मजुरांचा तांडा

Submitted by Asu on 16 May, 2020 - 07:23

मजुरांचा तांडा

उदार होऊन आयुष्यवर
तांडा मजुरांचा रस्त्यावर
पोहोचे कधी अन् कसा
माहित नाही वस्त्यांवर

पोट भुकेले, नाही पाणी
कुटुंब निघाली अनवाणी
प्रखर उन्हे पाय भाजती
कोरोना-भुते मनी नाचती

किडामुंगीसम कधी मरती
देती जन्म कधी रस्त्याने
जन्म-मृत्यूचे तांडव बघती
जीवन जगती ही सस्त्याने

अंतिम यात्रा या मजुरांची
भाग्यवान तर घरला वापस
ना तर लढता मिळेल स्वर्ग
मरता रस्त्यावर हे बेवारस

-प्रा.अरूण सु.पाटील (असु)
© सर्व हक्क स्वाधीन
https://www.facebook.com/AsuChyaKavita

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आज परत एकदा ही कविता वाचली. बातम्यांमध्ये एका बाजूला करोनाबळींची मढी खचाखच स्म्शानात ओतलेली दिसत आहेत, दुसरीकडे लोकडाऊन म्हणा किंवा एकूणच बिघडलेल्या अर्थचक्राने उपाशीपोटी रस्त्यावर जागोजागी बसलेले मजुर दिसत आहेत. मागच्यावेळपेक्षा भयानक चित्र आहे सध्या Sad
नारायण सुर्वेंची आठवण झाली -
दोन ‌दिवस वाट पाहण्यात गेले,दोन दिवस दुःखात गेले
हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे
शेकडो वेळा चंद्र आला,तारे फुलले,रात्र धुंद झाली
भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली