प्रकाशज्योती

Submitted by मंगलाताई on 15 May, 2020 - 11:56

प्रकाशज्योती मम अंतरातील सदैव उजळत राहू दे,
काळोखाच्या उजळून वाटा प्रकाश मज पाहू दे
मानवतेच्या सेवेसाठी जीवन हे वाहुया,
चला मुलांनो संकटसमयी आपण एक होऊ या .

विनाशकारी विचारांचे अंकुर जाळून टाकू दे,
अद्वैताचा भाव ईश्वरा अंतरी माझ्या वाहू दे,
सज्जनतेच्या सर्व शक्तिंनो चला एक होऊया,
चला मुलांनो संकटसमयी आपण एक होऊया .

देश माझा मी देशाचा भाव अंतरी राहू दे,
जगतामध्ये शांती सदोदित नित्य नवी वाहू दे,
हे ईश्वरा विश्व अबाधित सुंदर हे राहू दे,
मानवतेचा उच्च कळस माझ्या देशाला गाठू दे .

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults