झटपट गार्लिक ब्रेड

Submitted by अजय चव्हाण on 14 May, 2020 - 05:18

साहित्य (दोन माणसांसाठी)

1. अर्धा ब्रेड (व्हाईट)
2. अर्धी वाटी बटर (Room temperature)
3. चिमूटभर काळीमीर पूड.
4. 7-8 ठेचलेल्या लसूण पाकळ्या.
5. 1 चमचा सिझनिंग हर्ब्स.
6. 1 चमचा चिलीफ्लेक्स.
7. चवीपुरत मीठ.

कृती:

सर्वप्रथम गार्लिक बटर तयार करण्यासाठी अर्ध्या वाटी बटरमध्ये ठेचलेला लसूण, काळीमिरी पूड, सिझनिंग हर्ब्स, चिलीफ्लेक्स आणि चवीपुरत मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करावं. मिक्स झाल्यानंतर ब्रेडच्या मधून कट मारून दोन स्लाईस कराव्यात. आता प्रत्येकी स्लाईसवर वरच्या बाजूने तयार केलेलं बटर लावून घ्यावं.

gralic bread.jpg

गॅसवर पॅन थोडं तापल्यावर बटर व्यवस्थित पसरवून घ्यावं मग त्यावर स्लाईस ठेऊन अंदाजाने आलटून पालटून भाजून घ्यावं..

मायोनिजमध्ये थोडा साॅस मिसळून गरमागरम गार्लिक ब्रेड सर्व्ह कराव.
( इकडे मायोनिज संपल्यामूळे फक्त साॅस घेतला आहे)

टिप:

. ह्यात चिज अॅड केलं तर अजुन चांगली चव येते.
ब. सिझनिग आणि चिलीफ्लेक्स घरी असेल तर उत्तम. नसेल तर
पिझ्झाबरोबर जी पॅकेट येतात ती वापरली तरी चालतील.
ही पाकीट टाकून न देता जपून ठेवावीत अगदी मॅगीतसुद्धा टाकू
शकता. छान चव येते.

साभार: मधुरा रेसिपीज

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी किती गोंधळले
म्हटलं मला इडली दिसतेय
आणि गार्लिक ब्रेड ची रेसिपी
मग मला वाटलं इडलीचा ब्रेड बनवायचाय.

इकडे माझ्याकडे एडिट option मधला मजकूरच येत नाहीये.. त्यामुळे खूप प्रयन्त करून सुद्धा image delete करता येत नाही..
या तांत्रिक अडचणीमुळे धागा तसाच ठेवत मूळ फोटो कंमेंटमध्ये देत आहे.. झालेल्या चुकांबद्दल क्षमस्व..
रसिक /वाचक समजून घेतील अशी अशा करतो. धन्यवाद.

वाॉव .. मी पण सेम हीच पा.कृ वापरून करते.. चीज मस्ट आहे.
काळे ओलिव्हज् आणि तिरंगी मिरच्या व वरून चीज असेही अफलातून लागते.

छान.

माझ्या shejarnine मक्याचे दाणे,ब्रोकोली घालून दिले होते.तिने सँडविच सारखे केले होते.

मस्त दिसतोय
घरात पाव पण आहे
बाहेर पाऊस पडतोय
नक्की करून बघते आज.

मला कळली ईडली
खालचा वर्जिनल फोटोही छान दिसतोय
लसूणपाव आवडीचा. बाहेरही वरचेवर खातो आणि घरीही जमेल तसे करून खातो. पण कधी प्रॉपर रेसिपी बगैरे शोधायला गेलो नाही. हे असं करून बघतो

लसूण पाव इज सो मिडल क्लास.... गार्लिक ब्रेड म्हणा..
>>
हा तो आपून भी मिडलक्लास ही है ना..

जेव्हा भेटतात बसून चार यार
खातात लसूण पाव फार .. चीअर्स!

बाई दवे,
या गार्लिक ब्रेड सोबत कोणते ड्रिंक जाते.
चहा किंवा कॉफीही प्यायला मजा येत नाही फारशी
आणि फसफसणारे पेय मी पित नाही

20200513_125912.jpg

*****************
कालच केली होती पण रेडी टू इट फ्रोजन होती.
पुढच्या वेळी तुमच्या पद्धतीने करून बघेन .