कृपया शीर्षक सुचवा

Submitted by मंगलाताई on 15 May, 2020 - 11:55

इमारतीच्या घनदाट जंगलातून
मेंढर कोंबलीत दाटीवाटीने,
आता हळूहळू पडतील बाहेर.
मेंढर आता बदललेली असतील,
स्वाभिमानशून्य, लबाड ,लोभी
एक नवीन च जमात तयार होईल .
एक मेंढरु गेलं की अनेक धावतील ,
नवनवे शोध लागतील आता .
ओरबडण्याच्या पद्धती जुन्याच पण शक्कल नवी.
शोषणाच्या जाती जुन्या पण प्रयोग नवे.
दोघेही खुश लुबाडणारा न् लुबाडून घेणारा.
एकदा मान खाली घालून चालायचे ठरले
की.............निमुटपणे
कळपाने चालायचे,
कुठे जायचे माहित नाही,
कुणासोबत जायचे माहीत नाही.
कळपाला लागतो एक नेता,
बाकी सारे अनुयायी.
गुलामगिरी ची जुनी च खोड मेल्याशिवाय जायची नाही .
एक दिवस मेंढरु डोकं वर काढेल .
मागण्या ,उपोषणे, मोर्चे ,जाळपोळ
शस्र उगारून पाहिलं तो निरनिराळे
पण नाही च जमणार आता त्याला काही.
स्वाभिमानशुन्यता हेच त्याच मूळ राहील,
लांडग्याला माहीत आहे डाव कसा टाकायचा
आता दोघांनाही एकमेकांची सवय झालीय .
मानवजात नामशेष होईल तोपर्यंत लांडगा मेंढराला भिती दाखवतच राहणार .
आणि निदान मला जगता तरी येतयं यातच
मेंढर धन्यता मानत राहील.
यातच मेंढर धन्यता मानतील .
धन्यता मानने हा मेंढराचा स्वभाव झाला
मान वर करायला फुर्सद नाही.

Group content visibility: 
Use group defaults

थेट पोचल!
शीर्षक : गुलामगिरी??