तीन तासांपेक्षा जास्त काळाचं होतं. अरुण साधूंनी त्यांच्या भन्नाट शैलीत लिहलेली दीर्घ संगीतिका होती.नाटकात एकापेक्षा एक सुंदर गाणी होती .सर्व गाणी ट्रॅकवर रेकॉर्ड केलेल्या संगीतावर नाटकातल्या सर्व पात्रांनी म्हणायची होती कोणतही पार्श्वगायन नव्हतं, .सगळ्यांना आपली गाणी म्हणायची होती वैयक्तिक आणि कोरसही. .चार लीड गायक आणि गायिका होत्या.दिवंगत आनंद मोडकांनी अप्रतिम केवळ, अप्रतिम संगीत केलं होतं.स्पूलवर रेकॉर्ड केलेलं संगीत हा एक अनोखा प्रयोग डॉक्टरांनी केला होत आणि नाटकाचं सगळ्यात मोठं बलस्थान होतं ते म्हणजे सळसळती ऊर्जा असणारी कलाकार मंडळी.ह्या सगळ्याचा एकत्र परिणाम फार धमाल होता,एकही प्रयोग मरगळलेला झाला नाही रामभाऊ रानडे असू देत किंवा काक्या ,सगळे सतत तरतरीत आणि उत्साहात.एका रंगमंचावर जोशपूर्ण अभिव्यक्ती सादर करण्याचं आणि वातावरण भारून टाकण्याचं गारुड डॉक्टरांनाचं येतं फक्त ,हे घाशीराम आणि तीन पैशाचा तमाशा मधून पाहिलं होतं आता अनुभवलं. त्यावेळी धगधगता असणारा विद्यार्थी चळवळींचा विषय इतक्या परिणामकारकरीत्या दाखवायचं धाडस त्यांनी केलं.
हा विषय आजही तितकाच तवाना नाहीये का!दुर्दैवानं याचं उत्तर हो आहे आणि म्हणूनच आज जरी हे नाटक परत उभं राहिलं तर valid ठरेल याची मला खात्री आहे .
तर असं हे थिएटर अकॅडमीच्या path breaking नाटकांच्या यादीतील आणखी एक नाटक.सात आठ नऊ जानेवारी एकोणीसशे पंच्याऐंशीला शुभारंभाचे तीन प्रयोग over full झाले आणि फक्त दीड महिना आधी तालमींना जायला लागलेल्या माझ्या आयुष्यात पडघममुळे एक सुंदर वळण आलं आणि सगळे पडघमेट्स माझ्या आयुष्याचा महत्वाचा हिस्सा बनले.साधारणतः नाट्यकंडू लोकांची एक निराळी पध्दत असते ,वागायबोलायची, तशीच इथेही होती,त्याचा अंदाज मला तालमींमधे आला होताच पण प्रत्यक्ष काम करताना थिएटर अकादमीच्या , ज्याला T.A असं फार वेगळ्या कौतुकानी म्हणलं जातं त्या अर्क मंडळींचा आपण हिस्सा झालो हे कळलं, नाटकात काम करणं हा एक सर्वांगीण अमृतानुभव असतो हे मला लवकरच समजलं .आयुष्यात तुम्ही कोण आहात (खरं सांगायचं तर तुमची पातळी काय आहे )हे समजण्यासाठी आणि गद्य पद्य प्रकाश नेपथ्य वेश रंग संगीत नृत्य ह्या सगळ्या पायघड्यांवरून तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवता तेंव्हा समोर रसिक प्रेक्षक तुम्हाला पारखत असतो पण तो अनुभव शब्दांपलीकडला असतो.ह्या सगळ्या पडघमेट्सनी मला एका वेगळ्या वाटेवरून आयुष्य दाखवलं आणि मैत्र आणि आठवणी बनून ते माझ्याबरोबर प्रवास करताहेत, ह्या सगळ्यांचे मजेशीर किस्से आहेतच,पण माझ्या मनात असणाऱ्या पडघमच्या प्रयोगांच्या धमाल आठवणींना,त्यानिमित्तानं भेटलेल्या अचाट आणि अफाट मंडळींना मनापासून सलाम आणि माझ्या पडघमेट्सबद्दल पुढे...
पडघमेट्स
Submitted by ज्येष्ठागौरी on 19 May, 2020 - 07:56
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आवडले लिखाण
आवडले लिखाण
त्या काळातले तुमचे नाट्यविषयक अनुभव वाचायला आवडतील
अवांतर - 'ताजा' शब्दाला सोडून वापरलेला तवाना पहिल्यांदाच बघितला.
धन्यवाद
धन्यवाद
तुमचे सर्व लिखाण आवडते. साधं,
तुमचे सर्व लिखाण आवडते. साधं, सरळ तरीही नेमके वाटते.
!
लिहीत रहा.
धन्यवाद
आवडले लिखाण
आवडले लिखाण
त्या काळातले तुमचे नाट्यविषयक अनुभव वाचायला आवडतील
अवांतर - 'ताजा' शब्दाला सोडून वापरलेला तवाना पहिल्यांदाच बघितला.>>>>> + १
मी ती ओळ दोनदा वाचली
नाट्यकंडु, अर्क मंडळी
नाट्यकंडु, अर्क मंडळी
पुढच्या गमतीजमती वाचण्यास उत्सुक आहे.
वाह! मस्त लिहीता तुम्ही.
वाह! मस्त लिहीता तुम्ही. तुमच्या आठवणी आणि अनुभव वाचायला नक्कीच आवडेल.
छान लिहिलंय
छान लिहिलंय
अवांतर - 'ताजा' शब्दाला सोडून
अवांतर - 'ताजा' शब्दाला सोडून वापरलेला तवाना पहिल्यांदाच बघितला.>>>>> + १
मी ती ओळ दोनदा वाचली Happy>>>>>मी पण
छान लिहीता तुम्ही