माझ्या फेसबुक मैत्रीची थरारकथा

Submitted by Parichit on 13 May, 2020 - 12:39

डिस्क्लेमर: हा अनुभव "आपल्या आयुष्यातले थरार" अशा एका धाग्यावर पूर्वी मी प्रतिसाद म्हणून लिहिला होता. तोच इथे वेगळा धागा म्हणून चिकटवत आहे. त्यामुळे ज्यांनी आधी वाचलाय त्यांच्यासाठी पुनरुक्ती होईल. पण माझ्या लिखाणाच्या यादीत या अनुभवावर सुद्धा लेख असायला हवा असे वाटल्याने हा कॉपीपेस्टप्रपंच. शिवाय, मला लागलेल्या ठेचेमुळे योग्य तो बोध घेऊन पुढचे काहीजण व काहीजणी शहाणे होतील हा सुद्धा हेतू.
---

माझा हा अनुभव लिह्ण्यासारखा नाही. कुणालाही आजवर सांगितलेला नाही. कारण तो सांगण्यासारखा नाही. पण इथे विषय थरारचा आहे म्हणून त्या संदर्भात लिहितो. तरीही, विवाहबाह्य संबंध वगैरेची ज्यांना एलर्जी आहे त्यांनी माझा अनुभव वाचला नाही तरी चालेल. पाच सहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला. फेसबुकवर एक मैत्रीण झाली होती आणि सुरवातीला आमची फेसबुकवरच फ्रेन्डशिप होती बाकी काही नाही. काही दिवसांनी या मैत्रीचे जवळच्या मैत्रीत रुपांतर झाले पण ओनलाइनच. आत्मविश्वास निर्माण झाल्यावर व्यक्तिगत गोष्टी सुरु झाल्या. आम्ही आमचे फोन नंबर एकमेकाला दिले. फोनवर एकदोन वेळा बोललो. पुढे हळू हळू गप्पांच्या ओघात मी तिला फेसबुक चाटवर नाव पत्त्यासहित माझी सगळी माहिती सांगून टाकली. तिने पण ती कुठे राहती व तिच्या नवऱ्याचे दुकान आहे व ती हाउसवाईफ आहे हे सगळे तिने सांगितले. तिचे लग्न झाले आहे हे कळल्यावर मी तिला म्हणालो बाई गं तसे असेल तर तू जरा काळजी घे.आपले चाट वेळच्या वेळी डिलीट करत जा. नवऱ्याला कळले तर पंचाईत नको. तर म्हणाली नाही नाही माझा नवरा अजिबात तसा नाही. त्याला चालते मी फेसबुकवर मैत्री केलेली. नवीन लग्न केलेल्या बऱ्याच लेडीजना आपला नवरा - तसा नाही - ह्याचा फाजील आत्मविश्वास असतो. तिला पण तसाच खोटा आत्मविश्वास होता. पण हे मला कळायला उशीर झाला, त्याचीच हि थरार कथा. मी तेंव्हा तिच्यावर विश्वास ठेवला आणि परत तिला कधी आपले चाट व मेसेज डिलीट कर म्हणालो नाही. असेल तिच्या नवऱ्याला चालत तर आपण तरी कशाला काळजी करा, असे मला पण वाटले व आम्ही बिनधास्त वाटेल ते चाट करू लागलो. तिच्या कसल्या कसल्या भन्नाट कल्पना आहेत ते ती मला सांगायची. कसली कसली चित्रे ती मला पाठवायला सांगायची. मी पण ती इमानेइतबारे पाठवायचो. मैत्रीने सगळ्या हद्दी ओलांडल्या होत्या. पण हे सगळे फेसबुकवरच. हे असे काही महिने चालले. पण आम्ही एकदाही भेटलो नव्हतो.

पण पुढे तो दिवस सुद्धा आला. तिची खरंतर प्रत्यक्ष भेटायची अजिबात इच्छा नव्हती. काय असेल ते मैत्री फक्त फेसबुकवरच असू दे म्हणायची. पण चाटवर मी तिला बऱ्याच मिनतवाऱ्या केल्यावर पाच दहा मिनटे भेटायला ती तयार झाली. तिचे गाव माझ्या गावापासून पन्नास साठ किलोमीटरवर अंतरावर होते. मी तिथे बाईकवरून गेलो. आम्ही भेटलो पाच दहा मिनटे. व ते पण एका गर्दीच्या ठिकाणी त्या गावच्या बस स्थानकावर. कुणाला शंका येऊ नये म्हणून आम्ही दोघेही एकमेकांना आधीपासून ओळखतो असे न दाखवता बसची वाट पाहत उभे असलेले वेगवेगळे प्रवासी आहोत असे भासवून आम्ही बोललो. साडी नेसलेली एक अत्यंत सामान्य गृहिणी ह्यापलीकडे तिला व्यक्तिमत्व नव्हते. भेटून आम्ही जे काही जुजबी बोललो तेवढेच. एकमेकांना पाहण्यापलीकडे त्या भेटीत काहीच झाले नाही. पुढे कामाच्या वगैरे नादात आमचे चाटिंग कमी कमी होत गेले. पण मला कल्पनाही नव्हती कि ह्या फेसबुकवरच्या मैत्रीमुळे माझ्या पुढ्यात नजीकच्या भविष्यात काय थरार वाढून ठेवला आहे.

पुढे साधारणपणे दोन तीन महिन्यांनी एका संध्याकाळी मी घरीच होतो. तर एका अनोळखी नंबर वरून मला फोन आला. बोलणारा पुरुष होता व त्याने माझे नाव घेऊन तो तूच का असे विचारले. आवाजावरून रागरंग चांगला वाटला नाही. व माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला हो मी तोच असे म्हणून आपण कोण बोलताय असे विचारले. माझी शंका खरी ठरली. त्याने तिचे नाव घेतले व मी तिचा नवरा बोलतोय म्हणाला. व तिच्याशी तुझे काय संबंध आहेत असे त्याने मला थेटच विचारले. माझी गाळण उडाली. मला काय बोलावे सुचेना. कोण बोलताय आपण? रॉंग नंबर. असे काहीतरी बोललो. तर तो म्हणाला तिच्याशी बोल. आणि त्याने तिला फोन दिला. तर ती रडत म्हणाली अरे तू त्याला जे आहे ते सांग, खोटे काही सांगू नकोस कारण आपल्याविषयी त्याला सगळे कळले आहे आणि आपले सगळे चाटिंग त्याने वाचलेत. ते ऐकून माझे सगळे अवसान गळाले. मग त्याने पुन्हा फोन आपल्याकडे घेतला. आता मात्र माझा आवाज कापू लागला. त्याला मी चाचरत सांगायचा प्रयत्न केला कि अरे नुसते आम्ही ओनलाईन बोलत होतो आणि तू समजतोस तसे आमच्यात आमच्यात काहीही नाही. तर त्याने मला बोलूच दिले नाही. मला म्हणाला नाटक करू नको तुम्ही दोघे भेटला पण आहे. भेटून काय केलेस तेवढे सांग. तुमचे सगळे चाट मी वाचले आहे. तू काय करतोस कुठे राहतोस ते तुझी सगळे माहिती मी चाटिंग मधून मी घेतली आहे. हे सगळे केलेस तेंव्हा तुला अक्कल नव्हती का. तू आमचा संसार उधळलास. आता तू फक्त परिणामाला तयार हो. मी आता पोलिसांकडे जाणार आहे व पेपरला पण हे सगळे देणार आहे. शिवाय एका पक्षाच्या लोकल नेत्याचे नाव घेऊन म्हणाला त्याची माणसे आपले दोस्त आहेत, त्यांना तुज्याकडे बोलायला पाठवतोय. तेच तुझ्या घरी येऊन आता तुला समजावतील तू तयार राहा. असे म्हणून त्याने फोन ठेवला.

माझे पाय लटलट कापू लागले. हा सगळा प्रकार घरच्यांसमोरच झाल्याने त्यांनी मला विचारले काय झाले व कुणाचा फोन होता. तर मी त्यांना सगळे सांगितले व म्हणालो फक्त नेटवर मैत्री केली होती व फक्त एकदाच भेटलो आहे. तर घरच्यांनी सुद्धा मला सुनावले. नसते उद्योग करायला तुला कुणी सांगितले होते वगैरे वगैरे मला बोलले. त्या रात्री एक सेकंद सुध्धा झोप लागली नाही. ती रात्र भयंकर नी प्रचंड म्हणजे प्रचंड तणावाची होती. रात्रभर तळमळत होतो. माझ्या घरी कोणत्याही क्षणी पोलीस येतील इथपासून मला मारायला त्याचे मित्र येतील इथपर्यंत काय काय विचारांनी माझी झोप उडाली. दुसऱ्या दिवशी बाहेर जाऊन मी त्याला त्या नंबर वर फोन केला. व माफी मागितली. तर तो आवाज चढवून बोलला. म्हणाला कि काल आमच्यात तुझ्यावरून जोरात भांडण झालंय आणि तिने रात्री औषध खावून जीव द्यायचा प्रयत्न केलाय व ती आता दवाखान्यात एडमिट आहे. जर तिला काय झालेबिले तर तू मेलासच म्हणून समज, मी तुला सोडणार नाही एवढे लक्षात ठेव. असे म्हणून त्याने फोन ठेवला. मला अक्षरशः घाम फुटला घशाला कोरड पडली व भीतीने कापरे भरले. कुठल्या कुठे ह्या फंदात पडलो असे झाले. चेहरा पांढराफट्ट झाला. दोन दिवसांनी कसेबसे अवसान आणून मी त्याला घाबरत घाबरत पुन्हा फोन केला व माझे सगळे कौशल्य पणाला लावून त्याची समजूत घातली माफी मागितली व जे जे काय शक्य आहे ते बोललो. यावेळी त्याने ऐकून घेतले व मी आता टेन्शनमध्ये आहे मला पुन्हा फोन करून त्रास देऊ नकोस म्हणून त्याने फोन कट केला. त्यानंतर कित्येक दिवस मला घशाखाली अन्न जात नव्हते. भीतीने व तणावाने मी आजारीच पडलो. माझ्या सुदैवाने त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. ते प्रकरण तिथेच संपले. पण यातून एक मोठा धडा शिकलो कि फाजील आत्मविश्वास बाळगणाऱ्या मूर्ख व बेजबाबदार बायांशी फेसबुकवर कधीही मैत्री करायची नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वासूगिरी करायची असेल तर निस्तरायची धमक पण असायला हवी.

ईतकी फाटत असेल तर असले चाळे करावे कशाला?

बिर्याणी खायची तर आहे पण पचवता येत नाही.....

आपले कल्चरच बेकार आहे. सत्तरेक वर्षाचे आयुष्य त्यातील तीसेक वर्षाचे तारुण्य एकाच पार्टनरसोबत रोमान्स करायचे किंवा एकटेच उसासे टाकत राहायचे हे निसर्गनियमानुसार अवघड आहे. पण आपण ते जमवायला जातो आणि या नादात जिथे कमी पडतो त्याला व्यभिचाराचे लेबल लावत सुटतो.

भेटल्यानंतर नक्की काय झाले याचा त्यात उल्लेख नव्हता. >>> अरे वो फोटुज चिल्ला चिल्ला के कह रहे है कि क्या हुआ था, और आप चॅट पर ही अटके हो बबुआ ?

च्यायला याला नुसता गच्चीत व्यायाम केला तरी फटके पडतात तरी अंगात मस्ती किती ती
फेसबुकवर चाळे आणि आता टिंडर् वर जायचे डोहाळे लागलेत

अत्यंत प्रातिनिधीक सडकी मनोवृत्ती Happy

लग्न झालेल्या व्यक्तींपासून दूरच राहणे, नसेल होत तर पुढे चालून येणाऱ्या परिणामांना भोगण्यास ही तत्पर राहावे.

> ईतकी फाटत असेल तर असले चाळे करावे कशाला?

>>> एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आणि ती व्यक्ती बेजबाबदारपणे वागली तर कुणाचीही फाटणारच कि ओ. नॉट ओन्ली इन अफेअर.

> पण आपण ते जमवायला जातो आणि या नादात जिथे कमी पडतो त्याला व्यभिचाराचे लेबल लावत सुटतो.

+१२३४५ (+७८६ असे लिहून तुमचा डुप्लिकेत होण्याचा गैरफायदा मी उचलत आहे असे तुम्हाला वाटू नये म्हणून)

> अरे वो फोटुज चिल्ला चिल्ला के कह रहे है

>>>अरे वो फोटुज चिल्ला चिल्ला के कह रहे है

> ढेरपोट्याबाबा आधी मला एक सांगा तुम्ही म्हणजेच आशुचँप का? मला पक्का संशय आहे. कारण त्या दुसऱ्या धाग्यावर सर्वात आधी आशुचँप यांनी फोटोची मागणी केली. तिला इतरांचे अनुमोदन मिळतेय म्हटल्यावर ढेरपोट्याबाबा आयडीने जन्म घेतला आणि ती मागणी लावून धरली.

> माझ्या फेसबुक मैत्रीणीची थरारकथा

>>> हो चालेल कि मैत्री काय मैत्रीण काय. थरार होता हे खरे.

> अत्यंत प्रातिनिधीक सडकी मनोवृत्ती

>>> हो प्रातिनिधिक आहे म्हणालात हे महत्वाचे. सहमत आहे. सडकी कि काय ते मात्र जो तो कसे घेतो त्यावर अवलंबून. बट आय एम नॉट अलोन. अनेक असे प्रकार घडत असतात आजकाल. सोसायटी इज ट्राइंग टू टेल अस समथिंग. ऋन्मेऽऽष यांचा प्रतिसाद वाचा.

मी मागेही अभिषेक ला उत्तर दिले आहे
कुठल्याही दुय आयडी च्या मागे लपून बोलायची वेळ आली तर मी मायबोली सोडून जाईन
मी जे काही बोलतो ते थेट आणि एकाच आयडी ने
माझे फोटोही मायबोलीवर आहेत
आणि मला ओळखणारे देखील अनेक आहेत
असले दलिद्री धंदे करयाची मला गरज नाही
ओळख लपवायची गरज तुमच्या सारख्या लोकांना असते

मी मागेच सांगितले की माझे नाव अभिषेक नाईक आहे. आता आशुचँप यांना थोड्या वेळासाठी स्ट्रॅटर्जिक दृष्ट्या प्रॉब्लेम नसेल तर मी आशुचॅंप आहे हे मान्य करून तो विषय संपवून टाकू. तुमच्या भरकटक यंत्राला आळा घालून फोटो बाबत बोलूयात.

फोटु चिल्ला चिल्ला के कह रहे है.... याबद्दल बोला.

तुम्हाला माझे प्रतिसाद खटकत असतील तर सांगा. मी त्यावर विचार करीन. पण तुमच्या कहाण्यातले लूप होल्स पकडणे हा जो ट्रॅप आहे त्यात अनेकांप्रमाणे मी ही जाणूनबुजून अडकत आहे. फक्त त्याबद्दल मी तुम्हाला कधी जाब विचारत नाही.
मी फक्त मला जे माहीत आहे ते सांगत असतो. ते तुम्ही धुडकावून लावत असाल तरी मला प्रॉब्लेम नाही.
तुम्ही सिद्धच करावं अशी आपली हटवादी मागणी नाही.
फक्त मी खोटं बोलतोय ग्तर मग खरं नको का सांगायला ? एव्हढा छोटा प्रॉब्लेम आहे दादा.

अहो बंडीहीन ढेरपोट्या बाबा तुमचे फोटो खोटे आहेत हे लहान मुल सुद्धा सांगेल. इथे मायबोलीवर रिवर्स इंजिनियर आहेत ते तुम्हाला दाखवून देतील तुम्ही कोठून हे फोटो उचललेत. तुमचे प्रतिसाद खटकत नाहीत पण खोटे फोटो टाकून जी एकच रट लावली आहे ते सगळे फार अपरिपक्वपणाचे वाटत नाही का तुम्हालाच?

मागे एक ८० वर्षांचे आजोबा सांगत होते कि हा विषय फार्फार गहन आहे. उर्मी आली कि कंट्रोल होत नाही.
अशा वेळी काय करता असं विचारलं तर म्हणाले कि या वयात काय करणार? ओरली करतो.
चकित झालो तेंव्हा म्हणाले कि ती असते थोरल्या मुलाकडे. मी धाकट्याकडे. उर्मी आली कि फोन करतो. ती तिकडून चावट प्रश्न विचारते व मी इकडून दुप्पट चावट उत्तरे देतो. सगळी तोंडी मजा घेतो रे आम्ही. Lol Proud
धागाकर्ता आणि त्याला उत्तरे देणारे याच प्रकारचा आनंद घेताना दिसतात नेहमीच. विकृती आहे हि.

खोटे फोटो निघतात का ? तुम्हाला एडीटेड म्हणायचे आहे का ? नाही ना ?
आंजावर आहेत कारण ते व्हायरल झाले आहेत इतकचे म्हटले मी. त्यात तुम्ही आहात एव्हढेच सांगितले.

मी म्हणालो का की तुमची कहाणी खोटी आहे हे लहान मूलही सांगेल म्हणून ? नाही ना ?
मी तुम्हाला ओळखतो म्हणून फोटोत तुम्ही आहात हे ओळखले.
तुम्ही ते नसाल तर सिद्ध करा. सक्ती नाही.

> उर्मी आली कि फोन करतो

>> उर्मी कोण? तिलाच करायचे ना मग Biggrin असो जोक्स अपार्ट पण भावना पोचल्या

> तुम्ही ते नसाल तर सिद्ध करा. सक्ती नाही.

>>> हे देवा. मायबोलीवर लहान मुले पण आहेत का? सोळावर्षे वा त्याहून कमी? शब्दच्छल करायला आवडणारी? (मानसिक वयाबद्दल बोलतोय मी)

अहो बंडीहीन ढेरपोट्या बाबा तुमचे फोटो खोटे आहेत हे लहान मुल सुद्धा सांगेल. >>>> तुम्हीच जास्त सांगू शकाल लहान मुलांबद्दल.

पण अजुन थोडा रोमान्स हवा होता
>>>>

ते वेगळे मी वेगळे
माझे लग्नाआधीचे बरेचसे जास्तीचे रोमान्स असलेले किस्से आहेत.
तुम्ही म्हणाल तर भूतकाळाच्या डोहात उडी मारून आणू का काही?

मोठ्ठा घोळ आहे ब्वा इथे. खूप म्हणजे खूप मोठ्ठा घोळ आहे...

१. छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या: हे मी कुणाचातरी ड्यू आयडी आहे असे समजून त्या व्यक्तीशी असलेल्या पूर्ववैमनस्यातून माझा पाठलाग करत आहेत.

२. ऋन्मेऽऽष: यांना वाटत आहे मी त्यांच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेत आहे म्हणून ते वारंवार आपण ते नव्हे म्हणून सांगत आहेत

३. आशुचँप: हे माझ्यावर कारण नसताना दात खाऊन आहेत अन मी सांगितलेले सगळे किस्से त्यांना खोटे वाटत आहेत (#१ पण अशीच केस आहे पण हे दावा करतात कि #१ आणि मी वेगळे आहोत आणि आपला कोणताही ड्यू आयडी नाही)

४. काही आयडींना माझे किस्से खरे वाटत आहेत: त्यांना धन्यवाद

५. काही आयडींना माझे किस्से खोटे वाटत आहेत: त्यांच्याविषयी मला काही बोलायचे नाही

६. कटप्पा: यांना वाटते कि मी इथल्या स्त्रियांना इम्प्रेस करायला आलो आहे

७. इथल्या बहुतांश सन्माननीय स्त्री आयडीज: यांची मी विबांस वाला भम्पक मनुष्य आहे अशी समजूत असल्याने यांना माझे धागे आवडत नाहीत त्यामुळे त्या सर्व धागे वाचून नाके मुरडणे पसंद करतात

जेंव्हा खरी गोष्ट अशी आहे व ती मी धाग्यांतून वारंवार सांगितली आहे कि

माझ्या अनुभवांतून पुढच्या कोणीतरी धडे घ्यावेत शिकावे केवळ आणि केवळ या एकाच हेतूने धागे लिहिले आहेत. (मग तो डी आणि डी चा धागा असो किंवा लॉज बुकिंगचा किंवा टेरेस मधल्या व्यायामाचा) मला इथल्या कोणत्याही आयडीशी व्यक्तिगत देणेघेणे नाही. एक व्यक्ती सोडली तर मी इथे कुणाला ओळखत पण नाही.

केस फारच वाईट थराला जातेय. कुणी मानसोपचार तज्ज्ञ आहे का इथे. इथं असलेल्या अनेक फालतू आयडींच्या एकमेव मालकाला उपचारांची खूप जास्त गरज आहे. असं नको करुस मित्रा, आपल्या बायकपोरांचा विचार कर.. असाच वागत राहिलास तर ठार वेडा होशील एक दिवस.

व्हायचा बाकी आहे का?
एकंदरीत धाग्यातली आणि प्रतिसादाची भाषा बघता तेच दिसतंय
मला तर ही विकृती वाटते

हो चालेल कि मैत्री काय मैत्रीण काय. थरार होता हे खरे.
Submitted by Parichit>>
रिकामे उद्योग करायचे आणि अंगाशी आल्यावर घाबरुन थरथर कापायचं यात कसला आलाय थरार.

मुद्दा क्र १ आणि ४ मध्ये विरोधाभास आहे. मी ४ मधे येतो. म्हणजे माझ्याकडे जे फोटो आहेत ते तुमचेच आहेत. मी तुम्हाला ओळखत असल्याने खरे फोटो टाकले आहेत. त्यामुळे तुमच्या असण्याविषयी, आयडीच्या खरेपणा विषयी शंकाच नाही. ओळखीचा असल्याने परिचित आहात. मी तुम्हाला अप्रिचित म्हटलेलं नाही.
तुम्हालाच माझे म्हणणे खोते वाटत आहे. तुम्हीच माझ्यावर नाही नाही ते भयानक आरोप करत आहात. मी त्यामुळे विमनस्क अवस्थेत पोहोचलो आहे. तुम्हाला माझ्यावर बिनबुडाचे आरोप करायचेच असतील तर तुम्ही फोटो टाकून विषय संपवावा. हाकानाका.

कित्येक वर्षे संशोधकांचे असे मत होते कि आशुचँप म्हणजेच छज्जातील बंडीहीन ढेरपोट्या. पण अलीकडे झालेल्या संशोधनातून असे लक्षात आले आहे कि हे ढेरपोट्या बाबा म्हणजे बोकलत असण्याची दाट शक्यता आहे. यांचा मिरजेत रेल्वे फाटकापाशी एक फोटो स्टुडीओ होता. काही महिन्यांपूर्वी आलेल्या पुरात तो स्टुडीओ वाहून गेला. त्यामुळे बोकलत उर्फ ढेरपोट्या बाबा सैरभैर झाले. फाटकापाशी फाटके कपडे घालून विमनस्क अवस्थेत उभे राहू लागले. आणि ज्याला त्याला फोटो फोटो करू लागले. रस्त्यावरून येणाजाणाऱ्याकडे फोटो मागू लागले. अपरिचित सुद्धा त्यांना परिचित वाटू लागले. ढेरपोट्या बाबांविषयी मला अपार कणव आहे. देव करो... करोना नव्हे करो... तर देव करो त्यांचे सारे फोटो त्यांना परत मिळोत. तथापि ते नक्को कोण आहेत त्यावर अद्यापि संशोधन सुरु आहे.

अहो परिचित साहेब तुम्ही एवढे भोळे कधी झालात? सज्जावाले बोकलत नसून माबोचा एक जुना लेजण्ड आहे. माबोवर एवढा वेळ जाऊनही कळत नसेल तर उघडा डोळे पहा नीट. जानेदो आपुन को क्या ? मजा लेनेसे मतलब. तसेही तुम्हाला ते काय आता सहजासहजी सोडणार नाही Lol

Pages