तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल?

Submitted by कटप्पा on 13 May, 2020 - 10:48

तर मंडळी - तुम्हाला कोणाचा ड्यू आयडी व्हायला आवडेल आणि का असा सिम्पल सवाल आहे .
कृपया ओरिजिनल आयडी नेच प्रतिसाद द्यावेत . ड्यू आयडी ने नाही . इथे प्रतिसाद येणारे आयडी मुळ आयडी समजले जातील .

आता माझ्याबद्धल . मला बोकलत यांचा ड्यू आयडी व्हायला आवडेल . अमानवीय धाग्यावर माझीच सत्ता असेल .

ऍडमिन सर धागा विरंगुळा मध्ये आहे . थोडी गम्मत म्हणून .

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेका - तुम्ही ऋन्मेष चा प्रतिसाद वाचा ज्याच्यावर मी "जाम हसलो " असा कमेंट केला आहे तुम्हाला कळेल कटप्पा अमेरिकेत आहेत कि भारतात .....

मला वाटते ते अमेरिकेत आहेत आणि मुद्दाम शाहरुख , कडक कॉफी , मॅगी , बाई दवे असे ठराविक शब्द जे ऋन्मेष वापरतो ते टाकतात म्हणजे गैरसमज आणखी वाढावा....

मला वाटते ते अमेरिकेत आहेत आणि मुद्दाम शाहरुख , कडक कॉफी , मॅगी , बाई दवे असे ठराविक शब्द जे ऋन्मेष वापरतो ते टाकतात म्हणजे गैरसमज आणखी वाढावा....
Submitted by च्रप्स on 14 May, 2020 - 05:32

>>>>>

मलाही खरेच आश्चर्य वाटते की निव्वळ असे किवर्डस वापरून ते लोकांची मजा घेत होते आणि लोकं फसतही होते.

आणि आता त्यांनी अमेरीकेत कुत्रामांजर पाळायचा धागा काढताच त्याच लोकांना लगेच पटलेही की कटप्पा अमेरीकेत राहतात Happy

आता म्हणजे मला सिद्ध करावे लागेल की मी भारतात राहतो.

पण मी हे सिद्ध करणार नाही Happy

ऋन्मेष लोक फसत नव्हते . ते दोन तीन आयडी फक्त .
ऋन्मेष आणि कटप्पा एकच व्यक्ती आहे - धागा काढा मी सिद्ध करून दाखवेन असे जेंव्हा अज्ञातवासी म्हणू लागले मी विचार केला जरा फिरकी घेऊ आणि मुद्दाम एव्हिडन्स प्लॅन्ट करू Happy
मजा तेंव्हा यायची जेंव्हा काही जण स्क्रीनशॉट घेऊन शेयर करायचे . होप त्यांनी ते डिलीट केले असावेत .उगाच फोन ची स्पेस वाया .
बाकी विरंगुळा मध्ये टाईमपास झाला तर विरंगुळा धाग्याचे उद्दिष्ट पूर्ण . नाही का Lol

ऋन्मेष लोक फसत नव्हते . ते दोन तीन आयडी फक्त .
>>>
थोडे जास्त लोकं फसलेले. दोनतीन आयडी हात धुवूनच मागे लागलेले म्हणून उठून दिसले. शंका ईतरही काही लोकांच्या मनात उत्पन्न झालेल्या. गंमत वाटली एवढ्यासाठीच म्हटले की नुसते शाहरूख, +७८६, बाई दवे असे शब्द वापरताच ऋन्मेष आणि कटप्पा यांच्या लिखाणाची शैली सेम आहे अश्या कॉमेंट आल्या Happy

आणि अजूनही सगळ्यांचेच पुर्ण शंकानिरसन होणार नाही. डुआयडी ओळखा खेळाची हिच गंमत आहे.

आता स्ट्रेंजरच "हे" नाहीत अस म्हणुन नका कारण तुमची चोरी पकडली नी तो उल्लेख करुन मी प्रतिसाद टाकल्याबरोबर तुम्ही आपला प्रतिसाद एडिट केलात. (जयकांत, गायकांत...आठ्वलं काही)

जेम्स बॉन्ड
तो स्ट्रेंजर आयडी कोणाचा होता असे तुम्हाला वाटते?
कटप्पाचा कि ऋन्मेषचा? कि आणखी कोणाचा?
कि अजूनही आम्ही दोघं एकच आहोत तुमच्यामते?

Pages